Budget 2024: भारताशी पंगा घेतल्यानंतर अर्थसंकल्पातून मालदीवला मोदी सरकारचा झटका, या देशाला भरभरुन निधी

केंद्रीय अर्थसंकल्पात भारताच्या 'नेबर्स फर्स्ट' धोरणाच्या अनुषंगाने भूतानला भरभरुन मदत दिली आहे. भूतानसाठी 2068 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु मालदीवला दिल्या जाणाऱ्या निधीत कपात केली आहे.

Budget 2024: भारताशी पंगा घेतल्यानंतर अर्थसंकल्पातून मालदीवला मोदी सरकारचा झटका, या देशाला भरभरुन निधी
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 8:29 AM

चीनशी मैत्री करुन भारताशी पंगा घेणाऱ्या मालदीवला मोदी सरकारने आणखी एक झटका दिला आहे. भारतासोबतच्या मैत्रीला तडा देत मालदीवने त्या ठिकाणी असलेल्या भारतीय लष्कराला परत जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमधील फोटो ट्विट करत पर्यटनासाठी येण्याचे आवाहन केले. त्याच्या मिरच्या मालदीवला झोंबल्या होते. त्यानंतर मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारमधील मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मग भारतात बॉयकॉट मालदीव मोहीम सुरु झाली. त्याचा परिणाम मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर झाला. पर्यटनाच्या अर्थव्यवस्थेवर असलेल्या मालदीवमध्ये जाणारे भारतीय पर्यटकांची संख्या झपाट्याने कमी झाली. आता या सर्व घडामोडींच्या परिणाम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात दिसून आला. मालदीवला दिल्या जाणाऱ्या निधीत मोठी कपात करण्यात आली आहे.

मालदीवच्या निधीस कात्री

केंद्रीय अर्थसंकल्पात भारताच्या ‘नेबर्स फर्स्ट’ धोरणाच्या अनुषंगाने भूतानला भरभरुन मदत दिली आहे. भूतानसाठी 2068 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु मालदीवला दिल्या जाणाऱ्या निधीत कपात केली आहे. मालदीवला गतवर्षी 770 कोटी रुपयांचा निधी दिला होतो. तो यंदा 400 कोटी रुपये करण्यात आला आहे. मालदीवला वाटप करण्यात आलेल्या निधीतील दोन्ही देशांमधील संबंध तणावाखाली असताना कपात करण्यात आली आहेत.

हे सुद्धा वाचा

परराष्ट्र मंत्रालयाला 22,154 कोटींची तरतूद

परराष्ट्र मंत्रालयाला या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात एकूण 22,154 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीची तरतूद 29,121 कोटी रुपये होती. फेब्रुवारीमध्ये संसदेत सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात परराष्ट्र मंत्रालयालाही अशीच तरतूद करण्यात आली होती.

भूतानकडून मिळणारी रक्कमही कमी झाली

अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार, मालदीवसाठी केलेली तरतूद आता केवळ 400 कोटी रुपये आहे. भूतानसाठी 2024-25 या आर्थिक वर्षात 2068 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर गेल्या वर्षी ही रक्कम 2398 कोटी रुपये होती.

अफगाणिस्तानला 200 कोटी रुपयांचे वाटप

अफगाणिस्तानशी भारताचे विशेष संबंध चालू ठेवत त्या देशासाठी 200 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय मदत राखून ठेवण्यात आली आहे. 2023-24 मध्ये अफगाणिस्तानसाठी 220 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.