मद्यप्रेमींची बल्लेबल्ले! पंजाबमध्ये दारू 30 ते 40 टक्क्यांनी स्वस्त; महसूल वाढीसाठी मोठा निर्णय

पंजाब सरकारने दारूवरील कर कमी केल्याने सर्वच प्रकारच्या दारूच्या किमती तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. दारूची तस्करी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मद्यप्रेमींची बल्लेबल्ले! पंजाबमध्ये दारू 30 ते 40 टक्क्यांनी स्वस्त; महसूल वाढीसाठी मोठा निर्णय
बीअरचे सेवन आतड्यांसाठी हितकारक
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 11:59 AM

चंदिगढ : पंजाबमधील (Punjab) मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. पंजाबमध्ये दारू (Liquor) स्वस्त करण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. दारूवरील कर कमी करण्यात आल्याने मद्याचे दर 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत. दारूवर लावण्यात येणाऱ्या करामुळे (Tax) चंदिगढ आणि पंजाबच्या शेजारी असलेल्या रांज्यांमधून मोठ्याप्रमाणात दारूची तस्करी होते. यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडतो. तस्करी रोखण्यासाठी तसेच महसुलात वाढ करण्यासाठी आता पंजाबमध्ये दारू स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बिअर, विस्की तसेच इतर प्रकारच्या दारूचे दर तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी झाले आहेत. रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 750 मिलीच्या बाटलीचा पूर्वीचा दर 500 रुपये इतका होता. आता हीच बाटली 420 रुपयांना मिळणार आहे. तसेच 250 मिलिची बाटली 150 रुपयांना मिळणार आहे.

दर किती कमी झाले?

पंजाब सरकारने दारूवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने पंजाबमध्ये दारूचे भाव तीस ते चाळीस टक्क्यांनी स्वस्त झाले आहेत. पूर्वी 750 मिली . रॉयल स्टॅग व्हिस्कीची किंमत 500 रुपये इतकी होती. ती आता 420 रुपयांना मिळणार आहे. तसेच 250 मिलिची बाटली 150 रुपयांना मिळणार आहे. Mc Dowell ची किंमत पूर्वी 400 रुपये इतके होती. आता हीच दारू 280 रुपयांना मिळणार आहे. पीटर स्कॉट व्हिस्कीच्या 750 मिलीच्या बाटलीसाठी पूर्वी 480 रुपये मोजावे लागायचे, मात्र आता ही बाटली अवघ्या 290 रुपयांमध्ये मिळणार आहे. रॉयल चॅलेंज व्हिस्कीची किंमत पूर्वी 500 रुपये होती, आता दरात कपात होऊन तीचे दर 360 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

महसूल वाढणार

दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दारूच्या तस्करीला आळा बसण्याची शक्यता आहे. चंदिगढ आणि पंजाबच्या शेजारी असलेल्या राज्यांमधून मोठ्याप्रमाणात दारूची तस्करी होते. ही दारू अवैध मार्गाने पंजाबमध्ये विकली जाते. यामुळे राज्य सरकारचा कोट्यवधीचा महसूल बुडतो. दारू तस्करीला आळा बसावा आणि महसुलात वाढ व्हावी यासाठी तेथील सरकारने दारूवर लावण्यात येणाऱ्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.