CNG Price Reduction: दिलासादायक बातमी! सीएनजीच्या दरात सहा रु. प्रति किलो तर पीएनजीच्या दरात चार रु. प्रति किलो कपात
दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले आहेत. आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत. आता मात्र गॅसच्या दरात मात्र कपात झालीये.
मुंबई : सध्या सर्वत्र महागाईचा भडका उडालेला आहे.जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसागणिक वाढत आहेत. दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले आहेत. आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत. अश्यात आता मात्र एक दिलाश्याची बातमी. आता गॅसच्या दरात मात्र कपात झालीये. सीएनजी (CNG Price) आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात सहा रुपये प्रति किलो अशी कपात करण्यात आलीये. तर पीएनजीच्या (PNG Price) दरात चार रुपये प्रति किलो कपात झाली आहे. तिकडे पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात चार रुपयांची कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून 12 वाजल्यापासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तसंच यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या दरात झालेल्या कपातीमुळे ग्राहकांना सीएनजी मुंबईमध्ये 80 रुपये प्रति किलो मिळणार आहे. पीएनजी 48. 50 रुपयांना मिळणार आहे. तर पुण्यात सीएनजी 87 रुपये प्रतिकिलो दराने मिळणार आहे.
सीएनजीच्या दरात घट
गॅसच्या दरात मात्र कपात झालीये. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात सहा रुपये प्रति किलो अशी कपात करण्यात आलीये. तर पीएनजीच्या दरात चार रुपये प्रति किलो कपात झाली आहे. तिकडे पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात चार रुपयांची कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून 12 वाजल्यापासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तसंच यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दुधाच्या दरात वाढ
अमूल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले आहेत. नव्या वाढीव किंमती या आजपासून लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील भार अधिक वाढला आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. यासोबतच मदर डेअरीनेही दुधाच्या दरात वाढ केली आहे. नवीन दर आजपासून लागू झालेत. अमूल दुधाच्या किमतीतील ही वाढ गुजरातमधील अहमदाबाद आणि सौराष्ट्र व्यतिरिक्त दिल्ली आणि एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई आणि अमूलची उत्पादने विकल्या जाणाऱ्या इतर सर्व ठिकाणी लागू असेल.