पेन्शन फंड ‘आयपीओ’मध्ये गुंतवण्याला मुभा, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
Pension Fund | एचडीएफसी लाइफचे (HDFC Life) अध्यक्ष दीपक पारेख यांनीही केंद्र सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. देशातील जीवन विमा उतरवणाऱ्या कंपन्यांना भविष्यात पेन्शन आणि आरोग्य विमा विकण्याचीही परवानगी मिळावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला होता.
मुंबई: निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकांना लवकरच प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आणि ठरावीक समभागांच्या यादीत गुंतवणूक करण्याला लवकरच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. ‘निवृत्तिवेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण (पीएफआरडीए)’चे अध्यक्ष सुप्रतिम बंडोपाध्याय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून लवकरच यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.
पेन्शन फंड आयपीओ, एफपीओ आणि ओएफएसच्या विशिष्ट मर्यादेच्या पुढे असणाऱ्या प्रस्तावांमध्येच गुंतवणूक करण्याची परवानगी असेल. ही गुंतवणूक विशिष्ट अटी-शर्तीसह केली जाईल , असे सुप्रतिम बंडोपाध्याय यांनी सांगितले.
एचडीएफसी लाइफचे (HDFC Life) अध्यक्ष दीपक पारेख यांनीही केंद्र सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. देशातील जीवन विमा उतरवणाऱ्या कंपन्यांना भविष्यात पेन्शन आणि आरोग्य विमा विकण्याचीही परवानगी मिळावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. जगभरात पेन्शन आणि आरोग्य विमा हे जीवन विम्याचेच भाग मानले जातात. कारण निवृत्तीनंतर पेन्शन आर्थिक आधार देते. तर आरोग्य विमा उतारवयात अधिक फायदेशीर ठरतो. त्यामुळे देशातील जीवन विमा कंपन्यांना आरोग्य विमा आणि पेन्शन योजनांसारखी उत्पादने विकण्याचीही परवानगी मिळावी. त्यामुळे देशभरात विमा उतरवणाऱ्या लोकांची संख्या वाढेल, असा दावा पारेख यांनी केला होता.
HDFC Life च्या नफ्यात घट
कोरोनाकाळात HDFC Life ने जवळपास 4 कोटी जीवन विमा उतरवले. तसेच 2.9 लाख पेक्षा अधिक विम्याचे पैसे अदा केले. ही रक्कम जवळपास 3000 कोटी रुपये असल्याचा दावा दीपक पारेख यांनी केला. एचडीएफसी लाइफ (HDFC Life) कंपनीच्या निव्वळ नफ्यात पहिल्या तिमाहीत घट झाली आहे. निव्वळ नफा 33 टक्क्यांनी कमी होऊन 302 कोटी रुपये इतका राहिला. गेल्यावर्षी याचा तिमाहीत कंपनीला 451 कोटींची निव्वळ नफा झाला होता.
संबंधित बातम्या:
20 वर्षांनंतर दर महिना 1.5 लाख रुपये कमवायचेत? जाणून घ्या किती गुंतवणूक करणं गरजेचं
SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँक घरी 20000 रुपयांपर्यंत रोकड पाठवणार, पण कशी?
PM Kisan Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सबसिडी, फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या