आत लवकरच डेबीट कार्डशिवाय ATM मधून काढता येणार पैसे, गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मोठी घोषणा
आता लवकरच डेबीट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das ) यांनी म्हत्त्वाची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : आता लवकरच डेबीट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das ) यांनी म्हत्त्वाची घोषणा केली आहे. देशातील सर्वच बँकांमधील एटीएम (ATM) मधून ग्राहकांना डेबीट कार्डशिवाय पैसे काढता आले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असून, ती सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे शक्तीकांत दास यांनी सांगितले. ते तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा करताना बोलत होते. दास पुढे बोलताना म्हणाले की लवकरच ग्राहकांना एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. ही सुविधा युपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसवर आधारित असेल. सध्या कार्डलेस कॅश विड्रॉलची सुविधा काही बँकांच्या मर्यादित एटीएममध्येच उपलब्ध आहे. ती आता सर्वच बँकांमध्ये हळूहळू सुरू करण्यात येणार आहे.
काय म्हणाले शक्तीकांत दास?
पुढे बोलताना शक्तीकांत दास यांनी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयाची देखील माहिती दिली. लवकरच सर्व बँकांच्या एटीएममध्ये कार्डलेस सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले. तसेच रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, रेपो रेट स्थिर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. व्यवहारामध्ये सुलभता वाढवण्यासाठी आरबीआय आता ग्राहकांना एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे.
ग्राहकांचा काय फायदा होणार?
ग्राहकांना जर एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास, फसवणुकीला आळा बसेल, एटीएम क्लोनिंग, एटीएम स्किमिंग सारखे प्रकार घडणार नाहीत. ग्राहकांची गैर सोय दूर होईल. समजा एखादा ग्राहक आपले कार्ड घरी विसरला किंवा त्याच्याकडून एटीएम हरवल्यास तरी देखील त्याला पैसे काढता येतील. म्हणजेच काय तर पैशाभावी त्याची गैरसोय होणार नाही. कार्डलेस सुविधा म्हणजे अशी सुविधा की ज्यामध्ये ग्रहकाला बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना आपले कार्ड वापरण्याची गरज राहणार नाही. तो कर्ड नसताना देखील पैसे काढू शकतो. ही सुविधा युपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसवर आधारित असणार आहे.
संबंधित बातम्या
शेअर बाजारातील घसरणीला अखेर आज ब्रेक; सेंसेक्समध्ये 412 अंकाची वाढ, गुंतवणूकदारांना दिलासा
Petrol Diesel Price Today : सलग दुस-या दिवशी किरकोळ भाव वाढीचे सत्र थांबले
चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7.5 टक्के राहणार; ‘ADB’ चा अंदाज