Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Subsidy Updates News : LPG सबसिडीला मुकलात, सोपीच तर आहे प्रक्रिया, पैसे येतील बँक खात्यात

Get LPG Subsidy News : विनाअनुदानित एलपीजी आता दिल्ली आणि मुंबईतील ग्राहकांना (14.2 किलो सिलिंडर) 1053 रुपयांना उपलब्ध आहे. तर कोलकात्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये मिळत आहे. एलपीजी गॅस सबसिडी अशा प्रकारे तपासा, LPG सबसिडी मिळत नसेल तर हे सोपे काम करा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.

LPG Subsidy Updates News : LPG सबसिडीला मुकलात, सोपीच तर आहे प्रक्रिया, पैसे येतील बँक खात्यात
सबसिडी मिळविण्याची सोपी पद्धतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 10:00 AM

LPG Subsidy Updates : एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे जनता नाराज आहे. किचनचे बजेट वाढले आहे पण पगार मात्र त्या पटीने वाढत नाही. अलिकडेच विनाअनुदानित एलपीजीच्या किमतीत पुन्हा 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 3.5 रुपयांनी वाढली होती. तेव्हा एका सिलिंडरची किंमत 1,003 रुपये झाली होती.त्यापूर्वी एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपये होती. महिनाभराआधीच सिलिंडरच्या किमतींनी एक हजार रुपायांच्या आकडा पार केला होता. त्यानंतर आता थेट 50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे गृहिणींच्या बजेटवर मोठा परिणाम होणार आहे. 5 किलोच्या छोट्या सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे, त्यात 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 8.50 रुपयांनी कमी केली आहे. अशात उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Scheme) लाभधारकांना गॅसवर सबसिडी ((lpg subsidy online check)) देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. याशिवाय सर्वसामान्य ग्राहकांच्या ही खात्यावर नाममात्र एलपीजी सबसिडी मिळते. परंतू, काही कारणाने ही सबसिडी बंद झाल्यास, LPG सबसिडी मिळत नसेल तर हे सोपे काम करा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.

या लाभार्थ्यांना 853 रुपयांना एलपीजी सिलिंडर

विनाअनुदानित एलपीजी आता दिल्ली आणि मुंबईतील ग्राहकांना (14.2 किलो सिलिंडर) 1053 रुपयांना उपलब्ध आहे. तर कोलकात्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये मिळत आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सिलिंडरसाठी 853 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala yojana) गरीब महिला लाभार्थ्यांना केंद्र सरकार अजूनही अनुदानाचा लाभ देत आहे. त्यांना सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा कमी दरात एलपीजी सिलिंडर देते.

हे सुद्धा वाचा

एलपीजी गॅस सबसिडी अशा प्रकारे तपासा

  1. सर्व प्रथम www.mylpg.in ही वेबसाइट मोबाइल किंवा डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर उघडा
  2. स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला गॅस कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल
  3. येथे तुम्ही तुमच्या सेवा पुरवठादाराच्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करू शकता
  4. स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल. हे तुमच्या गॅस सेवा प्रदात्याचे पृष्ठ आहे
  5. आता वरच्या उजव्या बाजूला साइन-इन आणि नवीन वापरकर्ता पर्यायावर क्लिक करा
  6. तुम्ही तुमचा आयडी येथे आधीच तयार केला असल्यास, साइन इन करा. जर तुम्ही अद्याप आयडी तयार केला नसेल, तर नवीन वापरकर्त्यावर क्लिक करून वेबसाइटवर लॉग इन करा
  7. आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल. यामध्ये उजव्या बाजूला View Cylinder Booking History वर क्लिक करा
  8. तुम्हाला कोणत्या सिलिंडरवर किती सबसिडी देण्यात आली आहे हे येथे तुम्हाला कळेल. जेंव्हा सबसिडीचे पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात
  9. यासोबतच जर तुम्ही गॅस बुक केला असेल आणि तुम्हाला सबसिडीचे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला फीडबॅक बटणावर क्लिक करावे लागेल
  10. येथे तुम्ही सबसिडीचे पैसे न मिळाल्याबद्दल तक्रार देखील करू शकता
  11. 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.