कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी Good News, रोज फक्त 28 रुपयांच्या खर्चावर मिळवा बक्कळ पैसे
ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी LIC ची मायक्रो विमा योजना (Micro Insurance Plan) खास ठरणार आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या या कठीण काळात सगळ्यांवरच आर्थिक (financial) अडचण ओढावलं आहे. यामध्ये दैनंदिन खर्च आणि भविष्याची बचत (Saving) करणं अवघड होऊन बसलं आहे. पण आता बचत करण्याची चिंता सोडा. कारण, भारतीय जीवन विमा महामंडळाची (LIC) मायक्रो बचत विमा पॉलिसी (Micro Bachat Insurance Policy) तुमच्यासाठी सगळ्यात फायद्याची आहे. ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी LIC ची मायक्रो विमा योजना (Micro Insurance Plan) खास ठरणार आहे. (low income group invest 28 rupee daily in lic bachat scheme know benefits)
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये संरक्षण आणि बचत एकत्र मिळणार आहे. या योजनेमुळे अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक सहकार्य मिळेल. तसंच पॉलिसी मॅच्युरिटीनंतर एकमुखी रक्कम दिली जाईल. जाणून घेऊयात योजनेबद्दल सर्व काही…
(1) कर्ज घेण्याची सुविधा – मायक्रो सेव्हिंग नावाच्या या नियमित प्रीमियम योजनेमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. योजनेत 50 हजार ते 2 लाखांचा विमा उपलब्ध असेल. ही नॉन-लिंक्ड विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत लॉयल्टीचा फायदादेखील उपलब्ध असेल. जर एखाद्याने 3 वर्षांसाठी प्रीमियम दिला असेल तर त्याला मायक्रो सेव्हिंग्ज प्लॅनमध्ये कर्जाची सुविधा देखील मिळेल.
(2) कोण घेऊ शकतं योजनेचा लाभ? – ही विमा योजना फक्त 18 ते 55 वयोगटातील लोकांसाठी आहे. याअंतर्गत मेडिकल तपासणीची आवश्यकता नाही. जर सलग 3 वर्ष तुम्ही प्रीमियम भरला आणि नंतर काही कारणामुळे तुम्हाला प्रीमियम भरणं शक्य झालं नाही तरी पुढच्या 6 महिन्यांसाठी विम्याची सुविधा सुरू राहिल. जर पॉलिसी होल्डरने 5 वर्षांपर्यंत सलग प्रीमियम भरला तर त्याला 2 वर्षांचा ऑटो कव्हर मिळेल. तर या योजनेची संख्या 851 आहे.
(3) किती वर्षांचा असेल पॉलिसी टर्म? – या योजनेचा पॉलिसी टर्म 10 से 15 वर्षांचा असेल. या योजनेत वर्ष, अर्धवार्षिक, तिमाही आणि मासिक आधारावर प्रीमियम भरू शकता. यामध्ये तुम्हाला LIC अॅक्सिडेंटल राइडर जोडण्याची सुविधा देखील मिळेल. पण यासाठी तुम्हाला एक स्वतंत्र प्रीमियम भरावा लागेल. (low income group invest 28 rupee daily in lic bachat scheme know benefits)
4) रोज 28 रुपयांमध्ये मिळेल 2 लाखांचा विमा – या योजनेअंतर्गत 18 वर्षांच्या वयोगटातील व्यक्ती जर 15 वर्षांचा प्लान घेतो तर त्याला प्रति हजार 51.5 रुपये प्रीमियम द्यावा लागेल. तर 25 वयोगटातील व्यक्तीला याच प्लानसाठी 51.60 रुपये आणि 35 वयोगटातील व्यक्तिला 52.20 रुपये प्रीमियम प्रति हजार रुपये भरावा लागेल. 10 वर्षांच्या प्रिमियम 85.45 ते 91.9 रुपये प्रति हजार रुपये असेल. प्रीमियममध्ये 2 टक्क्यांची सूटही मिळू शकते. जर विमा खरेदी केल्यानंतर आवडत नसेल तर आपण 15 दिवसांच्या आत योजना सरेंडर करू शकता. जर 35 वर्षांची व्यक्ती 1 लाख रुपयांच्या रकमेसह 15 वर्षाची पॉलिसी घेत असेल तर त्याचे वार्षिक प्रीमियम 5116 रुपये होईल. सध्याच्या पॉलिसीमध्ये 70 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल.
(5) कसं आहे योजनेचं गणित – जर एखाद्या 35 वयोगटातील व्यक्तीने 15 वर्षांसाठी पॉलिसी घेतली तर त्याला वर्षाला 52.20 रुपये (विम्याच्या रकमेवर 1 हजार रुपये) प्रीमियम भरावा लागेल. याअंतर्गत जर कोणी 2 लाख रुपयांची विमा रक्कम भरत असेल तर त्याला वर्षाला 52.20 x 100 x 2 म्हणजे 10,300 जमा करावे लागतील. म्हणजेच रोजचे 28 रुपये आणि महिन्याला 840 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल.
(6) प्रीमियमच्या भरण्यावर कलम 80C अंतर्गत मिळेल सूट – या दरम्यान, कर्जावर 10.42 टक्के दराने व्याज द्यावं लागेल. प्रीमियम भरण्यासाठी 1 महिन्याची सूट असेल. या पॉलिसीसाठी मॅच्युरिटीचं कमाल वय 70 वर्षे असायला हवं. ही लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे, त्यामुळे तुम्हाला प्रीमियम पेमेंटवर कलम 80C अंतर्गत आयकरात सूट मिळेल.
संबंधित बातम्या –
दिवाळीपूर्वीच ग्राहकांची दिवाळी, सोनं 6 हजारांनी स्वस्त
रोज 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर व्हा 14 लाखांचे मालक, जाणून घ्या काय आहे योजना?
VIDEO : सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 8 October 2020https://t.co/rGkTSVSZ7E
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2020
(low income group invest 28 rupee daily in lic bachat scheme know benefits)