World Richest : राजकारणाचा खेळखंडोबा सोडा, इकडे श्रीमंतीचा वाढला ग्राफ
World Richest : राज्यातील आणि देशातील राजकारण कलाटणी घेत असताना श्रीमंतांच्या यादीत पण उलटफेर झाला. श्रीमंतांचा ग्राफ इतका वाढला. भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या संपत्तीचे काय आहेत आकडे..
नवी दिल्ली : या वर्षांतील, 2023 मधील 6 महिने निघून गेले आहेत. या अर्ध्या वर्षांत जगातील 500 सर्वाधिक श्रीमंतांपैकी केवळ दोघांनी जास्त नोटा छापल्या आहेत. जगात अनेक देशात श्रीमंतांची (Billionaire) फौज आहे. पण कोणालाच हा पराक्रम करता आलेले नाही. गेल्या सहा महिन्यांत ट्विटर आणि टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Musk) आणि मेटा प्रमुख मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या संपत्तीत सर्वाधिक भर पडली आहे. या यादीत भारतीय उद्योगपतींना मोठी झेप घेता आली नाही. उलट भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांची या यादीत मोठी घसरण झाली. प्रत्येकाच्या संपत्ती (Net Worth) किती चढउतार झाला?
असा झाला बदल ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सने जानेवारी ते जून 2023 याकाळातील जगातील श्रीमंतांच्या संपत्तीत झालेला बदलाची नोंद घेतली आहे. त्यांनी श्रीमंतांच्या वाढलेल्या संपत्तीचे विश्लेषण केले आहे. जगातील श्रीमंतांनी एका दिवशी किती कमाई केली, याची सरासरी समोर आली आहे. त्यानुसार, 500 श्रीमंतांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. या प्रत्येकाच्या श्रीमंतीत 1.4 कोटी रुपये डॉलरची प्रत्येक दिवशी वाढ झाली आहे. ही सरासरी आहे. प्रत्येक दिवशी ती वाढलीच असेल असे नाही, एखाद्या दिवशी ती कमी पण झाली असेल.
मास्क-झुकरबर्गच्या संपत्तीत किती वाढ इंडेक्सनुसार, जानेवारी ते जून या महिन्यात सर्वाधिक संपत्ती एलॉन मस्कची वाढली आहे. ट्विटरचा सौदा तोट्यात गेला असला तरी या वर्षात एलॉन मस्कच्या संपत्तीत वाढ झाली आहे. मस्कच्या संपत्तीत गेल्या सहा महिन्यात 110 अब्ज डॉलरची भर पडली. तर 247 अब्ज डॉलर संपत्तीसह मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मेटाचे मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती सहा महिन्यात 58.6 अब्ज डॉलरने वाढली. तर 104 अब्ज डॉलर संपत्तीसह ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत 9 व्या स्थानावर आहेत.
तिसऱ्या स्थानी कोण या यादीत तिसऱ्या स्थानावर Amazon चे जेफ बेजोस यांचा क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती 155 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यांच्या संपत्तीत पण चांगलीच भर पडली आहे. गेल्या सहा महिन्यात जवळपास 47.6 अब्ज डॉलरची भर पडली आहे.
शेअर बाजारातील तेजी पथ्यावर एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांची नेटवर्थ वाढली आहे. त्यामागे शेअर बाजारातील उलाढाल महत्वाची आहे. अमेरिकन शेअर बाजाराने उसळी घेतल्याने त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यात S&P500 मध्ये 16 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर नॅस्डॅक 100 या कालावधीत 39 टक्क्यांनी वधारला.
गौतम अदानी यांना झटका भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे या वर्षाच्या सुरुवातील जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. पण त्यानंतर घडलेल्या घडामोडींचा मोठा फटका त्यांना बसला. ते या यादीत टॉप-30 मध्ये पण नव्हते. पण नंतर ते यादीत टॉप-20 मध्ये आले. या सहा महिन्यात त्यांची एकूण संपत्ती 60.2 अब्ज डॉलरने घटली. त्यांची संपत्ती अर्ध्यावर आली. सध्या त्यांच्याकडे नेटवर्थ 60.3 अब्ज डॉलर उरली.