New Income Tax Portal वर दोन कोटींपेक्षा जास्त ITR दाखल, CBDT चे करदात्यांना काय आवाहन?

सीबीडीटीने म्हटले आहे की, 2021-22 आर्थिक वर्षासाठी नवीन पोर्टलवर दाखल केलेल्या दोन कोटींपेक्षा जास्त आयटीआरमध्ये आयटीआर -1 आणि 4 86 टक्के आहेत. यापैकी 1.70 कोटीहून अधिक परताव्याचे ई-पडताळणी देखील करण्यात आले आहे. यापैकी 1.49 कोटी रिटर्न आधार कार्ड आधारित वन टाइम पासवर्ड (OTP) द्वारे पडताळणी करण्यात आलेत.

New Income Tax Portal वर दोन कोटींपेक्षा जास्त ITR दाखल, CBDT चे करदात्यांना काय आवाहन?
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 7:22 AM

नवी दिल्ली : आतापर्यंत नवीन आयकर पोर्टलद्वारे 2020-21 या आर्थिक वर्षासाठी दोन कोटींपेक्षा जास्त आयकर रिटर्न (ITR filing) दाखल केले गेलेत. आयकर विभागाने सांगितले की, आता नवीन आयटी पोर्टलशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात सोडवण्यात आल्यात. त्याचबरोबर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) करदात्यांना 2020-21 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र लवकरात लवकर भरण्याचे आवाहन केलेय. सर्व आयटीआर ई-फायलिंगसाठी उपलब्ध केले गेलेत.

1.70 कोटी ITR ची ई-पडताळणी झाली

सीबीडीटीने म्हटले आहे की, 2021-22 आर्थिक वर्षासाठी नवीन पोर्टलवर दाखल केलेल्या दोन कोटींपेक्षा जास्त आयटीआरमध्ये आयटीआर -1 आणि 4 86 टक्के आहेत. यापैकी 1.70 कोटीहून अधिक परताव्याचे ई-पडताळणी देखील करण्यात आले आहे. यापैकी 1.49 कोटी रिटर्न आधार कार्ड आधारित वन टाइम पासवर्ड (OTP) द्वारे पडताळणी करण्यात आलेत. आधार कार्ड OTP आणि इतर पद्धतींद्वारे ई-पडताळणीची प्रक्रिया विभागाला ITR ची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि परतावा जारी करण्यासाठी आवश्यक आहे.

36 लाखांहून अधिक परतावा जारी

पडताळणी ITR-1 आणि 4 पैकी 1.06 कोटीहून अधिक ITR वर प्रक्रिया करण्यात आलीय. मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी 36.22 लाखांहून अधिक परतावा जारी करण्यात आलाय. ITR-2 आणि 3 ची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. नवीन पोर्टल 7 जून 2021 रोजी सुरू करण्यात आले आणि सुरुवातीच्या काळात करदात्यांनी पोर्टलच्या कामकाजात अनियमितता नोंदवली होती. सीबीडीटीने सांगितले की, अनेक तांत्रिक समस्या सोडवण्यात आल्यात आणि पोर्टलची कामगिरी बऱ्याच प्रमाणात स्थिर झालीय. बोर्डाने सांगितले की, 13 ऑक्टोबरपर्यंत 13.44 कोटींपेक्षा जास्त करदात्यांनी लॉगिन केलेय आणि सुमारे 54.70 लाख करदात्यांनी त्यांचे पासवर्ड पुनर्प्राप्त करण्याची सुविधा घेतलीय.

संबंधित बातम्या

‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक करून दरमहा तुमच्या खात्यात पैसे येणार, व्याजदर काय?

टॅक्स सेव्हिंग एफडी बँकेत करावी लागणार, जास्तीत जास्त व्याज कुठे?

More than Rs 2 crore ITR filed on New Income Tax Portal, what is the appeal of CBDT to the taxpayers?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.