Money Making Tips: करोडपती होण्याचा सोपा मार्ग, दिवसाला 30 रुपये गुंतवून व्हा मालामाल

आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा असाच एक उत्तम पर्याय सांगणार आहोत. ज्यामध्ये कमी गुंतवणुकीवर उत्तम नफा मिळेल.

Money Making Tips: करोडपती होण्याचा सोपा मार्ग, दिवसाला 30 रुपये गुंतवून व्हा मालामाल
दरम्यान, दुर्दैवाने तुमच्यासोबत काही घडलं तर तुमच्या कुटुंबाला जोखीम संरक्षण म्हणून 2 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर 4 लाख रुपयांचा अपघाती विमा कव्हरदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे कमी पैशांच्या बचतीमध्येही तुम्ही चांगला नफा कमवू शकता अशी ही योजना आहे.
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 3:12 PM

मुंबई : नोकरी असो किंवा बिझनेस असो प्रत्येकाला पैसा कमवून श्रीमंत होण्याची इच्छा असते. काही लोक अथक प्रयत्नांनी पैसा कमवतातही तर काही लोक गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळवतात. आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा असाच एक उत्तम पर्याय सांगणार आहोत. ज्यामध्ये कमी गुंतवणुकीवर उत्तम नफा मिळेल. (money making tips how to become crorepati earn money by saving just rs 30 per day in sip)

आता तसं पाहायला गेलं तर करोडपती (Crorepati) होण्याचा कुठलाही शॉर्टकट नाहीये. हो पण तुम्ही पद्धतशीर गुंतवणूक (Systematic Investment) केली तर मात्र तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकता.

तरुण वयात कसे व्हाल करोडपती ? (How to become crorepati)

गुंतवणुकीतून उत्तम पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला लहानपणापासूनच गुंतवणूक करायला पाहिजे. जर तुम्ही 20 वर्षांचे असाल तर दररोज फक्त 30 रुपये साठवून साठव्या वर्षी तुम्ही श्रीमंत होऊ शकता. दिवसाला 30 रुपये ठेव म्हणजे महिन्यात 900 रुपये. दरमहा SIP (Systematic Investment Plan) मध्ये तुम्ही 900 रुपये गुंतवा. जर तुम्ही 40 वर्षांसाठी दरमहा फक्त 900 रुपयांची एसआयपी केली तर ही रक्कम कोटींमध्ये असणार आहे.

– यासाठी तुम्ही दिवसाला 30 रुपये आणि महिन्यात 900 रुपये बचत करा.

– ही बचत एसआयपीमार्फत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवा.

– एका वर्षात ही गुंतवणूक 10,800 रुपये होईल.

– 40 वर्षांत ही गुंतवणूक 4,32,000 रुपये होईल.

– म्युच्युअल फंडांला 12.5 टक्के दराने परतावा मिळतो.

– 12.5 टक्क्यांच्या परताव्यासह 40 वर्षानंतर ही रक्कम खूप मोठी असू शकते.

30 वर्षांत कोट्याधीश कसे बनाल?

तरुण वयात आपल्याकडे उत्तम आर्थिक सपोर्ट असावा असं प्रत्येकाला वाटतं. आता वाढत्या महागाईचा विचार करता जर तुम्ही 30 वर्षांचे असाल आणि 1कोटी रुपये कमवण्याचं तुमचं टार्गेट असेल तर त्यासाठी तुम्हाला दिवसाला 95 रुपयांची बचत करावी लागेल. 35 वर्षांपर्यंत तुम्हाला ही गुंतवणूक करावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही 35 वर्षांसाठी म्युच्युअल फंडामध्ये डिव्हिडंड रीइन्व्हेस्टमेंट प्लॅन (DRIP) मध्ये गुंतवणूक केली तर यावर तुम्हाला तब्बल 15% परतावा मिळेल.

शेअर बाजार आणि बाँड मार्केट व्यतिरिक्त, प्रत्येक योजनेत सोन्याच्या ईटीएफमध्ये 20 टक्के, आरआयटी / इनव्हीआयटीमध्ये 10 टक्के गुंतवणूक करण्याची योजना आहे. जे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात त्यांना एफडीमधून अधिक परतावा मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास म्युच्युअल फंडामध्ये वार्षिक 10 टक्के नफा सहज मिळतो. तर एफडीवर वार्षिक 5 टक्केच परतावा दिला जातो.

काय आहे एसडब्ल्यूपी?

आता येथे आणखी एक मोठा प्रश्न उद्भवतो, ही एसडब्ल्यूपी म्हणजे काय?, सिस्टमॅटिक पैसे काढण्याची योजना ही एक प्रकारची सुविधा आहे. याद्वारे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड योजनेतून निश्चित रक्कम परत मिळते. किती वेळ, किती पैसे काढायचे याची निवड गुंतवणूकदारांनाच करावी लागते. ते हे काम मासिक किंवा त्रैमासिक आधारावर करू शकतात. तसे, मासिक पर्याय अधिक लोकप्रिय आहेत. गुंतवणूकदार केवळ निश्चित रक्कम काढू शकतात किंवा त्यांना हवे असल्यास ते गुंतवणुकीवरील भांडवली नफा काढून घेऊ शकतात. (money making tips how to become crorepati earn money by saving just rs 30 per day in sip)

संबंधित बातम्या –

प्रजासत्ताकाच्या आदल्यादिवशीही पेट्रोल महाराष्ट्रात महागडच; सर्वाधिक भाव नांदेड, परभणीत

SBI ने 42 कोटी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट, आता घर बसल्या मिळणार ‘या’ 9 सुविधांचा लाभ

आता 5, 10 आणि 100 च्या जुन्या नोटा होणार बाद, पण त्याआधी वाचा ‘हा’ नियम

(money making tips how to become crorepati earn money by saving just rs 30 per day in sip)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.