फक्त 83 हजारांत वयाच्या 22 वर्षी सुरु केला उद्योग, आज मुकेश अंबानींपेक्षा जास्त संपत्ती
Michael Dell Net Worth: गेल्या काही वर्षांत कंपनीला मिळालेल्या यशानंतर मायकेल डेलची एकूण संपत्ती झपाट्याने वाढली आहे. आज त्यांची एकूण संपत्ती मुकेश अंबानींपेक्षा जास्त आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या मते, मायकेल डेल हे जगातील 11 वे अब्जाधीश आहेत.
Michael Dell Net Worth: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी सर्वांना परिचित आहेत. जगातील अब्जाधिशांच्या यादीत ते बाराव्या क्रमांकावर आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडिक्सनुसार, मागील काही दिवसांपासून त्यांची संपत्ती वाढली आहे. आता मुकेश अंबानी यांची संपत्ती 110 अब्ज डॉलर झाली आहे. परंतु एक व्यक्तीने संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी यांनाही मागे टाकले आहे. मुकेश अंबानी यांना मागे टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे मायकल डेल. अमेरिकेतील मल्टीनॅशनल कंपनी डेल इंकचे ते संस्थापक आणि सीईओ आहेत.
83 हजारांत सुरुवात
डेल कंपनी जगभरात कॉप्यूट्यर, लॅपटॉप आणि इतर पूरक सामग्रीची निर्मिती आणि विक्री करते. या कंपनीची सुरुवात आणि प्रवासाबाबत डेल यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. मायकल डेल यांनी वयाच्या 22 वर्षी 1984 मध्ये करीअर सुरु केले. ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठाच्या डोरमेट्री रूममध्ये फक्त 1000 डॉलर (जवळपास 83,303 रुपये) मध्ये डेल टेक्नोलॉजीजची सुरुवात केली. त्यानंतर फक्त तीन वर्षांत म्हणजे 1987 कंपनीचा महसूल 159 दक्षलक्ष डॉलर झाले होते. आज कंपनीचा महसूल 101 अब्ज डॉलर होणार आहे. 1984 मध्ये त्यांनी विद्यापीठाच्या डोरमेट्री रूममध्ये संगणक बनवण्यास सुरुवात केली होती. परंतु जेव्हा मागणी वाढली तर विद्यापीठाचे कॅम्पस सोडून स्वतंत्र ठिकाणी उद्योग सुरु केला.
टर्बो पीसी 1985 मध्ये बनवला
डेल यांनी टर्बो पीसी 1985 मध्ये बनवला. तो डेल-डिझाइन केलेला पहिला संगणक होता. तेव्हापासून, कंपनी जागतिक पातळीवर अनेक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर उत्पादने तयार करत आहेत. कंपनीने गेल्या काही वर्षांत अनेक यशस्वी विलीनीकरण केले आहेत. गेल्या काही वर्षांत कंपनीला मिळालेल्या यशानंतर मायकेल डेलची एकूण संपत्ती झपाट्याने वाढली आहे. आज त्यांची एकूण संपत्ती मुकेश अंबानींपेक्षा जास्त आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या मते, मायकेल डेल हे जगातील 11 वे अब्जाधीश आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती $112 अब्ज आहे. या वर्षी त्यांनी 33.4 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे, तर मुकेश अंबानी यांनी या वर्षी 13.8 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे.