जनधन खात्याला आधारशी करा लिंक, अन्यथा नाही मिळणार 2.30 लाखांचा फायदा

जनधन खात्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये ओव्हरड्राफ्टसह रुपे डेबिट कार्डदेखील उपलब्ध आहे.

जनधन खात्याला आधारशी करा लिंक, अन्यथा नाही मिळणार 2.30 लाखांचा फायदा
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 9:40 AM

नवी दिल्ली : सर्व खातेधारकांचा आधार नंबर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक करून घेण्याच्या सूचना अर्थमंत्री (Minister) निर्मला सीतारमण (nirmala sitharaman) यांनी बँकांना दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, ज्या खात्यांमध्ये पॅन नंबर (Pan card Number)आवश्यक आहे तिथे पॅन नंबर आणि जिथे आधार नंबर (aadhaar Card Number)महत्त्वाचा आहे तिथे आधार नंबर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक असला पाहिजे. इतकंच नाही तर 2.30 लाख रुपयांचा फायदा हवा असेल तर प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये (Pradhan Mantri Jan-Dhan Yojana- PMJDY) वेळीच आपलं खातं उघडा आणि आधारशी लिंक करा असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे. (link your jan dhan account with aadhaar and get benefits of rs 2 lakh rupees insurance pradhan mantri jan dhan yojana)

मिळणार 2.30 लाखांचा विमा जनधन खात्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये ओव्हरड्राफ्टसह रुपे डेबिट कार्डदेखील उपलब्ध आहे. या डेबिट कार्डावर 1 लाख रुपये अपघाती विमा विनामूल्य मिळत आहे. 28.8.2018 नंतर उघडण्यात आलेल्या जनधन खात्यावर अपघाती विमा वाढवून आता तो 2 लाख करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या कार्डावर 30,000 रुपयांचा मोफत जीवन विमा कव्हरही मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या सुविधा त्याच खातेधारकांना मिळणार ज्यांनी 15.8.2014 पासून 31.1.2015 दरम्यान खाते उघडलं आहे.

जनधन खातं आधारशी कसे लिंक कराल? तुम्ही बँकेत जाऊन खातं आधारशी लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, तुमची पासबुकचा फोटो घ्यावी लागेल. यानंतर एक फॉर्म सबमिट करावा लागेल. एकदा का तुमचं खातं आधारशी लिंक झालं तर यासंबंधी मोबाइलवर SMS मिळेल. यातही जर तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर आणि बँकेत दिलेला मोबाइल नंबर वेगळा असेल तर तुम्हाला मेसेज मिळणार नाही.

या सरकारी योजनेमध्ये लाभार्थ्यांना लाभाची रक्कम थेट जनधन खात्यात पाठवली जाते. दरम्यान, 10,000 रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा ही प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एका खात्यात उपलब्ध असणार आहे. यातही कुटुंबातील महिलेला प्राधान्य देण्यात आलं आहे.

इतर बातम्या – 

Google Pay सह 5 बड्या कंपन्यांना मोठा झटका, CCI ने दिले चौकशीचे आदेश

दिवसाला 28 रुपये खर्च करून मिळवा 2 लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे LIC ची खास योजना

link your jan dhan account with aadhaar and get benefits of rs 2 lakh rupees insurance pradhan mantri jan dhan yojana

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.