Equity Mutual Funds: सर्वोत्तम रिटर्नसाठी हवं प्रभावी प्लॅनिंग, मार्केट घसरणीवेळी काय करावं; जाणून घ्या

आर्थिक जाणकारांच्या मते, इक्विटी म्युच्युअल फंड संपूर्णपणे बाजाराच्या जोखमीवर आधारित आहे. बाजारात घसरण दिसून आल्यास गुंतवणुकदारांच्या पोर्टफोलित घट होते.

Equity Mutual Funds: सर्वोत्तम रिटर्नसाठी हवं प्रभावी प्लॅनिंग, मार्केट घसरणीवेळी काय करावं; जाणून घ्या
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 7:51 PM

नवी दिल्ली:शेअर बाजारात तेजी-घसरणीचं सत्र सुरू आहे. रशिया-युक्रेन वादाचा (Russia Ukraine Crisis) फटका गुंतवणुकदारांना बसला आहे. कोट्यावधी रुपयांवर गुंतवणुकदारांना पाणी सोडावं लागलं आहे. अनिश्चिततेच्या काळात गुंतवणुकदार सुरक्षित पर्यायाच्या शोधात आहेत. तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड (Equity Mutual Funds) मध्ये गुंतवणूक करत असाल गुंतवणुकदारांना (Mutual Fund Investors) नेमकं काय करायला हवी याची माहिती हवी. आर्थिक जाणकारांच्या मते, इक्विटी म्युच्युअल फंड संपूर्णपणे बाजाराच्या जोखमीवर आधारित आहे. बाजारात घसरण दिसून आल्यास गुंतवणुकदारांच्या पोर्टफोलित घट होते. त्यामुळे गुंतवणुकदारांना जोखमीबद्दल पूर्णपणे माहिती हवी. आर्थिक शिस्तीमध्ये संपत्ती वितरण, पोर्टफोलिओ रिव्ह्यू आदींचा समावेश होतो. त्यामुळे तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित ठरेल आणि सर्वोत्तम गुंतवणुकीची प्राप्ती देखील होईल.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी रिस्क प्रोफाईलची माहिती असणं महत्वाचे असलयाचे अर्थ जाणकराचं म्हणणं आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना जोखमीबद्दल पूर्ण माहिती मिळेल. गुंतवणुकदारांना गुंतवणुकीचं लक्ष्य, गुंतवणुकीचा कालावधी, कौटुंबिक आर्थिक बजेट, अपेक्षित रिटर्न याबद्दल गुंतवणुकीपूर्वीच स्पष्टता हवी. सर्व गोष्टींमुळे गुंतवणुकदारांना जोखमीचे मूल्यांकन करणे सुलभ ठरेल. जोखमीच्या नुसार संपत्तीचे वितरण सोपे ठरेलं.

विभिन्न फंडात गुंतवणूक करा-

ऑप्टिमा मनीचे व्यवस्थापकीय संचालक पंकज माथपाल यांनी विविध कॅटेगरीच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. स्मॉलकॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, मिक्स्ड कॅप आदी कॅटेगरी असू शकतात. विभिन्न कॅटेगरीसाठी संपत्तीचे वितरण देखील भिन्न ठरते. तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार तुम्ही फंडची निवड करू शकतात. गुंतवणुकदारांनी नेहमी आपला पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवायला हवा.

बाजार करेक्शन, स्मॉल कॅप हवा:

शेअर बाजारात तेजी-घसरणीच्या स्थितीत म्युच्युअल फंडच्या सर्व युनिटवर परिणाम होतो. घसरणीच्या स्थितीत लार्ज कॅपवर कमी परिणाम होतो. तर स्मॉल कॅपवर अधिक परिणाम संभवतो. त्यामुळे मार्केटच्या अस्थिरतेच्या स्थितीनुसार गुंतवणुकदार स्मॉल कॅप, लार्ज कॅप आणि मिड कॅप मध्ये गुंतवणूक कमी-अधिक करू शकतात. शेअर बाजारात घसरण आल्यास स्मॉल कॅपमध्ये गुंतवणुकीत वाढ केली जाऊ शकते. कारण तेजी आल्यानंतर अधिक रिटर्न मिळण्याची शक्यता अधिक असते.

गुंतवणूक हवी दीर्घकाळ:

गुंतवणूक तज्ज्ञांनी दीर्घकाळ गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. तुम्ही अधिक काळ गुंतवणुक करत असल्यास रिटर्न मिळविण्याची शक्यता अधिक वाढते. दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्याने जोखमीची क्षमता घटते. गुंतवणुकीच्या दरम्यान पोर्टफोलिओचा रिव्ह्यू मात्र आवश्यक आहे. वर्षातून किमात तीन-चार वेळा पोर्टफोलिआचा रिव्ह्यू करण्याचा सल्ला दिला जातो.

इतर बातम्या:

Russia Ukraine War : ‘शांततेसाठी कोणत्याही प्रकारे योगदान देऊ’; झेलेन्स्की यांच्या मदतीच्या मागणीनंतर पंतप्रधान मोदींचं आश्वासन

Mhada | पुणेकरांना मोठा दिलासा ! म्हाडा’च्या ‘एवढ्या’ नवीन सदनिका व व्यापारी संकुलासाठी लॉटरी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.