AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Titanic Submarine : खोल समुद्रात नाट्यमय घटना, पाकिस्तानी अब्जाधीश गायब, इतक्या संपत्तीचा आहे धनी

Titanic Submarine : टायटॅनिक जहाजाचे अवशेष बघण्यासाठी खोल समुद्रात गेलेली पाणबुडी तीन दिवसांपासून गायब आहे. त्यात मूळ पाकिस्तानी असलेल्या ब्रिटिश अब्जाधीश शहजादा दाऊद इतर जणांसह हरवला आहे.

Titanic Submarine : खोल समुद्रात नाट्यमय घटना, पाकिस्तानी अब्जाधीश गायब, इतक्या संपत्तीचा आहे धनी
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 4:06 PM

नवी दिल्ली : खोल समुद्रात बुडालेले टायटॅनिक जहाज पाहण्यासाठी एका पाणबुडीतून काही जण गेले होते. 18 जून रोजी ही पाणबुडी खोल समुद्रात शिरली. 1 तास 45 मिनिटांनी या पाणबुडीचा संपर्क तुटला. तेव्हापासून तिचा तपास सुरु आहे. पण आता चिंता अधिक वाढली आहे. या पाणबुडीत 24 तासांहून कमी तासांसाठी ऑक्सिजन शिल्लक आहे. या पाणबुडीत मूळ पाकिस्तानी असलेल्या ब्रिटिश अब्जाधीश शहजादा दाऊद (Shahzada Dawood) याच्यासह एकूण पाच माणसं आहेत. या नाट्यमय घटनेनंतर सर्वत्र पुन्हा बर्म्युडा ट्रँगल सारख्या, टायटॅनिकच्या शापाच्या चर्चांना ऊत आला आहे. दाऊद हा धनाढ्य (Richest Man) गायब झाल्याने सर्वच यंत्रणा हादरल्या आहेत.

पाच व्यक्ती गेल्या कुठे या पाणबुडीत पाच लोक होते. यामध्ये ही पाणबुडी तयार करणारी कंपनी ओशीन गेटचे सीईओ स्टॉकटॉन रश, फ्रांसचे मॅरिटाईम एक्सपर्ट पॉल हेनरी नार्गिओलेट, दुबईतील बिझनेसमन हॅमिश हार्डिंग, पाकिस्तानी-ब्रिटिश बिझनेसमन शहजादा दाऊद आणि त्याचा 19 वर्षीय मुलगा सुलेमान यांचा सहभाग होता. दाऊद हा अब्जाधीश असून त्याचा व्यापार फार मोठा आहे.

ताजा अपडेट काय तपास करणाऱ्या पथकाला टायटॅनिकच्या जवळपास काही आवाज ऐकू आल्या आहेत. पण याठिकाणी दृश्यमानता अत्यंत कमी असल्याने तपास कार्यात मोठा अडथळा येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही पाणबुडी गायब झाल्याने अनेक चर्चांना ऊत आला आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहे शहजादा दाऊद शहजादा हे पाकिस्तानी कंग्लोमरेट एन्ग्रो कॉर्पोरेशन कंपनीचे उपाध्यक्ष आहे. ही कंपनी खते, बी-बियाणे तयार करते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, शहजादा त्याची पत्नी क्रिस्टीन आणि मुलांसह दक्षिण पश्चिमी लंडनमध्ये राहतो. त्यापूर्वी ते कॅनडामध्ये राहत होते.

अनेक ठिकाणी वावर शहजादा कुटुंबियांसह अनेक सामाजिक कार्यात सक्रीय आहे. सामाजिक संस्ता दाऊद फाऊंडेशनसाठी तो काम करतो. तसेच कॅलिफोर्नियातील संशोधन संस्था SETI मध्ये पण काम करतो. शहजादा हे निसर्ग आणि पर्यावरणासंबंधीच्या चळवळीत पण काम करतात. याविषयीवर त्यांनी अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये विचार मांडले आहेत. त्यांचा मुलगा सुलेमान पण त्यांच्यासोबत या पाणबुडीत गेला होता. या कुटुंबाला सायन्स फिक्शनची गोडी आहे. त्यामुळे ते अशा साहसी मोहिम आखातात आणि त्यात सहभागी होतात.

किती आहे शहजादा दाऊदची संपत्ती शहजादा दाऊदचे कुटुंब पाकिस्तानमधील धनाढ्य कुटुंबांपैकी एक आहे. विविध मीडिया रिपोर्टसनुसार, त्यांची एकूण नेटवर्थ जवळपास 350 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये त्यांची संपत्ती जवळपास 2868 कोटी रुपये आहे.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.