MobiKwik IPO: मोबिक्विकच्या IPO ला सेबीकडून मंजुरी, कंपनी बाजारातून 1900 कोटी गोळा करणार
सिकोइया कॅपिटल आणि बजाज फायनान्स लिमिटेडची मोबिक्विकमध्ये मोठी गुंतवणूक आहे. या कंपनीची थेट स्पर्धा व्हॉट्सअॅप, गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या पेमेंट अॅप्सशी आहे. PwC च्या अहवालानुसार, भारताचे डिजिटल पेमेंट मार्केट 2022-2030 पर्यंत 2.3 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. अशा परिस्थितीत मोबिक्विक सारखी डिजिटल पेमेंट सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना मोठा वाव आहे.
नवी दिल्लीः MobiKwik IPO: MobiKwik ला भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) कडून 1,900 कोटी रुपयांच्या आरंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) साठी मंजुरी मिळाली. गुरुग्राम स्थित कंपनीने जुलै महिन्यात सेबीकडे IPO (DRHP) साठी कागदपत्रे सादर केली होती. आयपीओमधून 1,900 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. आयपीओंतर्गत 1,500 कोटी रुपयांचे नवीन समभाग जारी केले जातील. याशिवाय कंपनीचे विद्यमान भागधारक 400 कोटी रुपयांच्या विक्रीसाठी ऑफर आणतील. मर्चंट बँकिंग सूत्रांनी सांगितले की, सेबीने मोबिक्विकच्या आयपीओला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात कंपनीकडून त्वरित प्रतिसाद मिळाला नाही.
गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या पेमेंट अॅप्सशी टक्कर
सिकोइया कॅपिटल आणि बजाज फायनान्स लिमिटेडची मोबिक्विकमध्ये मोठी गुंतवणूक आहे. या कंपनीची थेट स्पर्धा व्हॉट्सअॅप, गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या पेमेंट अॅप्सशी आहे. PwC च्या अहवालानुसार, भारताचे डिजिटल पेमेंट मार्केट 2022-2030 पर्यंत 2.3 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. अशा परिस्थितीत मोबिक्विक सारखी डिजिटल पेमेंट सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना मोठा वाव आहे.
1 कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते
MobiKwik द्वारे दररोज 10 लाखांहून अधिक व्यवहार केले जातात. मोबिक्विकचा वापर करून फोन रिचार्ज करता येतात, बिल जमा करता येतात आणि अनेक ठिकाणी पेमेंटही करता येते. सध्या 30 लाखांहून अधिक व्यापारी आणि किरकोळ विक्रेते मोबिक्विकशी संबंधित आहेत. सध्या मोबिक्विकच्या ग्राहकांची संख्या 1.07 कोटींपेक्षा जास्त आहे.
पेटीएम सर्वात मोठा आयपीओ आणण्याच्या तयारीत
यापूर्वी पेटीएमने देशातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. पेटीएमच्या बोर्डाने या वर्षी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत आयपीओद्वारे सुमारे 22,000 कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली. कंपनीचे लक्ष्य आहे की, या IPO मध्ये त्याच्या संपूर्ण उपक्रमाचे बाजार मूल्य 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. यामुळे विद्यमान गुंतवणूकदारांना त्यांचे काही शेअर्स विकण्याची संधी देखील मिळेल.
संबंधित बातम्या
मोदी सरकारनं एअर इंडिया टाटांना विकली, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचे काय? पगार आणि भत्ते किती मिळणार?
मोठी बातमी, एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समूहाकडे, मंत्री गटाचं शिक्कामोर्तब
MobiKwik IPO: MobiQuik IPO approved by SEBI, company to raise Rs 1,900 crore from market