भारतातील शेअर बाजारात दोन दिवसांपासून जोरदार घसरण सुरु आहे. या घसरणीमुळे रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या मालमत्तेत चांगलीच घट झाली आहे. जागतिक श्रीमंताच्या यादीत टॉप 10 मध्ये हे नाहीत. परंतु 2004 पूर्वी ज्या व्यक्तीचे नाव माहीत नव्हते, त्याने मागील नऊ महिन्यात 78 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 6.52 लाख कोटी रुपये कमवले आहे. जागतिक श्रीमंताच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहे. ते व्यक्ती म्हणजे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आहे.
मार्क झुकरबर्ग यांनी 20 वर्षांपूर्वी 2004 मध्ये फेसबुकची स्थापना केली. आता फक्त 20 वर्षांत ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्त झाले आहेत. मेटाचे सीईओ असलेल्या झुकरबर्ग यांनी अॅमेझानचे फाऊंडर जेफ बेजोस यांना मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती 206.2 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 17.22 लाख कोटी झाली आहे.
मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती 2024 मधील पहिल्या 9 महिन्यांत 78 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 6.52 लाख कोटी रुपये वाढली आहे. मेटाच्या शेअरमध्ये 70% वाढ झाल्यामुळे ही संपत्ती वाढली आहे. मेटाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानात गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. यामुळे मार्क झुकरबर्ग यांना चांगलाच फायदा झाला आहे.
मेटाचे यश AI मधील गुंतवणुकीमुळे वाढले आहे. यापूर्वी 2022 मध्ये कंपनी संकटात आली होती. त्यानंतर कॉस्ट कटींगमुळे करत 21 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. मात्र, यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवला आणि कंपनी पुन्हा स्थिर झाली.
मार्क झुकरबर्गने आपल्या कंपनीच्या दीर्घकालीन योजना आधीच सांगितल्या आहेत. मेटा पुढील 20-30 वर्षांसाठी आघाडीची तंत्रज्ञान कंपनी राहील. त्यांचे लक्ष नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर आहे. सध्याच्या काळात केवळ नफा मिळवणे हे त्यांचे लक्ष्य नाही. तर पुढील 100 वर्षांसाठी मेटाची वेगळी ओळख निर्माण करणे आहे.