अदानी समूहासाठी चांगली बातमी, आता कुणी दिली क्लीन चिट

हिंडनबर्गने २४ जानेवारी रोजी दिलेल्या अहवालात दावा केला होता की, अदानी समूहाने आपल्या लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमध्ये हेराफेरी करण्यासाठी मॉरीशसमधील शेल कंपन्यांचा वापर केला आहे.

अदानी समूहासाठी चांगली बातमी, आता कुणी दिली क्लीन चिट
कधी संपणार साडेसाती
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 1:30 PM

नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासमोर काही दिवसांपासून संकटांची मालिका सुरु होती. गेल्या पंधरवाड्यात अदानी समूहाला (Adani Group) मोठा झटका बसला आहे. अमेरिकन संशोधन संस्था हिंडनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाची संपत्ती घसरली आहे. त्यांचे अनेक शेअर गडगडले. परदेशी गुंतवणूकदारांच्या  भूमिकेमुळे अदानी समूहासमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला होता. परंतु आता त्यांच्यांसाठी चांगली बातमी आली आहे. हिंडनबर्गच्या अहवालात जो उल्लेख होतो तो मॉरीशसने फेटाळला आहे. अदानी समूहाला मॉरीशसने क्लीन चीट दिली आहे.

मॉरिशस रेग्युलेटर फायन्सीयल सर्व्हिस कमिशन (FSC)ने अदानी ग्रुपला क्लीन चीट दिली आहे. FSC ने म्हटले आहे की, अदानी समूहाच्या ३८ कंपन्या आणि ११ ग्रुप फंडांची आम्ही तपासणी केली. या तपासणीत कुठेही कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आम्हाला आढळले नाही.

काय होता हिंडनबर्गचा दावा

हे सुद्धा वाचा

हिंडनबर्गने २४ जानेवारी रोजी दिलेल्या अहवालात दावा केला होता की, अदानी समूहाने आपल्या लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमध्ये हेराफेरी करण्यासाठी मॉरीशसमधील शेल कंपन्यांचा वापर केला आहे. परंतु आता मॉरीशस रेग्युलेटर फायन्सीयल सर्व्हिस कमिशनने हा दावा फेटाळत अदानी समूहाला क्लीन चीट दिली आहे.

ऑस्ट्रेलिया, ब्रिटनमध्ये तपास

अदानी समूहाच्या कंपन्यांसंदर्भात ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्येही तपास सुरु आहे. ऑस्ट्रेलियातील सेक्युरिटी अ‍ॅण्ड इन्वेस्टमेट कमीशनने (ASIC) अदानी ग्रुपसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. ASIC ने आम्ही अदानी ग्रुपची चौकशी करणार असल्याचे म्हटले होते. तसेच ब्रिटनमधील फायन्सीयल कंडक्ट ऑथरीटीकडून अदानी ग्रुप व लंडनमधील त्यांच्या कंपन्यांची चौकशी सुरु केली आहे.

संपत्तीत मोठी घट

हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी यांच्या एकूण संपत्तीत एकाच दिवसात जवळपास 20 अब्ज डॉलरचे (1 लाख 60 हजार कोटी रुपये) नुकसान झाले होते. अदानी यांची एकूण संपत्ती 98.5 अब्ज डॉलर झाली आहे. श्रीमंतांच्या यादीतील त्यांच्या स्थानावर याचा परिणाम झाला आहे. तसेच अदानी ग्रुपच्या शेअर्समधील प्रचंड चढउतार रोखण्याच्या उद्देशाने NSE ने मोठा निर्णय घेतला आहे. NSE ने अदानी पोर्टच्या F&O स्टॉक खरेदीवर बंदी घातली आहे. अदानी पोर्ट आणि एंटरप्रायझेसवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

हिंडनबर्गने अदानी समूहाच्या कंपन्यांबाबत एकूण 413 पानांचा अहवाल तयार केला आहे. त्यात गुंतवणूकदारांना भ्रमित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा अहवाल खोटा आणि फसवणूक करणारा असल्याचा दावा अदानी समूहाने केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.