Maharashtra Budget 2022 LIVE Updates : देवेंद्र फडणवीस आशिष शेलार राज्यपालांच्या भेटीला 

| Updated on: Mar 12, 2022 | 12:31 AM

आज महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जाणून घेऊयात अर्थसंकल्पासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट

Maharashtra Budget 2022 LIVE Updates : देवेंद्र फडणवीस आशिष शेलार राज्यपालांच्या भेटीला 
Image Credit source: tv9 marathi

आज महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच लागले आहेत. या पाचही राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. पाचपैकी चार राज्यात भाजपाने बाजी मारली आहे. तर दुसरीकडे पुढील काळात राज्यातल्या अनेक शहरातील महापालिकांच्या निवडणुका देखील होणार आहेत. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासासंदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच सामान्य माणसांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Mar 2022 06:31 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस आशिष शेलार राज्यपालांच्या भेटीला 

    देवेंद्र फडणवीस आशिष शेलार राज्यपालांच्या भेटीला

    देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांच्या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा

    नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा फडणवीस मांडण्याची शक्यता

  • 11 Mar 2022 05:04 PM (IST)

    ओबीसी आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यातील दुरुस्ती विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी

    ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडे 1994 पूर्वीचा प्रभाग रचनेचा जो अधिकार होता

    निवडणूक आयोगकडील प्रभाग रचनेचा कायदा केला होता

    कायद्याला राज्यपालांची मंजुरी मिळणं आवश्यक होतं

    त्यासाठी एकनाथ शिंदे, छगन भुजबळ  आणि मी राज्यपालांची भेट घेतली

    राज्यपालांनी त्या कायद्यावर स्वाक्षरी घेतली आहे

    सहा महिन्यापेक्षा अधिक निवडणुका पुढं जाऊ शकत नाही त्यामुळं आम्ही सहा महिन्यात माहिती पूर्ण करु

  • 11 Mar 2022 05:01 PM (IST)

    सर्व घटकांच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : एकनाथ शिंदे

    समृद्धी महामार्ग आम्ही वाढवतोय

    मुंबई सिंधुदुर्ग कोस्टल हायवे आहे त्याचं चौपदरीकरण करतोय

    कोकणातील निसर्गरम्य परिसर आहे त्यामुळं पर्यटनाला चालना मिळेल

    दळवळण यंत्रणा आहे त्याला चालना देतोय

    मेट्रोची काम पूर्ण करण्याचे प्रयत्न

    नगरविकास विभागाला 9 हजार कोटींचा निधी

    सर्व घटकांना चालना देणारा अर्थसकंल्प

    गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागात विकासकामं

  • 11 Mar 2022 04:13 PM (IST)

    हे आकडे सगळे फसवे आहेत : देवेंद्र फडणवीस

    हे आकडे सगळे फसवे आहेत

    कृषी विकास दराच्या बाबतीत ते सागंतात

    महाराष्ट्रानं यापेक्षा अधिक कृषी विकास दर पाहिलाय

  • 11 Mar 2022 03:44 PM (IST)

    विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र बजेटमध्ये दिसत नाही : देवेंद्र फडणवीस

    सरकारी पक्षानं विरोधकांसाठी इंटरनेट बंद केलेलं दिसतंय  : देवेंद्र फडणवीस

    गोपीचंद पडळकर यांची घोषणाबाजी

    कळसूत्री सरकारनं विकासाचं पंचसूत्री मांडण्याचा जो प्रयत्न केलाय त्यानं काय होणार नाही. या सरकारनं महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्त्वात विलीन केलंय.

    महाराष्ट्राच्या सर्व घटकांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम सरकारनं केलंय,

    हे बजेट महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणार काम होऊ शकत नाही

    वृत्तपत्रात चौकट येतील, चार बातम्या होऊ शकतात

    आमच्या काळात सुरु असलेल्या योजना या बजेटमध्ये पुन्हा सांगायच्या

    आमच्या योजना बंद करणाऱ्या सरकारनं पुन्हा त्या सुरु केल्या

    समृद्धी महामार्गला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा विरोध होता

    शेतकऱ्यांना या बजेटनं काय दिलं नाही

    दोन वर्षापूर्वी जी घोषणा करण्यात आली होती ती 50 हजार रुपयांचं अनुदान जाहीर

    आम्ही शेतकऱ्यांना कर्ज देतोय सांगतोय.  कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळालं नाही

    कोरोना काळात सर्वाधिक रुग्ण मृत्यूमुखी पडलेल्या राज्याचं सरकार कशाच्या आधारावर आपली पाठ थोपटून घेतंय

    काही योजना सोडल्या तर समाजातील कोणत्याही घटकांना दिलासा मिळालेला नाही

    पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यासाठी फुटकी कवडी देण्यात आली नाही

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन मोर्चा काढणार का?

    मराठवाडा ग्रीडला निधी देण्यात आलेला नाही,

    दुष्काळमुक्तीसाठी निधी देण्यात आलेलं नाही

    विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र बजेटमध्ये दिसत नाही

    काही मतदारासंघाचं सरकार, काही लोकांचं सरकार

    केंद्र सरकारच्या योजना घोषित करण्यात आलेल्या आहेत

    या बजेटनं सामान्य माणसाची निराशा

  • 11 Mar 2022 03:33 PM (IST)

    यूक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणाम होईल : अजित पवार

    यूक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणाम होईल

    त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार

    नरेंद्र मोदी यांनी देखील महागाई वाढणार असं सांगितलं

  • 11 Mar 2022 03:28 PM (IST)

    एसटीच्या ताफ्यात 3 हजार नवीन बसेस, राज्य सरकारची एसटीला भेट 

    एसटीच्या ताफ्यात 3 हजार नवीन बसेस येणार राज्य सरकार देणार

    पर्यावरणपूरक आणि सीएनजी, इलेक्ट्रिक वर आधारित असतील

    उर्जा विभागाला महत्त्व दिलंय

    2500 मेगावॅट सौर निर्मिती प्रकल्प

    मुंबई बाहेरील शहरांमध्ये झोपडपट्टी विकासाला प्राधान्य

    कोरोना काळात विधवा झालेल्यां महिलांना शून्य टक्के व्याजानं कर्ज देण्यात येणार

    शेतकऱ्यांच्या वीज बिलासंदर्भात मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत

  • 11 Mar 2022 03:24 PM (IST)

    महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल दाखवणारा अर्थसंकल्प : उद्धव ठाकरे

    आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपत्तींना तोंड देत विकासाला पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहोत. जे जे करण्यासारखं शक्य आहे ते  करत आहोत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प राज्यातील जनतेचाा, भगिनींचा विकास करणारा हा अर्थसंकल्प आहे. जनता देखील या अर्थ संकल्पाचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं

    आमच सरकार आलं आणि जगावर कोरोना आला. जगावर, भारतावर आणि देशातील प्रत्येक राज्यावर आर्थिक अडचण आली.

    आपल्याला कर्ज घेण्यासाठी साडेतीन टक्क्यांची मुभा ठेवली होती मात्र 3 टक्के  मर्यादेत कर्ज घेतलीय

    कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, वाहतूक दळणवळण आणि उद्योग

    राज्याच्या सर्वांगीण विकासासचा अर्थसंकल्प

    कृषी प्रधान देश असल्यामुळं

    नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा निधी 20 लाख शेतकऱ्यांना देणार  यासाठी 10 हजार कोटी रुपये देणार

    भूविकास बँकांचे थकबाकीदार शेतकरी, कर्मचारी यांना, 914 कोटी रुपये कर्जमाफी , अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी 275 कोटी

    शेततळं विकासासाठी 75 हजार रुपये

    शून्य टक्के व्याजानं पीक कर्ज पुरवठा

    20 हजार 761 सोसायटीचं संगणकीकरण होणार, 950 कोटी रुपये खर्च करणार

    शेतीचं पाणी पिण्याचं पाणी असेल त्यासाठीची गरज भागवलीय

  • 11 Mar 2022 03:17 PM (IST)

    राज्यात सीएनजी स्वस्त होणार 

    राज्यात सीएनजी स्वस्त होणार

    सीएनजी 13.5  टक्क्यांवरुन 3.5  टक्क्यांवर

  • 11 Mar 2022 03:13 PM (IST)

    24 हजार 353 कोटी महसुली तूट असणारा अर्थसंकल्प : अजित पवार

    2021-22 वर्षाच्या सुधारित अंदाजात वाढ

    महसुली जमा 4लाख 3 हजार 427 कोटी

    महसुली खर्च 4 लाख 27 हजार 780 कोटी अंदाजित

    24 हजार 353 कोटी महसुली तूट येत आहे

    अर्थव्यवस्थेची गती मंदावलीय, मात्र विकासाची पंचसुत्री अंतर्गत

  • 11 Mar 2022 02:58 PM (IST)

    रायगड किल्ला व परिसर विकासासाठी 100 कोटी

    जलजीवन मिशन योजनेसाठी 1 हजार 600 कोटी

    मुख्यमंत्री ग्रामीण  पेय जल मिशन साठी

    पाणीपुरवठा विभागाल 3 हजार कोटी रुपये

    कोयना धरण परिसरात दर्जेदार जलपर्यटन प्रकल्प

    मुंबई, पुणे आणि नागपूर येथे हेरिटेज वॉक

    पालघरला पर्यटन स्थळाचा ब वर्ग दर्जा

    अजिंठा वेरुळ साठी सर्वांगीण विकास आराखडा

    आधुनिक सामुहिक सुविधा केंद्र

    लोणावळा टायगर पॉईंट येथे स्कायवॉक आणि इतर सुविधा

    रायगड किल्ला व परिसर विकासासाठी 100 कोटी

    राजगड तोरणा, शिवेनेरी, सजगड, विजय दुर्गसाठी 14 कोटी

    शिवडी आणि सेंटजॉर्जच्या विकासासाठी 7 कोटी

    किल्ले आणि युद्धपद्धतीसाठी युनेस्कोकडे मागणी

    स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव उपक्रम सुरु  त्यासाठी 500 कोटी

    गेट वे ऑफ इंडियावर महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारी फिल्म

    औरंगाबाद येथे वंदे मातरम सभागृह उभारणार 43 कोटी

    सांस्कृतिक विभागासाठी 195  कोटी

    पोषणतत्वे गुणसंवर्धित तांदूळ उपलब्ध करुन देण्यासाठी योजना राबवण्यात येणार

    प्रजासत्ताक दिनाला दिलेल्या महाराष्ट्राच्या एनसीसीच्या पथकानं पटकावला, पृथ्वी पाटील यांचं अभिनंदन

    एनसीसीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलिस दलात सहभाग

    अमंलदारांच्या मासिक कमांडो भत्ता वाढवण्यात येणार

    गडचिरोलीत विशेषोपचार केंद्र

    महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राज्यभरात राबवण्यात येणार

    अष्टविनायक मंदीर सर्वांगीण विकास आरखडा 50 कोटी

    पंढरपूरच्या विकास आरखड्यासाठी निधी देण्यात येणार

    सारथीला 250 कोटी

    वनक्षेत्रात 20 चौरस किलोमीटरची वाढ

    चंद्रपूरमध्ये व्याघ्र सफारी सुरु करण्यात  येणार

    महाराष्ट्र जलकोष प्रकल्पाला 286 कोटी रुपये

    चिंतामणराव देशमुख यांच्या स्मरणार्थ रोहा येथे वन व वनव्यवस्थापन उद्यान

    माझी वसुंधरा अभियान योजनेला चांगला प्रतिसाद

    23 नद्यांचे संवर्धानेच प्रस्ताव त्यासाठी 250 कोटी प्रस्तावित

    मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न

    मुंबईत मराठी भाषा भवन 100 कोटी रुपये खर्च करण्यात येणार

    नवी मुंबईतील ऐरोलीत 25 कोटी

    दुकानांवरील फलक मराठीत

    प्रत्येक जिल्ह्यात 1 पुस्तकाचं गाव

    मराठवाड्यात मुक्तिसंग्रामाची माहिती देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार 75 कोटी

    जेष्ठ पत्रकारांना पेन्शन साठी 50 कोटी

    नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार त्यासाठी 100 कोटी

    मराठी भाषा विभागाला 50

    माहिती व जनसंपर्क विभागाला 250 कोटी निधी

    40 पेक्षा अधिक वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 125 वा स्मृतिदिन

    फुले वाडा विकासासाठी 100 कोटी

    राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता वर्ष

    राजगडच्या पाल येथील सईबाई यांच्या स्मृतिस्थान विकासासाठी निधी

    संदुबरे तालुका मावळ या क्षेत्राच्या विकासासाठी 10 कोटी रुपये

  • 11 Mar 2022 02:53 PM (IST)

    कोरोना, महापूर आदी संकट काळात शासन जनतेच्या पाठिशी उभं राहिलं 

    कोरोना, महापूर आदी संकट

    शासन  जनतेच्या पाठिशी उभं राहिलं

    21-22 राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद निधीतीतून

    कोविड कर्तव्यावर असताना निधन झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 लाख

    कोरोनानं जीव गमावलेल्या वय्क्तींच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची मदत

    503 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली,

    पीक नुकसानी साठी 5 हजार 544 कोटी रुपयांचा निधी

    रायगड आणि तोक्ते चक्रीवादळ काळात 6 हजार 639  कोटी रुपयांची मदत

  • 11 Mar 2022 02:49 PM (IST)

    पंडिता रमाबाई यांच्या नावानं योजना सुरु करण्यात येणार 

    शिर्डी विमानतळासाठी 1500 कोटी

    गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारणी

    जलमार्गासाठी 330 कोटी रुपये

    पंडिता रमाबाई यांच्या नावानं योजना सुरु करण्यात येणार

    आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूंची राज्यात निर्मिती करण्यात येणार

    खादी ग्रामोद्योग केंद्राच्या इमारतीची पुनर्बांधणी आणि विक्री

    नाशिकच्या दिंडोरीत आदिवासी उद्योग क्लस्टर उभारणार

    500 मेगावॅट च्या सौरनिर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येणार

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवण्यात येणार

    ऊर्जा विभागाला 9 हजार कोटी

  • 11 Mar 2022 02:46 PM (IST)

    विकासाची पंचसुत्री राबविणार

    मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा निधी, सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशुशाळा उभारणार

    8 कोटी रुपये खर्च करुन 8 मोबाईल कर्करोग निदान वाहने सुरु करणार

    सर्व जिल्‍ह्यांच्‍या ठिकाणी 100 खाटांची महिला रुग्‍णालय उभारणार

    देशातील होतकरु विद्यार्थ्‍यांना प्रवेश मिळावा म्‍हणून मुंबई, नाशिक आणि नागपूर मध्‍ये संस्‍था

    टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगड जिल्ह्यात खानापूरमध्ये जमीन

    प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय, 3 हजार 183 कोटींचा निधी

    पुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार; सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली

    ​​​​​​​प्रशिक्षित मनुष्‍यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्नित करणार

    पायाभुत सुविधांसाठी भरीव तरतूद

    छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरु करणार

    कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाखांची देणी देणार

    41 हजार कोटींचे कर्ज वाटप

    ​​​​​​​वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र 100 कोटींचा निधी मिळणार

    येत्या तीन वर्षांत मराठवाड्याला ३ हजार कोटी रुपये​​​​​​​

    शेततळे अनुदानात वाढ

    महिला सन्मान योजना वर्ष

    अन्न प्रक्रीया येत्या तीन वर्षांत राबविणार

    ​​​​​​​कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले

    नियमीत कर्जफेड शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदानात​​​​​​​​​​​​​​

  • 11 Mar 2022 02:41 PM (IST)

    समृद्धी महामार्ग भंडारा गोंदिया आणि गडचिरोली पर्यंत विस्तार 

    वाहतूक व दळणवळण विकास

    मुख्यमंंत्री ग्रामसडक योजना सात हजार पाचशे कोटी च्या 10 हजार किमीच्याग्रामीण रस्त्यांना मंजुरी

    पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा 3

    रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाची घोषणा

    सागरी महामार्गासाठी 500 कोटी

    पुणे रिंगरोड 1500 कोटी

    समृद्धी महामार्ग भंडारा गोंदिया आणि गडचिरोली पर्यंत विस्तार

    जालना नांदेड एक्स्प्रेस वे

    नाबार्डनं मंजूर केलेल्या रस्त्यांची आणि पुलांची कामं पूर्ण करण्यात येतील

    सार्वजनिक बांधकाम विभागासाठी रस्ते विकासासाठी 15 हजार कोटी इमारत बांधणीसाठी  1 हजार कोटी

    नाशिक पुणे मध्यम जलदगती रेल्वे प्रकल्पाला केंद्राची मंजूरी

    मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव केंद्राकडे

    पुण्यात दोन मेट्रो मार्गांची घोषणा

    शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, विमानतळाची मोठी घोषणा

  • 11 Mar 2022 02:39 PM (IST)

    बजेट मधून शेतीला काय मिळालं

  • 11 Mar 2022 02:31 PM (IST)

    राज्यातल्या सर्व तृतीयपंथीना ओळखपत्र देण्यात येणार

    राज्यातल्या सर्व तृतीयपंथीना ओळखपत्र देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम राज्यभर राबविला जाईल

  • 11 Mar 2022 02:30 PM (IST)

    शालेय शिक्षण विभागा 2353  क्रीडा विभागाला 385  कोटी 

    मनुष्यबळ विकास

    शिष्यवृत्ती, फेलोशिप याद्वारे सर्व विभागांच्या योजना लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडणार

    संगणक आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता

    संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी मिळावी म्हणून इनोव्हेशन हब सुरु करण्यात येणार प्रत्येक विभागात स्थापना होणार

    तरुणांना विशेष संधी निर्माण करुन देण्यासाठी स्टार्ट अपसाठी भांडवल 100 कोटी रकमेचा शासनाचा स्टार्ट अप फंड उभारण्यात येणार

    कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाला 615 कोटी रुपयांची

    लता मंगेशकर यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या केंद्रासाठी 100 कोटी

    शिवाजी विद्यापीठातील केंद्रासाठी 10 कोटी आणि मुंबई च्या रत्नागिरीतील उपकेंद्रासाठी 2 कोटी रुपये

    महापुरुषांच्या नावे अध्यासन केंद्र उभारण्यासाठी 3 कोटी रुपये

    एसएनडीटी  विद्यापीठ 10 कोटी

    महर्षी कर्वे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी 1 कोटी  निधी

    शाळांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा स्तरावर 5 टक्के निधी

    शालेय शिक्षण विभागा 2353  क्रीडा विभागाला 385  कोटी

    भीमा कोरेगाव  येथील विजयस्तंभ सुशोभीकरण

    तृतीय पंथी नागरिकांना ओळखपत्र आणि रेशन कार्ड देण्यात येणार

    बार्टीला 250 कोटी रुपयांचा निधी

    सामाजिक न्याय व विशेष साहाय विभागाला 2876 कोटी

    अनुसूचित जाती घटक योजना कार्यक्रमासाठी 12230 कोटी असा  निधी  प्रस्तावित

    आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वयम योजना

    शबरी विकास योजनेअंतर्गत भागासाठी 1 लाख 32 हजार आणि 1 लाख 42 हजार रुपये अनुदान देण्यात येतं  त्यासाठी 300 कोटी

    पालघर आणि गडचिरोलीत कातकरी आणि माडिया गोंड समाजासाठी बहुद्देशीय संकूल बांधण्यात येणार आहे

    महाज्योतीला 250 कोटी रुपये

    ओबीसी राजकीय आरक्षणासाठी निर्माण करण्यात येणाऱ्या आयोगाला निधी देणार

    इतर मागास प्रवर्ग मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी कोटी

    सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती साठी 100 कोटी

    2022-23 साठी ओबीसी विभागाला 3400 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे

    एकात्मिक बाल विकास योजनेसाठी 1 लाख पेक्षा अधिक अंगणावाडी सेविकांना मोबाईल सेवा

    अमृतमहोत्सवी महिला व बालभवन उभारण्यात करण्यात येणार

    नागरी बाल विकास केंद्र उभारली जाणार

  • 11 Mar 2022 02:26 PM (IST)

    आरोग्य सेवांसाठी अर्थसंकल्पात ११ हजार कोटींच्या निधीची तरतूद

    आरोग्य सेवांसाठी अर्थसंकल्पात ११ हजार कोटींच्या निधीची तरतूद

    मुंबईतील बैलघोडा पशूवैद्यकीय रुग्णालयाला १० कोटी रुपयाचा निधी

    कृषी विभागाच्या योजनांमध्ये तीन टक्के निधी यापुढे आजी-माजी सैनिकांना उपलब्ध करून देणार

    मुख्यमंत्री शाश्वत निधी योजना, शेततळ्यासाठी अनुदानात ७५ हजारापर्यंत वाढ

    विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन, विशेष कृती योजनेसाठी १००० कोटींचा निधी

    जलसंपदा विभागासाठी १३ हजार २५२ कोटींची घोषणा

    महिला शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देणार

    संभाजी महाराजांचे स्मारक हवेलीत उभारणार, २५० कोटींची तरतूद; अजित पवारांची घोषणा

    हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार

    शेतकरी कल्याणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद; अजित पवारांची घोषणा

    कृषी, आरोग्य, मनुष्यबळ, दळणवळण आणि तंत्रज्ञान विकासाची पंचसुत्री

    छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद

  • 11 Mar 2022 02:19 PM (IST)

    आरोग्य सेवांवर आगामी तीन वर्षात 11 हजार कोटी खर्च करणार

    कोरोना काळात राज्याचं देशासह  जगभरात कौतुक

    गेल्या दोन वर्षापासून आपण कोविडशी सक्षमपणे लढतोय

    माझे कुटुंब माझी जबाबदारी

    हर घर दस्तक योजना राबवली

    आरोग्य सेवांवर आगामी तीन वर्षात 11 हजार कोटी खर्च करणार

    नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर येथे ट्रामा केअर युनिट  स्थापण करणार

    ग्रामीण भागातील किडनीच्या रुग्णांसाठी लेप्रोस्कॉपी मोफत करण्यात येणार

    यासाठी 17 कोटी 60 लाख रुपये खर्च करणार

    मोतिबिंदू उपचार पद्धती आधुनिकीकरण

    कर्करोग उपचारासाठी 8 कोटी रुपये

    अकोला येथे स्त्री रुग्णालयाची स्थापना करण्यात येणार

    जालना येथे 365 खाटांचे मनोरुग्णालय स्थापन करण्यात येणार

    ग्रामीण भागातील जनतेसाठी  शिवआरोग्य योजना सुरु करण्यात येणार

    प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय पातळीवर याचा विस्तार करण्यात येणार

    देशातील होतकरु युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षण मिळावं म्हणून प्रवेश संख्येत वाढ करण्यात येणार

    पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्ये संस्था स्थापन करण्यात येणार

    पुणे शहराजवळ इंद्रायणी मेडिसीटी उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असेल

    सर्व उपचार पद्धती असलेलं केंद्र निर्माण करण्यात येणार 2061 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार

  • 11 Mar 2022 02:12 PM (IST)

    महिला शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येणार : अजित पवार

    पीक कर्ज वाटपात वाढ झाली

    व्याज सवलत योजनेअतंर्गत योजनेअंतर्ग

    हे वर्ष महिला शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येईल

    खरिप व रब्बी पणन हंगाम शेतमाल खऱेदी अंतर्गत विक्रमी खरेदी

    सोसायट्यांचं संगणकीकरण करुन कोअर बँकिंगद्वारे जोडणार

    पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाल 406 कोटी

  • 11 Mar 2022 02:10 PM (IST)

    राज्यातील कृषी उत्पन्न समितीसाठी १० कोटी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे

    कोरोनामुळे पंचसुत्री बजेटवर भर

    राज्याचा २०२२ चा अर्थसंकल्प सादर

    शेतकरी महिलासाठी सन्मानवर्ष

    कर्ज भरणा-यावर शेतक-यांना ५० हजार पोत्साहनपर मिळणार

    राज्यातील कृषी उत्पन्न समितीसाठी १० कोटी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे

    हवेलीत संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी रूपये

  • 11 Mar 2022 02:09 PM (IST)

    नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार देणार

    महाराष्ट्राची अस्मिता स्फूर्तिस्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू येथे उभारण्यात येणार

    महाविकास आघाडीकडून 250 कोटी रुपयांचा निधी

    छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार देण्यात येणार

    महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सादर करतो

    पंच तत्त्वांप्रमाणे विकासाची पंचसूत्री आपण स्वीकराली पाहिजेत

    कृषी आरोग्य मनुष्यबळ दळणवळण आणि शिक्षण ही अर्थसंकल्पाचा प्राण

    4 लाख कोटी देणार

    महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयनची होणार

    शेती विकासाचा पाया

    विकासाची पंचसूत्री

    6  मार्च 2020

    नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार देण्यात येणार

    20 लाख शेतकऱ्यांना लाभ

  • 11 Mar 2022 02:05 PM (IST)

    ठाकरे सरकारच्या बजेटमध्ये काय ?

    ठाकरे सरकारच्या बजेटमध्ये काय ?

    विकासाची पंचसुत्री राबवणार

    विकासाची पंचसुत्री कार्यक्रमासाठी ४ लाख

    कृषी क्षेत्र हाच विकासाचा पाया आहे

  • 11 Mar 2022 02:03 PM (IST)

    महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य : अजित पवार

    महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य : अजित पवार

  • 11 Mar 2022 01:23 PM (IST)

    अजित पवार विधानभवनात दाखल

    थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करणार

    सगळ्यांना सामावून घेणारा अर्थसंकल्प असेल –

  • 11 Mar 2022 01:21 PM (IST)

    अर्थराज्यमंत्री शंभूदेसाई विधानभवनात दाखल

    थोड्यात वेळात अर्थसंकल्प सादर होणार

    अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर करणार

    अर्थराज्यमंत्री शंभूदेसाई विधानभवनात दाखल

    सगळ्यांना समावून घेणारा अर्थसंकल्प असेल

  • 11 Mar 2022 12:26 PM (IST)

    राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल; राज्यात 1.88 लाख कोटींची गुंतवणूक

    मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत जून, 2020 ते डिसेंबर, 2021 मध्ये राज्यात 1.88 लाख कोटी गुंतवणूक व 3.34 लाख अपेक्षित रोजगार असलेले प्रस्ताव प्राप्त झाले. महाराष्ट्र इलेक्ट्रीक व्हेईकल प्रोत्साहन धोरण, 2018 अंतर्गत पाच इलेक्ट्रीक वाहन उत्पादन घटक आणि एका बॅटरी उत्पादन घटकाकडून 8,420 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यामध्ये 9,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे ऑक्टोबर, 2021 अखेर राज्यात 10,785 स्टार्ट-अप होते, असे पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

  • 11 Mar 2022 12:24 PM (IST)

    सेवा आणि उद्योग क्षेत्रात भरीव वाढ अपेक्षित

    आर्थिक पाहणीनुसार यंदाच्या आर्थिक वर्षात कृषि व संलग्न कार्ये क्षेत्रात 4.4 टक्के वाढ, उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढ आणि सेवा क्षेत्रात 13.5 टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार 2021-22 मध्ये सांकेतिक (‘नॉमिनल’) (चालू किंमतीनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 31,97,782 कोटी अपेक्षित आहे. वास्तविक (‘रिअल’) (सन 2011-12 च्या स्थिर किंमतीनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 21,18,309 कोटी अपेक्षित आहे. 2021-22 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राज्याची महसुली जमा 3,68,987 कोटी, कर महसूल 2,85,534 कोटी आणि करेतर महसूल 83,453 कोटी (केंद्रीय अनुदानासह) आहे. एप्रिल ते नोव्हेंबर,2021 या कालावधीत प्रत्यक्ष महसुली जमा 1,80,95 4कोटी आहे. 2021-22 नुसार राज्याचा महसुली खर्च 3,79,213 कोटी सन 2020-21 च्या सुधारित अंदाजानुसार विकास खर्चाचा एकूण महसुली खर्चातील हिस्सा 68.1 टक्के आहे.

  • 11 Mar 2022 12:00 PM (IST)

    राज्याच्या विकास दरात 12. 1 टक्क्यांची वाढ

    महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती,  2021-22  आर्थिक वर्षात राज्याच्या विकास दरात 12. 1 टक्क्यांची वाढ. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील माहिती

Published On - Mar 11,2022 10:02 AM

Follow us
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.