Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra Group: वाहन क्षेत्रात दबदब्यासाठी 3 सत्ताकेंद्र! मंहिंद्राचे इलेक्ट्रीक व्हेईकल, ट्रॅक्टर आणि प्रवासी वाहन असे विभाग

महिंद्रा ग्रुपने वाहन क्षेत्रात दबदबा निर्माण करण्यासाठी त्यांच्या कंपन्यांची तीन स्वतंत्र श्रेणीत विभागणी केली आहे. ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रीक व्हेकल, कृषी विभागाशी संबंधित ट्रॅक्टर आणि प्रवासी वाहन अशा स्वतंत्र विभागात महिंद्रा कारभार हाकणार आहे.

Mahindra Group: वाहन क्षेत्रात दबदब्यासाठी 3 सत्ताकेंद्र! मंहिंद्राचे इलेक्ट्रीक व्हेईकल, ट्रॅक्टर आणि प्रवासी वाहन असे विभाग
महिंद्रा स्कॉर्पिओImage Credit source: Mahindra
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 8:56 AM

दमदार आणि ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी रफ आणि टफ म्हणून ओळखली जाणा-या महिंद्रा कंपनीने वाहन क्षेत्रात दबदबा निर्माण करण्यासाठी खास योजना आखली आहे. महिंद्रा ग्रुपने (Mahindra Group) त्यांच्या कंपन्यांची तीन स्वतंत्र श्रेणीत विभागणी (Auto Sector-Three Separate company) केली आहे. ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रीक व्हेईकल (EV), कृषी विभागाशी संबंधित ट्रॅक्टर (Tractor) आणि प्रवासी वाहन (Passenger Vehicle) अशा स्वतंत्र विभागात महिंद्रा कारभार हाकणार आहे. महिंद्रा ग्रुपच्या महसुलात ऑटो क्षेत्राचा वाटा 53 टक्के आहे आणि भविष्यात त्यात वृद्धी करण्यासाठी महिंद्रा तीन क्षेत्रात त्यांच्या ऑटो क्षेत्राची पुनर्रचना (Auto Sector Restructuring) करत आहे. सध्या हा सर्व विभाग महिंद्रा आणि महिंद्रा या एकछत्री नावाखाली एकत्ररित्या काम करत आहे. महिंद्रा ग्रुप इलेक्ट्रीक व्हेईकल साठी स्वतंत्र दालन सुरु करत आहे. महिंद्राने चार महि्न्यांखालीच याविषयीची घोषणा केली होती.

EV साठी इटलीच्या कंपनीशी करार

इलेक्ट्रीक व्हेईकल अर्थात विद्यूत वाहनांमध्ये कंपनीची वाढ दर्शविण्यासाठी कंपनी एलसीवी, एसयूवी आणि 3 डब्ल्यूमध्ये 13 उत्पादने सुरु करण्याची शक्यता आहे. यात इलेक्ट्रिक व्हीईकलचा वाटा 20 टक्के असेल. 2027 पर्यंत 16 इलेक्ट्रीक वाहने मार्केटमध्ये उतरविण्याची योजना असून त्यातील 8 इलेक्ट्रिक एसयूवी आणि 8 कमर्शियल व्हेईकल असतील. महिंद्रा इटालियन कंपनी ऑटोमोबिली पिनिंफरिना (Automobili Pininfarina) सोबत इलेक्ट्रीक व्हेईकल क्षेत्रात पदार्पण करत आहे. या क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी कंपनी निधी गोळा करत आहे. टाटा ग्रपने ईव्ही मध्ये अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेतली आहे आणि या कंपनीच्या कार लोकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीलाही या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करण्याची इच्छा आहे. त्यासाठी कंपनी अतिरिक्त सल्ला आणि भविष्यातील योजना तयार करत आहे.

कृषी क्षेत्रात कंपनीचा बोलबाला

कृषी क्षेत्राशी संबंधीत अवजारे, साहित्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ट्रॅक्टर निर्मितीत महिंद्रा आणि महिंद्राची आघाडी आहे. याक्षेत्रात कंपनी अग्रेसर आहे. 2007 साली कंपनीने पंजाब ट्रॅक्टर कंपनी अधिग्रहीत केली होती. त्यामुळे देशातील ट्रॅक्टर क्षेत्रात तीचा वाटा 43 टक्के इतका झाला होता. महिंद्रा ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांची कृषी आणि ट्रॅक्टर निर्मितीची शाखा सर्वात अग्रेसर आणि फायदेशीर आहे.

रफ अँड टफ सवारी

ग्रामीण भागातील ओबडधोबड रस्त्यांसाठी महिंद्राच्या गाड्या दमदार मानल्या जातात. ट्रॅक्टरनंतर शेतकरी जर कोणत्या ब्रँडवर प्रेम करत असेल तर ते महिंद्राच्या स्कॉर्पिओ आणि इतर अशाच एक्सयुव्ही, रफ अँड टफ मॉडेल्सवर. उत्तम सेवा, कर्ज सुलभता आणि दमदार मॉडेल्समुळे याही क्षेत्रात कंपनी एकटीच पाय रोवून उभी आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.