घराचे बजेट कोलमडले….आजपासून या वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ, जाणून घ्या नेमक्या कोणत्या वस्तू महागल्या!

आजपासून दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ (LPG Gas Cylinder price) केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आजपासून 105 रुपयांनी वाढ झाली आहे.

घराचे बजेट कोलमडले....आजपासून या वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ, जाणून घ्या नेमक्या कोणत्या वस्तू महागल्या!
आजपासून या वस्तूंच्या किंमतीमध्ये होणार मोठी वाढ
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 10:12 AM

मुंबई : आजपासून दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ (LPG Gas Cylinder price) केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आजपासून 105 रुपयांनी वाढ झाली आहे. 14 किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. याशिवाय अमूल दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी  (Amul milk price) वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी FMGC कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL products) ने फेब्रुवारीमध्ये आपल्या उत्पादनांच्या किमतीत दोनदा वाढ केली आहे. वाढलेल्या किंमतीचा परिणाम या महिन्यात तुमच्या घरच्या बजेटवर दिसून येईल. नवीन उत्पादन महाग होईल.

  1. किंमतीत 105 रुपयांनी वाढ झाल्यानंतर नवी दिल्लीत 19.2 किलो गॅस सिलिंडरचा नवीन दर 2,012 रुपये झाला आहे. नवीन किमती 1 मार्च 2022 पासून लागू झाल्या आहेत. 5 किलोच्या सिलिंडरच्या दरातही 27 रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत 5 किलोच्या सिलेंडरची किंमत 569 रुपये असेल.
  2. गुजरातमधील डेअरी ब्रँड अमूलने आपल्या उत्पादनाच्या किमतीत रु.2 ने वाढ केली आहे. नवीन दर देशभर लागू होणार असून आजपासून ते लागू होणार आहेत. यापूर्वी जून 2021 मध्ये अमूलने किंमतीत 2 रुपयांनी वाढ केली होती. चालू आर्थिक वर्षातील ही दुसरी वाढ आहे.
  3. फेब्रुवारी महिन्यात सर्वसामान्यांना महागाईचा जोरदार झटका बसला आहे. देशातील सर्वात मोठी FMGC कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने फेब्रुवारीमध्ये लाइफबॉय, लक्स आणि पिअर्स साबणांच्या व्यतिरिक्त सर्फ एक्सेल मॅटिक, कम्फर्ट फॅब्रिक कंडिशनर, डोव्ह बॉडी वॉश या ब्रँडच्या स्टॉक ठेवण्याच्या युनिट्सच्या किंमतीत आणखी वाढ केली आहे.

संबंधित बातम्या : 

LPG Gas Cylinder Price: गॅस सिलिंडर 105 रुपयांनी महागला, येथे जाणून घ्या नवीन दर!

एलआयसीच्या आयपीओत सूट पाहिजे… आजच ‘या’ गोष्टींची पूर्तता करा…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.