हॅचबॅक कार उत्पादनात नंबर वन असलेल्या मारुतीने (Maruti) SUV कार बाजारात पुन्हा दमदार एन्ट्रीसाठी टोयोटाला (Toyota) साद घातली आहे. कंपनी एसयुव्ही आणि इलेक्ट्रिक्स कार्सची (SUV and Electric Cars) मालिका बाजारात आणण्यासाठी पुढाकार घेत आहे. 2019-20 मध्ये 51 टक्के मार्केट शेअर असलेली मारुती कंपनीचा सरत्या वर्षात मार्केट शेअर (Market Share) 43 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचा मार्केट शेअर 8 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे कंपनी टोयोटासोबत करार करत हा 50 टक्क्यांचे बाजारातील स्थान अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. याविषयीची माहिती मारुतीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक हिसाशि ताकुची यांनी दिली. ‘मला वाटते की व्यवसाय इतका सोपा नाही. आम्हाला स्पर्धा करावी लागेल, लढा द्यावा लागेल आणि किफायतशीर किंमतीत स्पर्धात्मक उत्पादने आणावी लागतील,” असं ताकुची यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलंय. उत्पादनातील अडचणी, बाजारातील तीव्र स्पर्धा आणि त्यामुळे बाजारपेठेतील त्यांचा हिस्सा कमी का झाला याविषयी ते बोलत होते.
मारुतीची पॅरेन्ट सुझुकी कंपनीच्या टोयोटाबरोबरच्या भागीदारीबद्दल ते म्हणाले की, हायब्रीड आणि इलेक्ट्रिकमध्ये भागीदाराच्या सामर्थ्यामुळे मारुतीला फायदा होतो. “टोयोटा इंडस्ट्रीतील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. मारुतीसाठी याचा मोठा फायदा होईल. मारुती आणि सुझुकी या दोन्ही कंपन्यांसाठी हा फायदेशीर सौदा असेल ” असे ताकुची यांनी स्पष्ट केले.
इतरांप्रमाणेच, सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे कंपनीलाही उत्पादन खंडित ठेवावे लागले आहे. त्यामुळे कंपनीचे उत्पादन घटले आहे. या सर्व परिस्थितीचा वितरणावर परिणाम झाला असून 2.7 लाख कारचा अनुशेष भरुन काढायचा आहे. तसेच, टाटा मोटर्स आणि इतर ब्रँडच्या शेअरमध्ये वाढ झाल्याने मारुतीचा बाजारातील हिस्सा 2019-20 मधील 51% च्या उच्चांकी पातळीवरून सध्या 8% घसरला आहे.
गेल्या एक वर्षापासून (जॉइंट एमडी म्हणून) भारतात असलेले ताकुची यांना भारतातील कार बाजारात आश्वासक स्थिती दिसून येत आहे. कोविड काळाची आव्हाने असूनही, जागतिक स्तरावर भारताचा कार बाजार फायदेशीर आहे. कारची मागणी ही वाढली असून वाहन कंपन्या आणि त्यासंबंधीत कंपन्यांसाठी येथे मोठी संधी आहे. वाहन बाजार आणखी वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भारतात वाहन कंपन्या आणि इतर उद्योगांसाठी मोठी क्षमता आहे. कारची बाजारपेठ आणखी वाढेल आणि अधिकाधिक लोक कार चालवू लागतील.मात्र ही स्पर्धा ताकुची यांची चिंता वाढविणारी आहे. . टाटा मोटर्स एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक्सच्या यशावर स्वार झाली आहे आणि त्याचप्रमाणे किआ, ह्युंदाई, स्कोडा, महिंद्रा, फोक्सवॅगन आणि एमजी हेक्टर या कंपन्या नव-नवीन दमदार मॉडेल्स बाजारात आणत असल्याने भारतीय बाजारातील स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.
मेक इन इंडिया या अभियानातंर्गत भारतीय कार बाजारात आश्वासक वातावरण तयार झाले आहे. मात्र दुसरीकडे सेमीकंडक्टर्सच्या कमतरतेमुळे मारुतीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला, ज्यामुळे किरकोळ विक्री मंदावली ज्यामुळे बाजारातील हिस्सा कमी झाला आहे.
नवीन इंजिन, 6-स्पीड AT सह Maruti Suzuki Ertiga 2022 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
मेहनत आणि इमानदारीचे फळ; चेन्नईमधील आयटी कंपनीकडून 100 कर्मचाऱ्यांना कारची भेट
लाँचिंगआधीच नवीन Maruti Alto ची झलक सादर, जाणून घ्या कारची संभाव्य किंमत आणि फीचर्स