LPG Gas कनेक्शन घेतल्यावर सरकार देणार 1600 रुपये, तुम्हीही घेऊ शकता संधीचा लाभ
या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना एलपीजी कनेक्शन देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : LPG Gas Connections : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात एक कोटी नवीन गॅस कनेक्शन (Gas Connections) देण्याची मोठी घोषणा केली आहे. याअंतर्गत सरकार आता आणखी खास योजना नागरिकांसाठी आणत आहे. ही गॅस जोडणी उज्ज्वला योजनेत (Ujjwala Yojana) दिली जाणार आहे. इतकंच नाहीतर सरकारने या योजनेचा विस्तार करणार असल्याचंही सांगितलं आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना एलपीजी कनेक्शन देण्यात येणार आहे. (modi government give 1600 rupees on lpg gas connection under ujjwala scheme here is the process)
मिळवा 1600 रुपये
सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करतं. यामध्ये शासनाने 1600 रुपये देण्याचं ठरवलं आहे. एलपीजी गॅस कनेक्शन खरेदी केल्यानंतर हे पैसे देण्यात येतील. इतकंच नाही तर आता स्टोव्ह खरेदी किंवा एलपीजी सिलिंडर घेतल्यानंतर EMI देण्याचीही सुविधा देण्यात आली आहे.
असं करा अप्लाय
– उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेण्यासाठी BPL कुटुंबातून कोणतीही महिला अप्लाय करू शकते.
– यासाठी KYC फॉर्ण भरून LPG सेंटरमध्ये जमा करावा लागणार आहे.
– यामध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 14.2 किलोग्रॅमचा सिलेंडर किंवा 5 किलोग्रॅमचा सिलेंडर मिळेल.
– उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ फॉर्म डाऊनलोड करू शकता
– याव्यतिरिक्त तुम्ही LPG सेंटरमधूनही गॅस घेऊ शकता.
ही कागदपत्र आहेत आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी बीपीएल कार्ड (BPL), बीपीएल (BPL) रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्डची प्रत, बीपीएल यादीमध्ये एलआयसी पॉलिसी, बँक स्टेटमेंट, नेम प्रिंट आऊट अशी कागदपत्रं महत्त्वाची असणार आहेत.
कोणाला मिळणार योजनेचा लाभ
– सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी फक्त महिलाच अप्लाय करू शकतात.
– यामध्ये अर्जदाराचं वय किमान 18 वर्षे असणं महत्त्वाचं आहे.
– अर्जदार कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असलं पाहिजे.
– कोणत्याही बँकेत अर्जदाराचं खातं असणं आवश्यक आहे.
– तर अर्जदाराच्या नावावर आधीपासून कोणतंही एलपीजी गॅस कनेक्शन नसावं.
दरम्यान, उज्ज्वला योजनेविषयी अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी तुम्ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या Http://www.petroleum.nic.in/sites/default/files/ वेबसाईटला भेट देऊ शकता. (modi government give 1600 rupees on lpg gas connection under ujjwala scheme here is the process)
संबंधित बातम्या –
देशासाठी ही महिला ठरली आदर्श; केसरच्या शेतीतून कमावतेय 25 टक्के जास्त नफा
तुमच्या रोजगाराची बातमी; मोदी सरकार म्हणतं, गरज पडली तर मनरेगात फंड वाढवणार !
Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा आजचे दर
(modi government give 1600 rupees on lpg gas connection under ujjwala scheme here is the process)