बापरे! सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेले लाखो रुपये पोस्टातून गायब, नेमकं प्रकरण काय?

डझनभर गावकऱ्यांनी या गावाच्या पोस्ट ऑफिसमध्ये सुमारे 18.50 लाख रुपये जमा केले होते. यामध्ये सुकन्या समृद्धी योजना, बचत खाते आणि आरडीमधील पैशांचा समावेश आहे.

बापरे! सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेले लाखो रुपये पोस्टातून गायब, नेमकं प्रकरण काय?
sukanya samriddhi scheme
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 1:39 PM

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये (SSY) डिपॉझिट खाते असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सुकन्या समृद्धी योजना आणि बचत खाते अंतर्गत जमा केलेले लाखो रुपये उत्तर प्रदेश (यूपी) च्या पोस्ट ऑफिसमधून गायब झालेत. हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील बरौत भागातील पोस्ट ऑफिसचे आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये सुमारे 18.50 लाख रुपये जमा होते

विभागीय चौकशीत दोषी आढळलेल्या पोस्ट ऑफिसरला पोस्टानं निलंबित केले. यासोबतच त्याच्याविरोधात खटला दाखल करण्याची तयारीही करण्यात आली आहे. डझनभर गावकऱ्यांनी या गावाच्या पोस्ट ऑफिसमध्ये सुमारे 18.50 लाख रुपये जमा केले होते. यामध्ये सुकन्या समृद्धी योजना, बचत खाते आणि आरडीमधील पैशांचा समावेश आहे.

खातेदार अस्वस्थ

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पोस्ट ऑफिसमध्ये तैनात असलेले कार्यवाहक पोस्टमास्टर देवेंद्र यांनी ही रक्कम चोरली. त्यामुळे संपूर्ण विभागाला किंवा खातेदारांना ती मिळाली नाही. ही बाब उघड होताच खातेदार अस्वस्थ झाले. त्यांनी तात्काळ त्याबद्दल तक्रार केली. विरोधात तक्रार मिळताच विभागीय चौकशी सुरू झाली. तपासात दोषी आढळल्यानंतर कार्यवाहक पोस्टमास्तरला निलंबित करण्यात आले.

अशा प्रकारे लाखो रुपयांचा गंडा घातला

केअरटेकर पोस्टमास्तरांकडे कोणी पैसे जमा करायला गेल्यानंतर तो त्यांच्याकडून पैसे घ्यायचा, पण खात्यात जमा केल्याची एंट्री करायचा नाही. यासोबतच तो खातेदारांच्या पासबुकची हातानेच एंट्री करत होता. तो जमा केलेले पैसे त्याच्याकडे ठेवत असे. अशा प्रकारे त्याने 18 लाख 50 हजार रुपयांवर डल्ला मारला. खातेधारकांना वाटले की, त्यांच्या कष्टाचे पैसे पोस्ट ऑफिसमध्ये जमा केले जात आहेत. काही गावकरी पासबुकमध्ये एंट्री घेण्यासाठी गेले असता, त्यांनी कॉम्प्युटरद्वारे अपडेट करण्यास सांगितले. कॉम्प्युटरवर प्रवेश केल्यानंतर त्यांनी जमा केलेली रक्कमच नव्हती. यानंतर त्यांनी हेड पोस्ट ऑफिस बरौतमध्ये एंट्री केली, तरीसुद्धा त्यांच्या खात्यात पैसे नव्हते. मग ही बाब उघडकीस आली.

संबंधित बातम्या

Flipkart Wholesale कडून किराणा दुकानांसाठी नवी क्रेडिट योजना, 5 हजार ते 2 लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज

50 हजारांपेक्षा जास्त रकमेचा चेक देताय? RBI च्या नव्या नियमाने धाकधूक वाढवली

Millions of rupees deposited in Sukanya Samrudhi Yojana disappear from post, what exactly is the case?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.