AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinod Agarwal : फाळणीचे अनुभवले चटके, सर्व संपल्यानंतर घेतली फिनिक्स भरारी, विनोद अग्रवाल यांची प्रेरणादायी कहाणी

Vinod Agarwal : फाळणीत सर्वकाही गमावलेल्या, गरिबीची चटके सहन केलेल्या व्यक्तीने 11,000 कोटी रुपयांचे साम्राज्य उभं करणे सोप्प काम नाही. विनोद अग्रवाल यांची ही प्रेरणादायी कथा अनेकांच्या मनाला उभारी देईल.

Vinod Agarwal : फाळणीचे अनुभवले चटके, सर्व संपल्यानंतर घेतली फिनिक्स भरारी, विनोद अग्रवाल यांची प्रेरणादायी कहाणी
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 7:37 PM

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान फाळणी (India-Pakistan Partitions) अनेकांसाठी कटू आठवणी आहेत. अनेकांना बरेच काही भोगले. तर अनेकांनी बरेच काही गमावले. दोन्ही देशातील जनता बेघर झाली. पाकिस्तानमधून अनेकांना कट्टरवाद्यांमुळे पलायन करावे लागले. हक्काचं घर, जमीन-जुमला तसाच मागे ठेवत जीव मुठीत घेऊन भारतात यावे लागले. पण या अनुभवातून तावून सलाखून निघत, काहींनी मोठी झेप घेतली. ते सोन्यासारखे चकाकले. त्यांनी स्वतःचे नशीब स्वतःचे लिहिले. अनेक उद्योजकांनी नशीब काढले. भारताचे यशस्वी उद्योजक विनोद अग्रवाल (Industrialist Vinod Agarwal) यांचा संघर्ष असाच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांची ही संघर्षाची कहाणी अनेकांच्या मनाला उभारी देणारी आहे.

भारतीय श्रीमंतांच्या यादीत समावेश विनोद अग्रवाल हे सध्या इंदुर शहरात राहतात. ते आयआयएफएल हुरुन या श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव आहे. त्यांच्याकडे 1,000 कोटींहून अधिकची संपत्ती आहे. विनोद अग्रवाल श्रीमंतांच्या यादीत 279 व्या क्रमांकावर आहेत. गेल्यावर्षी ते या यादीत 494 क्रमांकावर होते.

चढता आलेख डीएनएमधील अहवालानुसार, अग्रवाल कोल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे ते मालक आहेत. विनोद अग्रवाल यांची एकूण संपत्ती 6,000 कोटी रुपये आहे. गेल्यावर्षी त्यांची नेटवर्थ 4,000 कोटी रुपये होती. पण एकाच वर्षांत त्यांच्या नेटवर्थने मोठी झेप घेतली. त्यांच्या संपत्तीत 2,000 कोटी रुपयांची वाढ झाली. विनोद अग्रवाल यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 11,000 कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

इतका भरला कर विनोद अग्रवाल हे देशाच्या विकासाला पण मोठा हातभार लावत आहे. ते सरकारच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा करतात. दरवर्षी कर रुपाने ते मोठ्या रक्कमेचा भरणा करतात. 2022 मध्ये विनोद अग्रवाल यांनी 243 कोटी रुपयांचा प्राप्तिकर भरला. तर 625 कोटी रुपयांचा जीएसटी भरला होता.

दान करण्यात अग्रेसर विनोद अग्रवाल हे दानशूर आहेत. देशाच्या विकासातच नाही तर अनेक सामाजिक कार्यासाठी त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. त्यांनी कोट्यवधी रुपये अनेक सामाजिक कार्यासाठी दिले. विनोद अग्रवाल फाऊंडेशनने 2022 मध्ये 25 कोटी रुपयांचं दान केले होते. ते सर्वात मोठे करदाते आहेतच पण त्यांनी मोठी संपत्ती दान केली आहे.

फाळणीनंतर इंदूरमध्ये विनोद अग्रवाल यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी हालकीचे जीवन काढले. पाकिस्तानमध्ये त्यांच्या वाडवडिलांची मोठी संपत्ती होती. पण फाळणीनंतर सर्वकाही गमावून अवघ्या तिसऱ्या वर्षी ते भारतात दाखल झाले. काही आप्तेष्टांसह त्यांनी इंदूर शहर गाठले. छोटी-मोठी कामं करत त्यांनी यशाला गवसणी घातली.

'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.