Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Good News : मोरेटोरियमचा लाभ न घेता नियमित EMI भरणाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार कॅशबॅक

कोरोनाच्या काळातही मोरेटोरियमचा तुम्ही फायदा घेतलेला नसल्यास तुम्हाला दिवाळीपूर्वीच कॅशबॅक मिळणार आहे. दिवाळीच्या अगोदर सरकार कर्जावरील व्याज तुमच्या बँक खात्यात कॅशबॅकच्या स्वरूपात जमा करणार आहे.

Good News : मोरेटोरियमचा लाभ न घेता नियमित EMI भरणाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार कॅशबॅक
सगळ्यात खास बाब म्हणजे हे व्यवसाय तुम्ही घरी देखील सुरू करू शकता. यासोबतच तुम्हाला यासाठी अधिक सामानाचीही गरज नाही. जाणून घेऊयात काय आहेत हे व्यवसाय
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 3:54 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळातही मोरेटोरियमचा तुम्ही फायदा घेतलेला नसल्यास तुम्हाला दिवाळीपूर्वीच कॅशबॅक मिळणार आहे. दिवाळीच्या अगोदर सरकार कर्जावरील व्याज तुमच्या बँक खात्यात कॅशबॅकच्या स्वरूपात जमा करणार आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी मोरेटोरियम सुविधेचा लाभ घेतलेला नाही, त्यांच्याकडून EMIवर घेतलेलं व्याजावरचं व्याज कॅशबॅकच्या स्वरुपात परत देणार असल्याचं केंद्रानं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयानंही ही सुविधा तात्काळ लागू करण्याच्या सल्ला दिला आहे. (Loan Moratorium Emi Interest Waiver Bank Return Cashback)

आता सरकारने 5 नोव्हेंबरच्या आधी प्रत्येकाला दिवाळी भेट देण्याची घोषणा केली आहे. कोरोना संकटामध्ये नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी रिझर्व्ह बँकेने यंदा 1 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत कर्जाचा हप्त्याला स्थगिती देण्याचा बँकांना सल्ला दिला होता. त्यानुसार काही बँकांनी सहा महिने हप्ते भरण्याला स्थगिती दिली होती. परंतु नंतर भरलेल्या EMIवर चक्रवाढ व्याजानं पैसे वसूल केले होते. आता केंद्रीय अर्थ मंत्रालयानं 23 ऑक्टोबरला या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने सांगितले की, केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा सर्व कर्जदारांना होणार आहे, त्यांनी सहा महिन्यांच्या हप्ते भरपाईतील सूट मिळवून घेतली असेल की नसेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच 29 फेब्रुवारीपर्यंत आकारलेल्या व्याजदरानुसार ही गणना केली जाणार आहे. सरकार हे पैसे एकरकमी देणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी जवळपास 6,500 कोटी रुपये खर्च करण्यात येऊ शकतात. गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, एमएसएमई, शिक्षण, क्रेडिट कार्डाची थकबाकी, ग्राहक टिकाऊ कर्ज आणि उपभोग कर्ज असे एकूण आठ प्रकारच्या कर्जधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मोरेटोरियमच्या 6 महिन्यांच्या मुदतीच्या कालावधीत चक्रवाढ व्याजातून साधारण व्याज कपात केल्यावर जी रक्कम शिल्लक राहणार आहे, ती कॅशबॅकच्या स्वरूपात कर्जदारांना परत केली जाणार आहे. ज्यांनी मोरेटोरियमचा फायदा घेतलेला आहे, त्यांना चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याजामध्ये जी रक्कम शिल्लक राहणार आहे, तेवढी रक्कम परत मिळणार आहे. उदाहरणार्थ मोरेटोरियमच्या 6 महिन्यांच्या कालावधीत तुम्ही 20 हजार रुपये भरलेले आहेत, म्हणजेच तुम्ही एकूण 1.20 लाख रुपये EMIच्या स्वरूपात जमा केलेले आहेत. समजा या 1.20 लाख रुपयांमध्ये 20 हजार रुपये व्याज आहे. व्याजावरील व्याजाच्या स्वरूपात 8 टक्के व्याजदराप्रमाणे वर्षाचे व्याज 1600 रुपये होते. अशा परिस्थितीत ग्राहकांना व्याजावरील व्याजाची परतफेड म्हणून 6 महिन्यांच्या EMIच्या रकमेवर सुमारे 800 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. पण वेगवेगळ्या कर्जांवर वेगवेगळे व्याजदर आकारले जातात.

संबंधित बातम्या : 

मोदी सरकारचं ग्राहकांना मोठं गिफ्ट; EMI मध्ये कर्जदारांना मोठा दिलासा

Loan Moratorium | कर्ज हप्त्यांच्या स्थगितीला दोन वर्ष मुदतवाढ शक्य, केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

Corona : लॉकडाऊनदरम्यान एसबीआयकडून एफडीवरील व्याजदरात कपात

(Loan  Moratorium Emi Interest Waiver Bank Return Cashback)

धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले.
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका.
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण...
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण....
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी.