भाऊ-बहिणीची कमाल, उद्योग विश्वात वेगवेगळ्या कंपन्या उभारून बनले अब्जाधीश

निकिल विश्वनाथन आणि तारा हे दोन्ही त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या आई-बाबांना देतात. त्यांचे वडील बाळू विश्वानथन आणि आई उषा विश्वनाथन यांच्याकडून त्यांनी धडे घेतले. उद्योगात जोखीम पत्करून पुढे जाण्याचे कौशल्य त्याने त्यांच्याकडून घेतले. बाळू विश्वनाथन डॉक्टर तर उषा विश्ननाथन अकाउंटंट आहेत.

भाऊ-बहिणीची कमाल, उद्योग विश्वात वेगवेगळ्या कंपन्या उभारून बनले अब्जाधीश
निकिल विश्वनाथन तारा विश्वनाथन
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 5:37 PM

उद्योगात कधी, कधी मुले आई-वडिलांकडून धडे घेऊन सरस कामगिरी करतात. भारतातील अनेक उद्योग समुहात हे दिसून आले आहे. परंतु एकाच घरातील एक भाऊ आणि एक बहीण वेगवेगळ्या कंपन्या उभारुन अब्जाधीश बनतात. उद्योग क्षेत्रात आपला वेगवेगळा ठसा उमटवतात, असे प्रकार क्वचितच दिसतो. निकिल विश्वनाथन आणि त्याची बहीण तारा विश्वनाथन यांनी उद्योग जगात असेच काहीसे वेगळे केले आहे. उद्योग करणाऱ्यांसाठी ते भाऊ-बहीण उदाहरण झाले आहेत. या दोघांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवी मिळवली आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत निकिल विश्वनाथन यांचे नाव समाविष्ट केले गेले आहे.

84 हजार कोटी रुपयांची कंपनी

अल्केमीचे संस्थापक आणि सीईओ 35 वर्षीय निकिल विश्वनाथन आहेत. त्याच्या कंपनीला ‘ब्लॉकचेन माइक्रोसॉफ्ट’ म्हटले जाते. त्यांच्या कंपनीचे मार्केट कॅपिटल 10 अब्ज डॉलर (सुमारे 84 हजार कोटी रुपये) आहे. स्वत:ची कंपनी सुरु करण्यापूर्वी निकिल विश्वनाथन यांनी फेसबुक, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या अव्वल कंपन्यांमध्ये काम केले. अल्केमीची स्थापना करण्यापूर्वी, निकिलने डाउन टू लंच हे सोशल ॲप तयार केले होते. त्यानंतर 2020 मध्ये अल्केमीची स्थापना केली. चार वर्षांत कंपनीची आपले वेगळी ओळख निर्माण केली.

बहिणीची स्वत:ची कंपनी

निकिल विश्वनाथन यांची 33 वर्षीय बहीण तारा विश्वनाथन देखील उद्योग जगात यशस्वी उद्योजक म्हणून ओळखल्या जात आहेत. त्या रुपा हेल्थच्या सीईओ आहेत. त्यांची कंपनी आरोग्य क्षेत्रात झपाट्याने वाढणारी कंपनी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 1,000 कोटी रुपये आहे. व्यवसायाच्या जगात येण्यापूर्वी तारा यांनीसुद्धा अनेक कंपन्यांमध्ये कामही केले. त्यानंतर स्वत:ची कंपनी सुरु केली.

हे सुद्धा वाचा

यशाचे श्रेय आई-वडिलांना

निकिल विश्वनाथन आणि तारा हे दोन्ही त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या आई-बाबांना देतात. त्यांचे वडील बाळू विश्वानथन आणि आई उषा विश्वनाथन यांच्याकडून त्यांनी धडे घेतले. उद्योगात जोखीम पत्करून पुढे जाण्याचे कौशल्य त्याने त्यांच्याकडून घेतले. बाळू विश्वनाथन डॉक्टर तर उषा विश्ननाथन अकाउंटंट आहेत.

नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....