घरांसाठी म्हाडा पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील जमीनी ताब्यात घेणार; संबंधित विभागाकडे प्रस्ताव दाखल

म्हाडाची घरे खरेदी करण्याकडे सध्या ग्राहकांचा कल वाढत आहे. मात्र सध्या मोकळी जागा नसल्याने परवडणारी घरे उपलब्ध करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर कोकण मंडळाने म्हाडाची घरे बांधण्यासाठी मोकळय़ा जमिनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

घरांसाठी म्हाडा पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील जमीनी ताब्यात घेणार; संबंधित विभागाकडे प्रस्ताव दाखल
मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांची सोडत निघणार
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 10:37 AM

मुंबई : म्हाडाची घरे खरेदी करण्याकडे सध्या ग्राहकांचा कल वाढत आहे. मात्र सध्या मोकळी जागा नसल्याने परवडणारी घरे उपलब्ध करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर कोकण मंडळाने म्हाडाची घरे बांधण्यासाठी मोकळय़ा जमिनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ निर्णयच घेण्यात आला नाही तर मंडळ कामाला देखील लागले आहे. पालघर, रायगड आणि ठाणे येथील शासकीय जमिनी मंडळाने शोधून काढल्या आहेत. या जमिनी सरकारी नियमानुसार ताब्यात मिळाव्यात यासाठी मंडळाकडून सरकारकडे प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. हे एकूण  274.11 हेक्टर क्षेत्र असून, ते मिळवण्यासाठी कोकण मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत.

महसूल, पाटबंधारे विभागांच्या मालकीच्या जागा 

दरम्यान कोकण मंडळाच्या या प्रयत्नांना यश आल्यास भविष्यात पालघर, रायगड आणि ठाण्यात मोठ्या संख्येने म्हाडाची घरे उपलब्ध होतील. याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होणार असून, त्यांना परवडणाऱ्या घरांचा लाभ मिळू शकतो. मंडळाने संबंधित जिल्ह्यात शोधलेल्या या जागा महसूल विभाग, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग यांच्या मालकीच्या आहेत. या जागा ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकार तसेच संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच या जागांचा ताबा मिळून बांधकामाला सुरुवात होईल अशा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे.

मफतलाल कंपनीची जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न

दरम्यान परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी कळव्यामधील मफतलाल कंपनीची जमीन ताब्यात मिळावी, अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासाठी उच्चा न्यायालयात अर्ज देखील करण्यात आला आहे. ही जमीन ताब्यात आल्यास या जमीनीवर 30 हजारांहून अधिक घरांचा मोठा प्रकल्प उभारणे शक्य असल्याचे म्हाडाने म्हटले आहे. यामुळे अनेक नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध होऊ शकते.

संबंधित बातम्या 

आता असंघटीत क्षेत्रातील मजुरांनाही मिळणार पेन्शन; ‘असे’ असेल योजनेचे स्वरूप

कारभारात त्रुटी असल्याचा ठपका; आरबीआयकडून रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ बरखास्त

तुम्हाला नवीन व्यवयाय सुरू करायचाय? तर जीएसटीबाबत जाणून घ्या ‘हे’ महत्त्वाचे नियम

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.