भारतीय कंपनी लाँच करणार 16 इलेक्ट्रिक कार, 3000 कोटींच्या गुंतवणूकीची घोषणा
Electric Vehicles | महिंद्रा अँड महिंद्राने 2025 पर्यंत त्यांच्या एकूण महसुलात 15 ते 20 टक्के वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीने एकतर खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांना आणण्याचा किंवा त्याच्या EV व्यवसायाला एक वेगळी संस्था म्हणून डिमर्ज करण्याचा पर्याय खुला ठेवला आहे ज्यामुळे त्याच्या वाढीला वेग येईल.
नवी दिल्ली: देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आगामी काळात मोठ्याप्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली. 2027 पर्यंत कंपनीने SUV आणि हलके व्यावसायिक वाहन (LCV) श्रेणीतील 16 इलेक्ट्रिक वाहने (EVs) सादर करण्याची योजना आखली आहे. या योजनेद्वारे, कंपनीला भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात आपले अग्रगण्य स्थान आणखी मजबूत करायचे आहे.
महिंद्रा अँड महिंद्राने 2025 पर्यंत त्यांच्या एकूण महसुलात 15 ते 20 टक्के वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीने एकतर खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांना आणण्याचा किंवा त्याच्या EV व्यवसायाला एक वेगळी संस्था म्हणून डिमर्ज करण्याचा पर्याय खुला ठेवला आहे ज्यामुळे त्याच्या वाढीला वेग येईल.
3000 कोटींची गुंतवणूक
महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) ने यापूर्वीच ईव्हीमध्ये 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे. महिंद्राकडून इलेक्ट्रिक SUV साठी नवीन ब्रँड नावाचा देखील विचार केला जात आहे. SUV विभागात आम्ही 2027 पर्यंत 13 नवीन मॉडेल्स सादर करण्याचा विचार करत आहोत, त्यापैकी आठ इलेक्ट्रिक असतील. 2027 पर्यंत आमच्या एकूण UV (उपयुक्तता वाहनांच्या) किमान 20 टक्के वाटा इलेक्ट्रिक वाहनांचा असेल अशी आमची अपेक्षा आहे. कंपनी 2025-2027 दरम्यान चार नवीन इलेक्ट्रिक SUV सादर करू शकते, अशी माहिती महिंद्रा अँड महिंद्राचे (M&M) कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर यांनी दिली.
आनंद महिंद्रा यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना राष्ट्रपती भवनात पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल आनंद महिंद्रा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली महिंद्रा समूहाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑटोमोबाईलपासून ते आयटी आणि एरोस्पेसपर्यंत अनेक प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमध्ये स्वतःची आणि देशाची नावलौकिक मिळवला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला.
संबंधित बातम्या:
देशभरात 22 हजार इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंटसची उभारणी, जाणून घ्या पेट्रोलियम मंत्रालयाची योजना
EPFO खातेधारकांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या कमाईत होणार वाढ, जाणून घ्या सर्वकाही
‘हा’ व्यवसाय सुरु केल्यास दिवसाला कमवाल पाच हजार रुपये, जाणून घ्या सर्वकाही