इलोन मस्क यांची नवीन AI कंपनी, ChatGPT ला देणार टक्कर, पाच वर्षांत कृत्रिम बुद्धीमत्तेच्या पलिकडे पोहचणार AI
इलोन मस्क यांनी नवीन xAI कंपनी सुरु केली आहे. या नव्या स्टार्टअपमुळे आता 52 वर्षीय इलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांची यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच चालली आहे.
नवी दिल्ली : खाजगी अंतराळ पर्यटन घडविणाऱ्या ‘स्पेसएक्स’ आणि इलेक्ट्रीक कार कंपनी ‘टेस्ला’चे प्रमुख असलेल्या आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी नविन आर्टीफिशियल इंटेलिजन्स ( AI ) कंपनी काढली आहे. या कंपनीने ते ChatGPT या कंपनीला टक्कर देणार आहेत का ? की आणखी काही उद्देश्य आहेत या मागे ते पाहूयात. इलोन मस्कच्या नवीन एआय कंपनीचे नाव xAI असे आहे. तिच्या वेबसाईटवर कंपनीच्या टीमला मस्क लीड करणार आहेत असे म्हटले आहे.
इलोन मस्कच्या नव्या xAI कंपनीत अनेक दिग्गज काम करणार आहेत. उदाहरणार्थ Google, DeepMind, Microsoft corp. Tesla Inc. आणि टोरंटो युनिव्हर्सिटी सारख्या संस्थांमधील प्रोफेसर या नव्या xAI कंपनीची धुरा सांभाळणार आहेत. एआयचे गॉडफादर म्हटले जाणारे जेफ्री हिंटन यांच्या हाताखाली अभ्यास करणाऱ्या दोन जणांचा या टीममध्ये समावेश असणार आहे. या नव्या स्टार्टअपमुळे आता 52 वर्षीय इलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांची यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच चालली आहे. यात स्पेसएक्स, ट्वीटर, न्यूरालिंक, बोरिंग तसेच आता एक्सएआय या नव्या कंपनीची भर पडली आहे.
ChatGPT या आर्टीफिशिल इंटेलिजन्स ( AI ) कंपनीने अनेक कामे सोपी केली असली तरी तिच्या पावलांवर पाऊल ठेवून अनेक AI कंपन्यांनी बाजारात धूम मचविली आहे. परंतू एआय कंपन्यांमुळे मानवी प्रज्ञेला धोका तर निर्माण होणार नाही ना ? याची चिंता व्यक्त केली जात आहे.
जगाच्या निर्मितीचे अंतिम सत्य शोधणार
इलोन मस्क यांनी ट्रुथ जीपीटीचे एक असे एआय मॉड्यूल विकसित करायचे ठरविले आहे, जे जगाच्या निर्मितीचे अंतिम सत्य शोधून काढेल. अखेर त्यांनी त्यांचा शब्द खरा करीत नवीन xAI ची सुरुवात करुन टाकली आहे. इलोन मस्क ओपन एआय कंपनीचे सहसंस्थापक असून त्यांनी ही कंपनी साल 2018 मध्ये सोडली होती. ओपन एआय कंपनीने गेल्यावर्षी चॅट जीपीटी या कंपनीला लॉंच केले होते.
या वर्षअखेर मानवी मेंदूला चिप
इलोन मस्क यांनी एप्रिल महिन्यातच एआय टूल लॉंच करण्याची घोषणा केली होती. TruthGPT चा एक असे एआय मॉडेल विकसित इलोन मस्कच्या न्यूरालिंक या कंपनीला अलिकडेच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने ह्युमन ट्रायल परवानगी दिली आहे. त्यामुळे मानवी मेंदूत चिप बसविण्याचा प्रयोग या वर्षअखेर सत्यात येणार आहे. ही एआय चिप जर मानवी मेंदूला बसविण्यात यश आले तर वृद्धापकाळात येणारे पक्षाघात, लकवा, अल्मायझर्स अनेक आजार टाळता येतील असे म्हटले जात आहे.