AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीएनजी, पीएनजीचे दर वाढले, मुंबईला दरवाढीचा डबल डोस; काय आहेत नवे दर तपासा!

सीएनजी 90 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे आता गाड्या विकून गावाला जायचं एवढंच बाकी आहे. त्याशिवाय पर्यायच राहिला नाही. नाही तर आम्ही जगू शकत नाही.

सीएनजी, पीएनजीचे दर वाढले, मुंबईला दरवाढीचा डबल डोस; काय आहेत नवे दर तपासा!
CNG Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 12:04 PM

नवी दिल्ली: वाहनचालकांसाठी एक वाईट बातमी आहे. सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरात वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे 3.5 रुपयाने तर पीएनजीच्या दरात प्रति किलोमागे 1.5 रुपयाने वाढ केली आहे. मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच नवे दर लागू करण्यात आले आहेत. या दरवाढीचा सर्वाधिक फटका देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला (Mumbai) बसला आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे वाहनचालकांना प्रचंड फटका बसला असून वाहनचालकांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे.

वाढत्या खर्चाचं कारण देऊन ही दरवाढ करण्यात आली आहे. तसेच गॅसची कमतरता हे एक कारणही दरवाढीमागे असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईत सीएनजी दरात 3.5 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत सीएनजी प्रति किलोग्राम 89.50 रुपये झालं आहे. तर मुंबईत पीएनजी दरात 1.5 रुपये झाली आहे. त्यामुळे मुंबईत आता पीएनजीची किंमत 54 रुपये प्रति एमसीएमवर गेली आहे.

या दरवाढीचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला आहे. गेल्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये मुंबईत सीएनजीच्या किंमती 6 रुपये प्रति किलोग्राम आणि पीएनजीचे दर 4 रूपयाने वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता ही दरवाढ केल्याने मुंबईतील वाहनचालकांचं कंबरडं मोडलं आहे.

दरम्यान, सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढल्याने मुंबईतील टॅक्सी चालक चांगलेच संतप्त झाले आहे. या दरवाढीवर टॅक्सी चालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरवाढ झाली आहे. त्यामुळे मेंटेन्सही निघत नाही. कसं घर चालवायचं कळत नाही. बेक्कार कंडीशन सुरू आहे. काय करावं तेच कळत नाही, असं एका टॅक्सी चालकाने सांगितलं.

सीएनजी 90 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे आता गाड्या विकून गावाला जायचं एवढंच बाकी आहे. त्याशिवाय पर्यायच राहिला नाही. नाही तर आम्ही जगू शकत नाही, असा उद्वेगही या चालकाने व्यक्त केला.

पेट्रोल डिझेल परवडत नव्हतं म्हणून सीएनजी गाड्या घेतल्या. आता त्याही परवडेनाश्या झाल्या आहेत. सीएनजी 50 रुपयांवरून 100 रुपयांवर सीएनजी नेला. काय परवडणार आम्हाला? आता गाड्या विकायच्या आणि गावाला जायचं एवढंच करावं लागणार आहे, असंही तो म्हणाला.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.