तुम्ही कर्ज घेऊ इच्छित आहात? कर्ज घेण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे कर्ज तुमच्यासाठी योग्य ठरेल,आजच जाणून घ्या !!

आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्ज घेण्याची वेळ येते, अशा वेळी अनेकदा आपण कर्जाकरीता बँकेकडून लोन घेतो किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तींकडे कर्ज घेत असतो परंतु जर तुम्ही बँकेतून कर्ज घेत असाल तर आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कर्ज हे आपण अडीअडचणीच्या वेळी घेत असतो परंतु कर्ज हे प्रामुख्याने सिक्योर्ड आणि अनसिक्योर्ड या दोन प्रकारात ह्याचे वर्गीकरण केलेले असते, ज्यात सिक्योर्ड लोन हे मोठी रक्कम ,दीर्घ काळासाठी घेतली जाते तसेच या रकमेवरील कर्जाचा व्याजदर सुद्धा कमी असतो.

तुम्ही कर्ज घेऊ इच्छित आहात? कर्ज घेण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे कर्ज तुमच्यासाठी योग्य ठरेल,आजच जाणून घ्या !!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 1:32 PM

आपल्यापैकी अनेक जण अडीअडचणीच्या वेळी कर्ज घेत असतात परंतु कर्ज घेत असताना या कर्जाबद्दल काही माहिती आवश्यक असणे सुद्धा गरजेचे आहे परंतु आपल्यापैकी अनेकांना कर्ज म्हणजे काय असते? कर्जाचे वेगवेगळे प्रकार नेमके कोणते कोणते असतात? कर्ज भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी सुरक्षित आहे का? कोणत्या कर्जाचा व्याजदर कशा पद्धतीचा असतो याबद्दल अनेकांना माहिती नसते. कर्ज घेण्यापूर्वी कोणकोणत्या प्रकारचे कर्ज असते, लोन प्रॉडक्ट काय काय असतात, ह्या काही बाबी योग्य निर्णय घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला मदत करत असतात. आजच्या लेखामध्ये आपण बँक आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे लोन देते याबद्दल जाणून घेणार आहोत. भारतामध्ये अधिकांश लोकांना कर्ज घेणे म्हणजे आपली मजबुरी आहे असे वाटत असते परंतु असा विचार जर तुमच्या मनामध्ये सुद्धा येत असेल तर तो विचार काढून टाका. आपल्यापैकी अनेकांना एक गोष्ट माहिती नसते की वास्तविकतेमध्ये कर्ज फाइनेंशियल प्लानिंग (Financial Planning) चा एक मोठा हिस्सा असतो म्हणूनच अनेकदा यशस्वी असलेले लोक एक रणनीती म्हणून आपल्याकडे नगदी पैसे असल्यावर सुद्धा अनेक प्रकारचे वेगवेगळे कर्ज घेत असतात. आज आम्ही तुम्हाला कर्जाबद्दलची महत्वाची माहिती सांगणार आहोत तसेच कर्जाचे नेमके कोणकोणते प्रकार असतात. हे कर्ज कोणकोणती बँक आपल्याला कर्ज देते (types of Bank loans) हे जाणून घेणे सुद्धा भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. या माहितीचा स्त्रोत बजाज फिनसर्व, बैंक बाजार डॉट कॉम असून या वेबसाईटवर दिले गेलेल्या आर्टिकल वरून ही माहित घेण्यात आली आहे.

हे आहेत कर्जाचे प्रकार

कर्ज वापरण्याचा उद्देश लक्षात ठेवून दोन प्रकारच्या कॅटेगरीमध्ये विभागलेले असते ,पहिले कर्ज हे सिक्योर्ड लोन असते. खरे तर अशा प्रकारचे लोनमध्ये बँक कोणतीही मालमत्ता, प्रोपर्टी किंवा सिक्युरिटीच्या बदल्यांमध्ये हे कर्ज पूर्ववत असते. दिले जाणारे कर्ज ग्राहकाच्या परताव्याच्या क्षमतेवरच दिले जाते. जर अशा वेळी ग्राहकाने बँकेकडून घेतलेले कर्ज योग्य कालावधीमध्ये व मुदतीमध्ये फेडले नाहीतर बँक अशावेळी ग्राहकाने ज्या वस्तूवर कर्ज घेतलेले आहे ती वस्तू विकण्याचे हे सर्वस्वी अधिकार बँकेकडे असते म्हणूनच अशा प्रकारच्या कर्जाला सिक्योर्ड लोन असे म्हणतात. कारण बँकेची किंमत ही एका विशिष्ट किमतीपर्यंत मर्यादित असते तसेच दुसऱ्या प्रकारच्या लोनमध्ये ग्राहकाच्या भविष्यातील परतावा क्षमतेवर दिले जाते म्हणूनच या प्रकारच्या लोनमध्ये जोखीम सुद्धा जास्त असते आणि म्हणूनच या लोनला अनसिक्योर्ड लोन असे म्हंटले जाते. हे लोन अनसिक्योर्ड लोन असल्याने या लोनवरील रक्कम कमी मंजूर होते आणि या रक्कमेवर जास्त व्याजदर देखील आकारला जातो.

कोण कोणत्या प्रकारचे असतात सिक्योर्ड लोन

होम लोन: आपल्या सगळ्यांना घर खरेदी करतेवेळी जे लोन मिळते त्यालाच होम लोन असे म्हणतात परंतु तुम्हाला माहिती आहे का, होम लोन व्यतिरिक्त सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोन बँक आपल्याला देत असते. जसे की घर बांधण्यासाठी , जमीन खरेदी करण्यासाठी आपण कर्ज घेऊ शकतो.जमीन खरेदी करण्यासाठी वेगवेगळे बँकांचे नियम सुद्धा वेगवेगळे असतात.सरकारी स्कीममध्ये लागलेले प्लॉट व जमिनीवर बँक सहजच लोन उपलब्ध करून देते सोबतच जर तुमच्याकडे प्लॉट किंवा जमीन असेल तर घराच्या बांधकामासाठी आपल्याला सहज कर्ज मिळते. सरकारी कर्जाची रक्कम एकसाथ न चुकवता आपण घराच्या बांधकामासाठी घेतलेली जी रक्कम असते ती वेगवेगळ्या इंस्टॉलमेन्ट मध्ये फेडू शकतो तसेच घराच्या विस्तारीकरणासाठी व घर डागडुजी करण्यासाठी सुद्धा बँक आपल्याला कर्ज पुरविते.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (प्रॉपर्टी वर लोन):

आपल्या जवळ असलेली प्रॉपर्टी गहाण ठेवून लोन घेणे हे सिक्योर्ड लोनमधील सर्वात उत्तम पर्याय आहे. या लोनमध्ये प्रॉपर्टीचे बाजार मूल्य असते त्या मूल्यांच्या आधारावर आपल्याला कर्ज मिळते, जे अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या इन्कम वरून सुद्धा ठरवले जाते. बँक इन्कमच्या आधारावर प्रॉपर्टी मूल्याचे 50 टक्के ते 80 टक्के पर्यंत लोन मंजूर करते आणि अर्जदाराला ही रक्कम कर्ज म्हणून मिळते.

लोन अगेंस्ट सिक्योरिटी:

फिक्स डिपॉजिटस, पॉलिसी ज्यांची मॅच्युरिटी व्हॅल्यू असते त्यावर तुम्ही कर्ज घेऊ शकतात, जे सिक्योर्ड लोन म्हणून मानले जाते. म्युचुअल फंड्स आणि स्टॉक्सवर दिले जाणारे लोन सुद्धा सिक्योर्ड लोनच समजले जाते. खरेतर बँक यातील सर्वात जास्त सुरक्षित पर्याय म्हणजेच ब्लू चिप ,कंपनी डेट फंड्स वर जोर देते. सिक्योरिटी वर आधारित जर तुम्हाला लोन घ्यायचे असेल तर अशा वेळी आपल्या जवळील बँकेशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

गोल्ड लोन:

गोल्ड लोन सुद्धा एका प्रकारचे सिक्योर्ड लोन आहे. सिक्योर्ड असल्याने यावरील व्याजदर सुद्धा कमी असतो.

वेहिकल लोन:

वेहिकल लोन म्हणजेच गाडी ,मोटर यांच्यावर दिले जाणारे लोन.. अश्या प्रकारचे लोन प्रामुख्यानं गाडी खरेदी करते वेळी ,बँक गाडीचे पेपर बँक किंवा कर्ज देणाऱ्या संस्था आपल्याजवळ ठेवतात.कार वर इंश्योरेंस सुविधा सुद्धा मिळतात. अशावेळी जर एखादी घटना घडली तर त्या घटनेमुळे कर्जावरील रक्कम सुरक्षित राहण्याची शक्यता असते.

अनसिक्योर्ड लोन म्हणजे काय?

जी कर्जे महाग असतात त्यांना अनसिक्योर्ड लोन असे म्हंटले जाते कारण की या लोनला सिक्योर राखण्यासाठी बँके जवळ काही वस्तू ठेवण्याची गरज नाही.अनसिक्योर्ड लोन मध्ये पर्सनल लोन, कमी कालावधीत मिळवले जाणारे भांडवली लोन ज्यात कॅपिटल लोन, एजुकेशन लोन यांचा समावेश अनसिक्योर्ड लोनमध्ये केला जातो.

इतर बातम्या:

LIC IPO च्या दमदार प्रदर्शनासाठी केंद्र सरकारचा टेकू, विमा क्षेत्रात निर्गुंतवणुकीची मात्रा, विदेशी थेट गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारची कसरत

शेअर्स तारण ठेऊन मिळवा कर्ज, देशातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर करा व्यवहार 

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...