Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर्स बाजारात घसरणीचे सत्र; सेन्सेंक्स 581, निफ्टी 167 अंकांनी गडगडला

आंतरराष्ट्रीय बाजारात फेड रिझर्व्हचे (FEDRAL RESERVE) धोरण बदलाचे संकेत आणि विक्रीचा दबाव यामुळे बाजारात घसरण दिसून आली.

शेअर्स बाजारात घसरणीचे सत्र; सेन्सेंक्स 581, निफ्टी 167 अंकांनी गडगडला
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 5:29 PM

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारात फेड रिझर्व्हचे (FEDRAL RESERVE) धोरण बदलाचे संकेत आणि विक्रीचा दबाव यामुळे बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेंक्स आणि निफ्टीमध्ये 1 टक्क्यांनी घसरण नोंदविली गेली. आज (गुरुवारी) सेंसेक्स 581.21 अंकांच्या घसरणीसह 57,276.94 वर आणि निफ्टी 167.80 अंकांच्या घसरणीसह 17,110.15 वर बंद झाला. अमेरिका ट्रेडरी बाँडच्या यील्डमध्ये वाढ, परकीय गुंतवणुकदारांचा (FOREGIN INVESTMENT) निरुत्साह तसेच कोरोनाचा नवा विषाणू ‘ओमिक्रॉन’च्या वाढत्या प्रादूर्भावामुळे शेअर बाजारात अस्थिरतेचं चित्र कायम राहिलं. आज सेंन्सेक्सवर अ‍ॅक्सिस बँक (AXIS BANK) व्यतिरिक्त अन्य बँकिंग शेअर्समध्ये घसरण नोंदविली गेली. अ‍ॅक्सिसच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची तेजी दिसून आली. सर्वाधिक घसरण निफ्टी आयटीमध्ये घसरण दिसून आली.

आजचे तेजीचे शेअर्स:

• अ‍ॅक्सिस बँक (2.88) • भारतीय स्टेट बँक (2.78) • मारुती सुझुकी (2.53) • सिप्ला (2.42) • कोटक महिंद्रा (1.87)

आजचे घसरणीचे शेअर्स:

• एचसीएल टेक (-4.09) • टेक महिंद्रा (-3.67) • रेड्डीज् लॅब्स(-3.33) • टीसीएस(-3.20) • विप्रो (-3.19)

आजचे मार्केट अपडेट:

1. एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, 4 टक्क्यांनी गडगडले 2. आयटी स्टॉक्सची कामगिरी निराशजनक राहिली. प्रमुख घसरणीच्या शेअर्समध्ये टीसीएस, विप्रो 3. रिअल इस्टेट क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा, अनुकूल निर्णयाच्या संभाव्यतेमुळे रिअल इस्टेट, सिमेंट कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी 4. अटल रिअलटेक, गुजरात अंबुजा स्टॉक्समध्ये 52 आठवड्यांतील सर्वात तेजी दिसून आली. 5. बँकिंग क्षेत्राचा दबदबा दिसून आला. निफ्टी स्टॉक्समध्ये अ‍ॅक्सिस, एसबीआय यांच्यामध्ये तेजी नोंदविली गेली.

‘सेबी’चे गुंतवणूक साथी:

भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने नव्या अ‍ॅपची घोषणा केली आहे. वैयक्तिक ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे सर्व अपडेट एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी ‘साथी’ (Saa₹thi) अ‍ॅप लाँच केले आहे. सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध असणारे ‘साथी’ अ‍ॅप आगामी काळात भारतातील सर्व प्रादेशिक भाषेत उपलब्ध होणार आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.