Scheme : स्कीमच तगडी, पैसा गुंतवा एकदा, आयुष्यभर मालामाल, जेव्हा वाटले तेव्हा काढा रक्कम

Scheme : या योजनेत तुम्ही एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर कमाई मोजा.. कोणती आहे ही योजना..

Scheme : स्कीमच तगडी, पैसा गुंतवा एकदा, आयुष्यभर मालामाल, जेव्हा वाटले तेव्हा काढा रक्कम
आयुष्यभर पेन्शनImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 8:29 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही ही अशा योजनेच्या शोधात (money making Scheme) असाल ज्यात तुम्हाला आयुष्यभर पैसे मिळत राहतील, तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. या योजनेत तुमची कष्टाची कमाई डुबणार नाही, उलट तुमचा फायदा (Benefits) होईल. त्यामुळे या योजनेत तुम्हाला डोळे झाकून गुंतवणूक (Investment) करता येऊ शकते..

तर ही योजना आहे भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजे एलआयसीची (LIC). या योजनेचे नाव जीवन सरल पेन्शन योजना (Saral Pension) आहे. या योजनेत तुम्हाला केव्हाही रक्कम काढता येते.

1 जुलै 2021 रोजी सरल पेन्शन योजना सुरू करण्यात आली. अल्पावधीतच एलआयसीची ही योजना लोकप्रिय झाली. या योजनेत गुंतवणूक करुन तुम्हालाही फायदा घेता येईल. वयाच्या 40 व्या वर्षापासून यामध्ये पेन्शनची सोय आहे.

हे सुद्धा वाचा

या पॉलिसीची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये एकदाच प्रीमियम भरता येतो. त्यानंतर आयुष्यभरासाठी दरमहा निश्चित उत्पन्न(Fixed income) मिळविता येते. विशेष पॉलिसी सुरु झाल्याच्या 6 महिन्यांनंतर कधीही कर्ज घेता येते.

जीवन सरल पेन्शन पॉलिसी ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येते. या योजनेतील लाभधारकाला मासिक 12 हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते. पॉलिसीची किमान खरेदीची किंमत, निवडलेला पर्याय आणि पॉलिसी घेणाऱ्याचे वय यावर अवलंबून असते. ही योजना 40 वर्षे ते 80 वर्षे वयोगटातील व्यक्तीला खरेदी करता येते.

या योजनेत जर तुम्हाला मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला दरमहा किमान 1 हजार रुपये जमा करावे लागतील. त्याचप्रमाणे तिमाही पेन्शनसाठी किमान एका महिन्यात 3000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

एलआयसीच्या या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम भरल्यावर दोन उपलब्ध पर्यायांमधून अॅन्युइटी (Annuity) निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

पहिल्या पर्यायांतर्गत पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील आणि त्याचा मृत्यू झाल्यास वारसदाराला 100 टक्के विमा रक्कम दिली जाईल.

दुसरा पर्याय म्हणजे पॉलिसीधारकाला आयुष्यभरासाठी पेन्शन मिळेल. त्यांच्या निधनानंतर पती-पत्नीला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. त्यातील एखादा साथीदार नसेल तर दुसऱ्याला विमा रक्कम देण्यात येणार आहे.

तुम्हाला पेन्शन मासिक, त्रैमासिक, सहामाही अथवा वार्षिक जशी हवी असेल तसा पर्याय निवडावा लागतो. त्यानुसार, तुम्हाला पेन्शनची रक्कम मिळते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.