AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Day 2022 : महाराष्ट्रदिनी ‘महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो 2022’चे आयोजन, वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणार तीन दिवसीय व्यावसायिक प्रदर्शन

या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना नवीन व्यावसायिक संधी, सरकारसोबत व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार आहे. लघु-मध्यम उद्योग योजना, कॉर्पोरेट कंपन्यांसोबत व्हेन्डर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, मुद्रा कर्ज योजना, परदेशातील व्यावसायिक संधी, आयात-निर्यात या विषयावर मार्गदर्शन देखील मिळणार आहे.

Maharashtra Day 2022 : महाराष्ट्रदिनी ‘महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो 2022’चे आयोजन, वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणार तीन दिवसीय व्यावसायिक प्रदर्शन
महाराष्ट्रदिनी ‘महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो 2022’चे आयोजनImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 3:09 PM

मुंबई – महाराष्ट्र दिनानिमित्त सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय (Ministry of Micro, Small and Medium Enterprises) आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विकास संस्था, “झेप उद्योगिनी” आणि “वी एमएसएमई” च्या सहकार्याने १ मे ते ३ मे दरम्यान वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे `महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो 2022’ या तीन दिवसीय व्यावसायिक प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan rane) यांच्या हस्ते रविवार, 1 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष विजय कलंत्री (Vijay Kalantri), कार्यकारी संचालिका रूपा नाईक, एमएसएमई महाराष्ट्रचे संचालक प्रशांत पार्लेवार, दुबईस्थित पेशवा हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक सचिन जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सरकारसोबत व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होईल

या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना नवीन व्यावसायिक संधी, सरकारसोबत व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार आहे. लघु-मध्यम उद्योग योजना, कॉर्पोरेट कंपन्यांसोबत व्हेन्डर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, मुद्रा कर्ज योजना, परदेशातील व्यावसायिक संधी, आयात-निर्यात या विषयावर मार्गदर्शन देखील मिळणार आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून अनेक उद्योजक आपल्या व्यवसायाचे प्रदर्शन करणार आहेत. थेट उत्पादकांसोबत संवाद साधण्याची संधी या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय लघू मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र एमएसएमई अचिव्हर्स’ या नियतकालिकाचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे.

पैठणी नेसून केला जाणारा रॅम्प वॉक हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य

तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राची कला आणि संस्कृतीचे सादरीकरण करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. पंढरीच्या वारीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून महाराष्ट्राची ओळख असणारा पोवाडा सुद्धा सादर केला जाणार आहे. पैठणी नेसून केला जाणारा रॅम्प वॉक हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. सोबतच काही यशस्वी उद्योजकांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे. या प्रदर्शनास भेट देऊन आपल्या उद्योजक बांधवांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन झेप उद्योगिनीच्या संस्थापिका पूर्णिमा शिरीषकर यांनी केले आहे. प्रदर्शनासंदर्भात अधिक माहितीसाठी पूर्णिमा शिरीषकर यांच्याशी संपर्क साधावा (95944825801)

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.