Share Market : सलग चौथ्या दिवशी मार्केटमध्ये तेजी, सेन्सेंक्स 533 अंकांनी वधारला!
गेल्या वर्षी ऑक्टोबर नंतर निफ्टीने पहिल्यांदाच 18,200 टप्पा पार केला आहे. कालच्या (बुधवारी) तुलनेत आज प्रमुख शेअर्स एक टक्का वाढीसह बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), आयसीआसयीआय (ICICI Bank) आणि इन्फोसिसने (Infosys) आजच्या व्यवहारात आघाडी घेतली. आज टॉप-50 शेअर्सपैकी 37 मध्ये तेजीचं चित्र दिसून आले.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अर्थजगतातील घडामोडीचा शेअर्स बाजारावर आजही परिणाम कायम राहिला. सलग चौथ्या दिवशी शेअर्स बाजारामध्ये तेजीचे वातावरण दिसून आले. प्रमुख निर्देशांक बीएसई (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये (NSE) वाढीचा आलेख चढाच राहिला. सेंन्सेक्स 533.15 अंकाच्या वाढीसह (0.88 टक्के) 61,150.04 वर बंद झाला. निफ्टी 156.60 अंकांच्या वाढीसह (0.87 टक्के) 18,212.35 पोहोचला. गेल्या वर्षी ऑक्टोबर नंतर निफ्टीने पहिल्यांदाच 18,200 टप्पा पार केला आहे. कालच्या (बुधवारी) तुलनेत आज प्रमुख शेअर्स एक टक्का वाढीसह बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआसयीआय (ICICI Bank) आणि इन्फोसिसने (Infosys) आजच्या व्यवहारात आघाडी घेतली. आज टॉप-50 शेअर्सपैकी 37 मध्ये तेजीचं चित्र दिसून आले. आणि 13 शेअर्समध्ये पडझड नोंदविली गेली.
गेल्या 10 आठवड्यात पहिल्यांदाच 30-स्टॉकने 61,000 पेक्षा वरची पातळी गाठली. निफ्टीत समान कामगिरी नोंदवित 18,212.35 अंकांपर्यंत वाढ नोंदविली गेली. 26 नोव्हेंबर, 2021 नंतर पहिल्यांदाच निफ्टी सर्वोच्च स्तरावर बंद झाला.
आजची टॉप कामगिरी
• महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra & Mahindra) 4.5 टक्के • भारती एअरटेल Bharti Airtel • इंडसइंड बँक IndusInd Bank • आरआयएल RIL • आयसीआयसीआय बँक ICICI Bank • टाटा स्टील
आजचे घसरणीचे शेअर्स
• टायटन कंपनी (Titan Company) • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services (TCS) • एचडीएफसी बँक (HDFC Bank) • टेक महिंद्रा (Tech Mahindra) • विप्रो (Wipro)
सेन्सेंक्सची आकडेवारी दृष्टीक्षेपात:
गेल्या पाच दिवसांतील सेन्सेंक्सची कामगिरी आकडेवारीतून जाणून घेऊया-
• 12 जानेवारी 61,150.04 • 13 जानेवारी 60,616.89 • 14 जानेवारी 60,395.63 • 15 जानेवारी 59,744.65 • 16 जानेवारी 59,601.84
आंतरराष्ट्रीय पडझडीनंतर तेजी
आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण आणि कोविड बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर्स मार्केटमध्ये तेजी नोंदविली गेली. सार्वजनिक वित्तीय बँकांची कामगिरीतही वाढ नोंदविली गेली. आगामी अर्थसंकल्पात सरकारी बँकेत परकीय गुंतवणूक मर्यादा 20 टक्क्यांवरुन 74 टक्के करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बांधकाम क्षेत्रातही विक्री संख्येतील वाढीमुळे तेजीचे वातावरण आहे.
संबंधित बातम्या :
पीएनबीच्या ग्राहकांना अलर्ट: बँक सेवा शुल्कात बदल, लॉकरच्या दरात वाढ
गृहकर्जाची वयाशी घाला सांगड; वाढत्या वयाच्या उंबरठ्यावर कर्ज वाटू नये बोजड