अल्पबचत योजनांवरील व्याजदर कमी होणार, मोदी सरकार आज फैसला करणार?

Small Saving Scheme | गेल्यावर्षी केंद्र सरकारकडून बँकांमधील मुदत ठेव योजनांवरील व्याजदर कमी करण्यात आले होते. त्यानंतर आता अल्पबचत योजनांवरील व्याजदर घटल्यास सामान्य गुंतवणुकदारांच्या चिंता वाढणार आहेत.

अल्पबचत योजनांवरील व्याजदर कमी होणार, मोदी सरकार आज फैसला करणार?
अल्पबचत योजना
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 8:24 AM

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून आर्थिक जगतात मोदी सरकार अल्पबचत योजनांवरील (Small Saving Schemes) व्याजदरात कपात करणार असल्याची चर्चा सुरु आहे. प्रत्येक तिमाहीत केंद्र सरकारकडून अल्पबचत योजनांवरील व्याजदराचा आढावा घेतला जातो. आतादेखील एप्रिल-जून तिमाही संपत असल्याने केंद्र सरकारची बैठक होईल. (Modi govt may cut down interest rates on small saving schemes from 1 July 2021)

या बैठकीत राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र (KVP), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि सुकन्या समृद्धी योजनांच्या व्याजदराबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. गेल्यावर्षी केंद्र सरकारकडून बँकांमधील मुदत ठेव योजनांवरील व्याजदर कमी करण्यात आले होते. त्यानंतर आता अल्पबचत योजनांवरील व्याजदर घटल्यास सामान्य गुंतवणुकदारांच्या चिंता वाढणार आहेत.

टॅक्स, बँकिंग, सिलेंडरचे दर; 1 जुलैपासून मोठ्या बदलांची शक्यता, जाणून घ्या सर्वकाही

जाणकारांचे मत काय?

मोदी सरकार पुढच्या तिमाहीत अल्पबचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता फारच कमी आहे. सध्या देशातील महागाई आणि इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करुन मोदी सरकार आगीत आणखी तेल ओतणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मुदत ठेवीवरील व्याजदर निचांकी स्तरावर

सध्याच्या घडीला देशात मुदत ठेवींवरील (Fixed Deposite) व्याजदर निचांकी स्तरावर आहेत. नेट रिटर्न्सचा विचार करायचा झाल्यास मुदत ठेवींवर सध्या नेगेटिव्ह रिटर्न्स मिळत आहेत. त्यामुळेच आता मोदी सरकार अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचे धाडस करणार नाही, असा जाणकारांचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या :

खासदारांचे 12 कोटी मोदींनी परस्पर कापले, सुप्रिया सुळे म्हणाल्या, निर्मलाताई, अर्थखातं अजितदादाकडून शिका!

छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला मागे, निर्मला सीतारामन यांची माहिती

अधिकाऱ्यांच्या नजरचुकीमुळे मोदी सरकारने ‘तो’ आदेश काढला; निर्मला सीतारामन यांची सारवासारव

(Modi govt may cut down interest rates on small saving schemes from 1 July 2021)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.