बचतीचा सोपा मार्ग! ‘इथे’ करा गुंतवणूक; 21 वर्षांमध्ये मिळवा 1 कोटी रुपये
पैशांची योग्य ठिकाणी आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणुक केल्यास व्यक्तीला त्याच्या निवृत्तीनंतर चांगला परतावा मिळू शकतो. जाणून घ्या अशाच एका चांगल्या योजनेबद्दल
नवी दिल्ली – आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षीत असावे, येणाऱ्या पिढीला आर्थिक मदत व्हावी आणि आपल्या निवृत्तीनंतर बँकेमध्ये मजबूत बँक बॅलन्स असावे. या उद्देशातून एखादा व्यक्ती आयुष्यभर काम करून पौसा कमावतो. मात्र त्या पौशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक न झाल्यास त्याच्या हाती फारसे काही पडत नाही. परंतु त्याच पैशांची योग्य ठिकाणी आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणुक केल्यास व्यक्तीला त्याच्या निवृत्तीनंतर चांगला परतावा मिळू शकतो. निवृत्तीनंतर जर तुम्हाला एक मजबूत बँक बॅलन्स हवा असेत तर आजपासूनच बचतीची सुरुवात करावी लागेल. मात्र ही बचत कुठे गुंतवावी? हे देखील महत्त्वपूर्ण आहे. आज आपण असाच एक बचतीचा सोपा आणि अधिक परतावा देणारा मार्ग जाणून घेणार आहोत.
इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ठरू शकते फायदेशीर
तुम्ही जर तुमची बचत फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला, तर तुम्हाला चांगला परतावा मिळेलच याची खात्री नसते.आता तर अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदर कमी केले आहेत. मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवलेल्या रकमेवर आपल्याला जास्तीत जास्त वार्षिक 6 टक्के दराने व्याज मिळू शकते. मात्र तेच पौसे आपण इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवल्यास आपल्याला दुपटीने परतावा मिळू शकतो. इक्विटी म्युच्युअल फंड हे दीर्घकाली गुंतवणूकीसाठी चांगले मानले जातात. तसेच त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या गुंतवणूकीवर आपल्याला सरासरी वार्षिक आधारावर 12 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.
मुदत ठेव योजनेपेक्षा दुप्पट परतावा
जर तुमचे वय सध्या 30 वर्ष असेल आणि तुम्ही रोज 300 रुपयांची बचत करत असाल, ही बचत जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवली तर पुढील 21 वर्षांनंतर सरासरी एक कोटींच्या आसपास रक्कम तुम्हाला मिळू शकेल. निवत्तीपूर्वीच एक मोठी रक्कम तुमच्या हातात आल्याने तुम्ही 60 वर्षांच्या आतच निवृत्तीचा देखील निर्णय घेऊ शकता. साधारणपणे एसआयपी इक्विटी म्युच्युअल फंड हे वर्षाला सरासरी 15 टक्के व्याज दराने परतावा देण्यासाठी ओळखले जातात. हे व्याज फिक्स डिपॉझिटच्या तुलनेमध्ये दुपटीने अधिक असतात. मात्र पैशांची कोणत्याही योजनेत गुंतवणुक करताना त्याचे सर्व फायदे तोटे समजून घेऊन, खात्री करूनच गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
संबंधित बातम्या
Bank Holidays: ‘या’ सहा दिवशी बँकांना सुट्टी; चला, तातडीचे आर्थिक व्यवहार लवकर करा!
निर्मला सितारमण साधणार बँकांच्या प्रमुखांशी संवाद; ‘या’ प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा