ज्यासाठी अर्थसंकल्प मांडतात, तेच नव्हते, देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्पाची ‘सोप्या भाषेत’ चिरफाड

अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis attacks Maharashtra budget 2020) यांनी टीकास्त्र सोडलं.

ज्यासाठी अर्थसंकल्प मांडतात, तेच नव्हते, देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्पाची 'सोप्या भाषेत' चिरफाड
Follow us
| Updated on: Mar 06, 2020 | 1:46 PM

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis attacks Maharashtra budget 2020) यांनी टीकास्त्र सोडलं. फडणवीसांनी तीन दिवसापूर्वीच अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्यानुसार फडणवीसांनी अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाची सोप्या भाषेत चिरफाड केली. (Devendra Fadnavis attacks Maharashtra budget 2020)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अर्थमंत्र्यांच्या नावाखाली अर्थमंत्र्यांचं जाहीर सभेतील भाषण आम्ही ऐकलं. हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वल पोकळ भाषण, त्याव्यतिरिक्त काहीच नाही. पहिल्यांदाच अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये केवळ भाषण होतं, कुठलीही आकडेवारी नव्हती. आर्थिक स्थितीबाबत कुठलंही विश्लेषण नव्हतं. मागील वर्षाचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स नव्हता. ज्यासाठी आर्थसंकल्प मांडतात, तेच यात नव्हते”

“प्रचंड मोठी आर्थिक तूट आहे, ती यावर्षी अधिक वाढणार आहे. त्याबाबत काहीच उल्लेख नाही. अर्थसंकल्पाचा बॅलन्स पाहायला मिळाला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थमंत्र्यांना आणि सरकारला विसर पडलाय की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे महाराष्ट्रातच आहेत. मात्र या तीनही विभागांना या अर्थसंकल्पात काहीही नाही. कोकणाचं नाव घेतलं,  मात्र विदर्भाचं नावही घेतलं नाही”, असा हल्लाबोल फडणवीसांनी केला.

मराठवाडा वॉटरग्रीड हा आमचा महत्तावाचा प्रकल्प 20 हजार कोटींचा होता, मात्र या सरकारकडून केवळ 200 कोटींची तरतूद केली आहे.  आम्ही सिंचनासाठी जी योजना आणली होती, त्यामध्ये कोकणातून वाहून जाणारं 168 टीएमसी पाणी उचलायचं ते पाणी गोदावरी खोऱ्यात आणून, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करायचं. पैणगंगा-नळगंगा प्रकल्पातून विदर्भाला दुष्काळमुक्त करायचं होतं. याचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही, असं फडणवीस म्हणाले.

या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. मुदतकर्जाबाबत कोणतीही घोषणा नाही. पीक कर्जाशिवाय काहीच नाही, त्यामुळे शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणारच नाही, असं फडणवीसांनी सांगितलं.

शेतकऱ्यांसाठी आम्ही जी योजना आणली, दीड लाख भरा दीड लाख आम्ही भरु, त्यावर टीका झाली, मात्र तीच योजना आज यांनी आणली. मुख्यमंत्र्यांनी बांधावर जाऊन हेक्टरी मदतीचं वचन केलं होतं. पण अवकाळीग्रस्त शेतकऱ्याला एक नवा पैसाही दिला नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आमच्या काळात कर्जाचा बोजा वाढला म्हणणाऱ्यांनी 2009 ते 2014 काळात कर्ज 63 टक्के वाढलं होतं, आमच्या काळात 60 टक्के वाढलं. आम्ही 2 लाख हजार कोटीपेक्षा जास्त पायाभूत प्रकल्प सुरु केले. आम्ही त्यावर खर्च केला, असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं.

केंद्राच्या भरवशावर घोषणा

आजच्या अनेक घोषणा केंद्र सरकारच्या भरवशावर आहेत. दहा हजार गावांना पाणीपुरवठा ही केंद्राची योजना आहे. त्यासाठी केंद्र शंभर टक्के निधी देणार आहे. पुणे रिंगरोडसाठी सर्व पैसा केंद्राचा, नितीन गडकरी देणार आहेत. मात्र या सरकारने केंद्र सरकारवर टीका करत नकारात्मक सुरुवातीवर धन्यता मानली, असा आरोप फडणवीसांनी केला.

पेट्रोल महागल्याने सर्व महागणार

पेट्रोलवर 1 रुपया अधिभार लावला आहे. मात्र त्याचा बोजा सर्वसामान्यांवर पडणार आहे. कारण पेट्रोल महागल्याने वाहतूक महागणार, मालवाहतूक महागणार, ट्रॅक्टरसह सर्व वाहतुकीवर परिणाम होईल, असं फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी कोणत्याही नव्या घोषणा नाहीत. पायाभूत सुविधांसाठी कोणतीही योजना नाही. ग्राम सडक योजना 30 हजार किमी होती आता 40 हजार किमी करु म्हणतात. पण केवळ 1500 कोटींची तरतूद केली आहे. इतक्या कमी रकमेत 40 हजार किमी रस्ता कसा होणार, असा सवाल फडणवीसांनी विचारला.

जलयुक्त शिवार

जलयुक्त शिवारसारखी योजना बंद केली, त्यावेळी मी म्हणालो होते की हे पुन्हा नव्या नावाने ही योजना आणतील. तसंच झालं आहे. यांनी मुख्यमंत्री जलसंधारण योजना आणली आहे, मात्र ती आमचीच जलयुक्त शिवार योजना आहे, नव्या नावाने का होईना पण ती योजना येत आहे याचं समाधान आहे, असं फडणवीस म्हणाले.

निव्वल पोकळ भाषण

अर्थसंकल्पात केवळ घोषणा होत्या. दहा लाख तरुणांना रोजगार म्हणतात, मात्र तो रोजगार नाही तर 11 महिन्यांचं प्रशिक्षण आहे. मात्र केंद्राने 3 वर्षापूर्वी तसा कायदा केल्याने ठाकरे सरकारने नवं काही केलेलं नाही. आमच्याच योजना नव्याने यांनी आणल्या आहेत. केवळ मंदीची भीती दाखवली आहे. मंदी म्हटलं तर अर्थव्यवस्था मायनसमध्ये गेली पाहिजे होती. निव्वल पोकळ भाषण, त्याव्यतिरिक्त काहीच नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.