तब्बल 14 वर्षांनी होणार आगपेटीच्या किमतीत वाढ; जाणून घ्या का वाढवावे लागले दर?

आगपेटी ही तशी शुल्लक गोष्ट वाटते. मात्र आगपेटीचे आपल्या घरातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. दिवा लावण्यापासून तर घरतील चूल पेटवण्यापर्यंत तिचा उपयोग होतो. आता तिच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तब्बल 14 वर्षांनी होणार आगपेटीच्या किमतीत वाढ; जाणून घ्या का वाढवावे लागले दर?
काडीपेटी
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 1:21 PM

Matchbox Price: आगपेटी ही तशी शुल्लक गोष्ट वाटते. मात्र आगपेटीचे आपल्या घरातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. दिवा लावण्यापासून तर घरतील चूल पेटवण्यापर्यंत तिचा उपयोग होतो. काळाच्या ओघात प्रत्येक वस्तूच्या किमती वाढल्या. मात्र गेल्या 14 वर्षांपासून आगपेटीची किंमत स्थिर होती. प्रति आगपेटी एक रुपया असा तिचा दर होता. परंतु आता आगपेटीचे दर देखील वाढणार असून, तिची किंमत दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबरपासून एक रुपयाला मिळणारी आगपेटी आता दोन रुपयांना विकत घ्यावी लागणार आहे. आगपेटीची किंमत आचानक दुप्पट कशी झाली? त्यामागे काय कारण असावे? साहाजिकच असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असणार, आगपेटीचे दर दुप्पट होण्याचे मुख्य कारण म्हणजे ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरामध्ये झालेली वाढ हे आहे.

दर वाढणार असल्याचे समोर आल्यानंतर आगपेटी अचानक चर्चेचा विषय बनली आहे. आगपेटीचा प्रवास तसा अतिषय रोचक आणि मनोरंजक राहिला आहे. 40 वर्षांपूर्वी एका आगपेटीची किंमत ही अवघी 25 पैसे इतकी होती. त्यानंतर 20 वर्षांनी त्यामध्ये वाढ करून तीची किंमत 50 पैसे करण्यात आली. तर 2007 साली दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करून, ती प्रति नग एक रुपयाला विकली जाऊ लागली. आता 2021 साली म्हणजे तब्बल 14 वर्षांनी तिची किंमत ही दोन रुपये करण्यात आली आहे.

90 टक्के उत्पादन तामिळनाडूमध्ये 

आगपेटीच्या दरवाढीला ऑल -इंडिया चेंबर ऑफ इंडस्ट्रीच्या वतीने अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. आगपेटी बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. येत्या डिसेंबरपासून  नवी दरवाढ लागू  करण्यात येणार आहे. सध्या एक रुपयाला मिळणारी आगपेटी डिसेंबरपासून 2 रुपयांना होणार आहे. आगपेटीचे सर्वाधिक उत्पादन हे दक्षिण भारतामध्ये होते. यामध्ये तामिळनाडू आघाडीवर असून, देशातील 90 टक्के उत्पादन हे एकट्या तामिळनाडूमध्ये होते. सध्या स्थितीमध्ये हजारो लोकांना आगपेटी निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार मिळत  आहे. विशेष: या उद्योगात काम करणाऱ्या स्त्रीयांचे प्रमाण अधिक आहे.

14  प्रकारच्या कच्च्या मालाची आवश्यकता 

आगपेटीची काडी बनवण्यासाठी तब्बल 14 प्रकारच्या कच्च्या मालाचा उपयोग होतो.  यामध्ये लाल स्फॉस्फरसची महत्त्वाची भूमिका असते. मगील काही दिवसांमध्ये स्फॉस्फरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. स्फॉस्फरचे दर प्रति किलो 425 रुपयांवरून  810 रुपयांवर पोहोचले आहेत. याचाच अर्थ त्यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे मेनाच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली आहे. मेनाचे दर प्रति किलो 58 रुपयांवरून 80 रुपयांवर पोहोचले आहेत. इतर कच्च्या मालाच्या दरवाढीबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने, आगपेटीची किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती राष्ट्रीय लघु मॅचबॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव व्ही. एस. सेतुरथिनम यांनी दिली आहे. दरम्यान वाढत्या औद्योगिकरणामुळे आग निर्माण करण्यासाठी विविध उपकरणाची निर्मिती झाल्यामुळे आगपेटीवरील अवलंबित्व कमी झाले आहे. परिणामी मागणी घटल्याने हा उद्योग संकटात सापडला असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

पॉलिसी घेताना ही चूक तर केली नाही ना? नाहीतर फुटकी कवडीही मिळणार नाही!

Dhanteras 2021: सोने खरेदी करताना आवर्जून ‘हा’ नियम लक्षात ठेवा नाहीतर धनत्रयोदशीला पोलिस येतील घरी!

70 हजार गुंतवून सुरू करा व्यवसाय, लाखोंच्या कमाईची संधी, सरकार 30% सबसिडी देणार

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.