जीवन विमा पॉलिसी 40 टक्क्यांनी झाली महाग, कोणत्या विमा कंपनीने किती वाढविले दर?

आता जीवन विमा पॉलिसी घेणे ही महाग झाले आहे. महागाईचे चटके सहन करणा-या गुंतवणुकदारांना आयुष्याची हमी आता स्वस्तात मिळणार नाही. विमा योजनेलाही महागाईचा तडका बसल्याने त्याची झळ विमाधारकांना बसणार आहे.

जीवन विमा पॉलिसी 40 टक्क्यांनी झाली महाग, कोणत्या विमा कंपनीने किती वाढविले दर?
Insurance Policy
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 10:57 AM

नवी दिल्ली: जीवन विमा पॉलिसी ही अनेक गुंतवणुकदारांना सुरक्षित भविष्याची हमीदार वाटते. कुटुंब, आई-वडील, पत्नी-मुलांची आपल्या पश्चात सोय व्हावी. त्यांना काही तरी लाभ मिळावा यासाठी अनेक जण मासिक, त्रैमासिक, सहा महिन्याला अथवा वर्षाला एक ठराविक रक्कम विमा योजनेत गुंतवितात. पण आता तुमची विमा योजना ही महाग झाली आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम सर्वच क्षेत्रावर दिसून आला. त्यात आता विमा क्षेत्राची भर पडली आहे. गेल्या दोन लाटेत विमा कंपन्यांना कोविड लाटेत मोठ्या प्रमाणावर दाव्याचा निपटारा करावा लागला आणि रक्कम अदा करावी लागली. त्यामुळे विमा कंपन्या त्यांच्यावर आर्थिक बोजा पडल्याचा दावा करत आहे. हा आर्थिक ताण कमी करण्यासाठी कंपन्यांनी विमा पॉलिसीचे दर 40 टक्क्यांनी वाढविले आहे.

विमा पॉलिसी महागाईचा हा फटका प्रिमियमवर पडला आहे. त्यामुळे विमाधारकांचे हप्ते वाढले आहे. या वाढीचा सर्वाधिक फटका टर्म इन्शुरन्स पॉलिसीवर अर्थात मुदतीसाठी घेतलेल्या विमा योजनेवर पडला आहे. या पॉलिसीत कंपन्यांना मोठी रक्कम द्यावी लागते. परिणामी आता विमा कंपन्यांनी त्याच प्रमाणात टर्म विम्याच्या हप्त्यात वाढ केली आहे. विमा क्षेत्रातील जवळपास सर्वच विमा कंपन्यांनी विमा पॉलिसींमध्ये वाढ केली आहे. कोरोनाचे कारण त्यासाठी पुढे करण्यात आले आहे. कंपनीनुसार महागाईचा हा दर कमी अधिक आहे. फक्त एलआईसी या आघाडीच्या विमा कंपनीने त्यांच्या टर्म योजनेत कुठलीच वाढ केलेली नाही.

एलआयसी सोडून सर्वच कंपन्यांचे विमा महाग

जवळपास सर्वच खासगी विमा कंपन्यांनी त्यांचा विमा महाग केला आहे. एलआयसीने अद्याप याविषयीचा निर्णय घेतलेला नाही. गेल्या तीन वर्षांपासून एलआयसीने त्यांच्या विमा योजनेत कुठलीही दरवाढ केलेली नाही. कोरोनात मृत्यूदर वाढला, त्यामुळे मृताच्या वारसदारांना विमा रक्कम देण्यात कंपन्यांवर आर्थिक बोजा पडल्याचा दावा कंपन्यांनी या दरवाढी मागे केला आहे. विमा कंपन्यांच्या दाव्यानुसार, जगभरातील विमा बाजारात, भारतातील विमा योजना स्वस्त असून इतर देशात त्यासाठी विमाधारकांना मोठी रक्कम चुकती करावी लागते. टर्म योजनेत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला कंपनी मोठी रक्कम अदा करते. ही रक्कम 1 कोटीच्या घरात ही असू शकते.

जवळपास 15 टक्क्यांची वाढ

विमा प्रिमियम महाग करणा-या कंपन्यांच्या यादीवर नजर टाकल्यास एकही कंपनी अशी आढळत नाही, जिने जवळपास 15 टक्क्यांची वाढ केली नसेल. प्रिमियम वाढवणा-या कंपन्यामध्ये एचडीएफसी लाईफ, आयसीआयसीआय प्रुडेंन्शियल, एसबीआई लाईफ, मॅक्स लाईफ यांचा समावेश आहे. एचडीएफसी लाईफ कंपनीचा टर्म विमा मार्च 2020 मध्ये 12,478 रुपयांना होता, तो जानेवारी 2022 मध्ये 16, 207 एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या प्लॅनमध्ये कंपनीने तब्बल 30 टक्क्यांची वाढ केली आहे. दुस-या क्रमांकावर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कंपनी आहे. कंपनीन मार्च 2020 मध्ये 12,502 रुपयांचा प्रिमियम आकारत होती. आता जानेवारी 2022 मध्ये हा प्रिमियम 17,190 रुपये एवढा झाला आहे. या कंपनीने प्रिमियममध्ये तब्बल 38 टक्क्यांची वाढ केली आहे.

या कंपन्याही नाहीत मागे

एसबीआय लाईफ कंपनी मार्च 2020 मध्ये 15,070 असा प्रिमियम आकारत होती. जानेवारी 2022 मध्ये कंपनीचा 17,495 रुपये प्रिमियम आकारत आहे. या कंपनीने प्रिमियममध्ये 16 टक्क्यांची वाढ केली आहे. मॅक्स लाईफ कंपनी मार्च 2020 मध्ये 10.148 रुपये प्रिमियम आकारात होती. जानेवारी 2022 मध्ये कंपनी 11,858 रुपये प्रिमियम पोटी घेणार आहे. या कंपनीने हप्त्यात 17 टक्क्यांची वाढ केली आहे.

इतर बातम्या:

फक्त 634 रुपयांमध्ये मिळणार हा LPG सिलिंडर, वजनाला ही हलका, ने-आण करण्यासाठी येणार नाही कुठली ही अडचण

LIC स्वस्तात मस्त पॉलिसी: 28 रुपयांची बचत, 2 लाखांचा लाभ; जाणून घ्या फायदे

Share Market | शेअर मार्केटच्या 5 गोष्टी, ज्यावर आज दिवसभर लक्ष ठेवायलाच हवं

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.