AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya L1 : सूर्य देव पावला! या कंपनीला झाला इतक्या हजार कोटींचा फायदा

Aditya L1 : चंद्रयान-3 नंतर आदित्य एल1 आणि पुढे मिशन गगनयानसाठी ही कंपनी काम करत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने तेजीचे सत्र दिसून येत आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये 15 टक्के तेजी दिसून आली. त्यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये जोरदार वाढ नोंदवल्या गेली.

Aditya L1 : सूर्य देव पावला! या कंपनीला झाला इतक्या हजार कोटींचा फायदा
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 6:43 PM

नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : 2 सप्टेंबर रोजी भारताचे पहिले सौर मिशन, आदित्य एल1 (Aditya L1 ) चा प्रवास सुरु झाला. पण त्यापूर्वी या कंपनीच्या शेअरने मोठी कमाई केली. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजीचे सत्र दिसून आले. त्यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 1100 कोटी रुपयांची वृद्धी दिसून आली. कंपनी PSLV आणि GSLV साठी लिक्विड प्रोपल्शन रॉकेट इंजिन, क्रायोजेनिक इंजिन, इलेक्ट्रो न्यूमेटिक मॉड्यूल असे अत्याधुनिक उत्पादने तयार करते. चंद्रयान-3, आता आदित्य एल1 आणि पुढे मिशन गगनयानसाठी ही कंपनी मोठं योगदान देत आहे. सध्या या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र सुरु आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये 15 टक्के तेजी दिसून आली.

कोणती आहे कंपनी

MTR Tech Company ही अंतराळ संशोधनासाठी तांत्रिक, तंत्रज्ञान उत्पादनाचा पुरवठा करणारी मोठी कंपनी आहे. या कंपनीचे सध्या सात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहे. हैदराबाद, तेलंगाणा यासह इतर ठिकाणी हे प्लँट आहेत. एमटीएआर क्लीन एनर्जी – सिव्हिल न्यूक्लिअर पॉवर, फ्यूल सेल, हाइड्रो पॉवर, स्पेस अँड डिफेंस सेक्टरमध्ये काम करते. गेल्या चार दशकांपासून या क्षेत्रात कंपनीचा दबदबा आहे.

हे सुद्धा वाचा

गगनयानवर काम सुरु

एमटीएआर टेक कंपनीने चंद्रयान-3 नंतर आदित्य एल1 साठी काम केले आहे. आता मिशन गगनयानसाठी कंपनी काम करत आहे. कंपनी ग्रीड फिन आणि क्रिटकल स्ट्रक्चर निर्मितीवर भर देत आहे. चंद्रयान-3 च्या यशानंतर कंपनीचा शेअर एकदम वधारला. चंद्रयान-3 साठी रॉकेट इंजिनचे मुख्य उत्पादने आणि क्रायोजेनिक इंजिन कोर पंप या कंपनीने तयार केला.

शेअर एकदम उच्चांकावर

बीएसईवरील आकड्यानुसार, कंपनीचा स्टॉक 1 सप्टेंबर रोजी शुक्रवारी 14.75 टक्के उसळला. गेल्या 52 आठवड्यातील कंपनीचा हा उच्चांक होता. कंपनीचा शेअर 2,817.75 रुपयांवर पोहचला. त्यानंतर कंपनीचा शेअर 10.97 टक्क्यांनी वाढून 2,724.90 रुपयांवर बंद झाला.

काही तासातच 1100 कोटींची कमाई

शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये तुफान आले. काही तासातच कंपनीचा शेअर उच्चांकावर 2,817.75 रुपयांवर पोहचला. कंपनीचे मार्केट कॅप 8,667.28 कोटी रुपये झाले. तर एक दिवसापूर्व गुरुवारी कंपनीचा शेअर 7,553.01 कोटी रुपयांवर होता. कंपनीच्या भांडवलात काही तासांत 1,114.27 कोटींचा फायदा झाला. येत्या काही दिवसात हा शेअर मोठा पल्ला गाठण्याची शक्यता आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.