Gold Silver Price Today : शंबर नंबरी सोनं! खरेदीदारांचं नशीब पालटलं, दोन हजारांनी झालं स्वस्त
Gold Silver Price Today : सध्या गुंतवणूकदारांना सोने आणि चांदीने आकर्षित केले आहे. यातील गुंतवणूक फायदेशीर असेल अनेकांना वाटते. गेल्या काही महिन्यात सोने 50,000 रुपयांवरुन 59,000 रुपयांच्या आसपास पोहचले होते. तर चांदीनेही लांब उडी मारली होती. पण सोन्याने एका महिन्यात रिव्हर्स गिअर टाकला आणि हा भाव तीन हजारांच्या आसपास घसरला आहे.
नवी दिल्ली : देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. भारतीय मुळातच उत्सवप्रेमी असल्याने आनंद साजरा करण्यात ते कुठलीच कसर ठेवत नाही. मागील काही महिन्यांपेक्षा सध्या सोन्या-चांदीचा भाव (Gold Silver Price) जास्त असला तरी यापूर्वी या किंमती धातूंनी गाठलेल्या उच्चांकापेक्षा हा भाव नरमला आहे. सध्या गुंतवणूकदारांना सोने आणि चांदीने आकर्षित केले आहे. यातील गुंतवणूक (Investment) फायदेशीर असेल अनेकांना वाटते. गेल्या काही महिन्यात सोने 50,000 रुपयांवरुन 59,000 रुपयांच्या आसपास पोहचले होते. तर चांदीनेही लांब उडी मारली होती. पण सोन्याने एका महिन्यात रिव्हर्स गिअर टाकला आणि हा भाव तीन हजारांच्या आसपास घसरला आहे. या आठवड्यातील भावात चढउतार दिसून आला. पण सध्या खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी आहे, हे नक्की.
सध्या सोन्याचा भाव 56000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 64000 रुपये प्रति किलो आहे. गेल्या आठवडाभरात दोन्ही किंमतीत धातूत चढउतार दिसून आला. प्रत्येक दिवशी सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून येत होता. काही दिवस सोन्याच्या भाव वधारले तर काही दिवस भावात नरमाई दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार 22 कॅरेट सोन्यात 50 रुपयांनी वाढ होऊन भाव 51,950 रुपये, तर 24 कॅरेट सोन्यात घसरण 50 रुपयांची होऊन किंमत 56,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) आठवड्यातील पाच दिवस सोन्या-चांदीचे भाव जाहीर करते. त्यातही सर्व कॅरेटचे भाव जाहीर करण्यात येतात. त्यानुसार भावात तब्बल 30,000 रुपयांपर्यंत तफावत दिसते. शुद्ध सोन्याचा भाव सर्वाधिक आहे. मिश्रीत सोन्याचा वापर कमी होत असला तरी त्याचा भाव 30-32 हजारांच्या घरात आहे. शनिवार-रविवारी आयबीजेए कुठलाही दर जाहीर करत नाही. सोमवारी आता नवीन दर जाहीर करण्यात येतील.
या आठवड्यात सोन्याची चाल
- या शुक्रवारी सोन्याचा भाव 16 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. सोने 56103 रुपये झाले
- गुरुवारी सोने 53 रुपये प्रति 10 स्वस्त होते. हा भाव 56,087 रुपये होता
- या आठवड्यात बुधवारी सोने 590 रुपये प्रति 10 महागले होते. हा भाव 56140 रुपये होता
- मंगळवारी सोने 116 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले. सोन्याची किंमत 55550 रुपये होती
- पहिल्या दिवशी सोमवारी सोने 291 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन भाव 55666 रुपये होता
या आठवड्यात चांदीची चमक
- या शुक्रवारी चांदीच्या किंमतीत तेजी होती. 433 रुपयांनी चांदी महागली. भाव 64,139 रुपये प्रति किलोवर बंद झाले
- गुरुवारी चांदीत 540 रुपयांची घसरण झाली. भाव 63,706 रुपये प्रति किलोवर पोहचले
- बुधवारी चांदीने उसळी घेतली. भाव 1239 रुपयांनी वधारुन 64,246 रुपये प्रति किलो झाले
- मंगळवारी चांदी 439 रुपयांनी नरमली. भाव 63007 रुपये प्रति किलो झाले
- पहिल्या दिवशी सोमवारी चांदीत 885 रुपयांची घसरण होऊन किंमत 63,4466 रुपये प्रति किलो झाले