Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Personal Loan घेताय, मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

प्रत्येकजण आपल्या गरजा आणि खर्च पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेत असतात. पण त्यासाठी तुम्हाला त्याबद्दलची थोडी तरी माहिती असणे गरजेचे आहे. (Most important tips and tricks before Applying for personal loan)

Personal Loan घेताय, मग 'या' गोष्टींची घ्या काळजी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
loan
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 9:49 AM

Personal Loan Tips मुंबई : प्रत्येकजण आपल्या गरजा आणि खर्च पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेत असतात. पण त्यासाठी तुम्हाला त्याबद्दलची थोडी तरी माहिती असणे गरजेचे आहे. सध्या पसर्नल लोन मिळणे फार कठीण झाले आहे. मात्र पात्र असलेल्या लोकांना सहज कर्ज मिळते. मात्र तुम्ही जर एखादे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेत असाल तर त्यापूर्वी ते फेडणं तुम्हाला झेपणार आहे का याचा अंदाज घ्या. त्यामुळे नीट विचार करुनच पर्सनल लोन घेण्याबद्दलचा निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. (Most important tips and tricks to keep in mind before Applying for personal loan)

?पर्सनल लोन घेण्याचे कारण काय?

तुम्हाला पसर्नल लोन हे विविध कारणांसाठी आणि गरजेसाठी घेता येऊ शकते. पण तज्ज्ञांचे मते तुम्ही अशाच खर्चांसाठी कर्ज घ्या जे तुम्हाला टाळता येणे शक्य नसते. तसेच जर शक्य असेल तर वैयक्तिक कर्ज घेणे टाळा.

?चांगले पसर्नल लोन कुठे मिळेल?

तुमचे ज्या बँक अकाऊंटमध्ये खाते आहे, त्याच बँकेतून तुम्ही कर्ज घेतले पाहिजे असे गरजेचे नसते. तुम्ही तुम्हाला हव्या त्या बँकेतून वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. विशेष म्हणजे वैयक्तिक कर्ज हे केवळ बँकेतूनच नाही, तर डिजीटल NBFCs द्वारेही घेता येते. तसेच बऱ्याच एनबीएफसी ‘केवळ इन्स्टॉलमेंट’ या तत्त्वावर कर्ज ऑफर करतात. मात्र कर्ज देण्यापूर्वी तुम्हाला चांगला क्रेडीट स्कोअर असणं महत्त्वाचं आहे.

?व्याजदरासह इतर माहितीही आवश्यक

जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेणार असाल, तर ते तुम्ही कोणत्या बँकेतून घेणार आहात हे निश्चित करा. यानंतर कर्ज घेताना तुम्हाला नेमका किती खर्च येतो, याची माहिती असणे गरजेचे आहे. यासोबतच तुम्हाला कर्जासोबत कोणती सुविधा मिळते याचीही माहिती असणे आवश्यक असते. त्या ठराविक बँकेची ग्राहक सेवाही लक्षात घ्या. वैयक्तिक कर्ज घेतेवेळी केवळ व्याज दरच नव्हे तर आगाऊ भरलेली रक्कम शुल्क आणि मुदतपूर्व बंद शुल्काची देखील माहिती असणे गरजेचे आहे. तसेच वैयक्तिक कर्ज घेण्याशी संबंधित सर्व खर्च जाणून घ्या.

?कर्ज घेतेवेळी याची काळजी आवश्य घ्या

वैयक्तिक कर्ज घेताना तुम्हाला किती EMI भरावा लागणार आहे ते आवश्यकरित्या पाहा. तसेच ते EMI विनामूल्य परतफेड करण्याचा पर्याय आहे का? तुम्हाला किती दिवसात वैयक्तिक कर्ज मिळू शकते? तुम्ही ज्या संस्थेकडून कर्ज घेत आहात ते कसे आहे? ते सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहे की नाही? याचीही थोडी माहिती घ्या. तसेच तुम्ही कर्ज घेणारी बँक तुम्हाला ग्राहक म्हणून चांगली सेवा देते की नाही हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वैयक्तिक कर्ज घेतेवेळी तुमच्या प्रत्येक शंकाचे निराकरण करणे सोपे होईल. (Most important tips and tricks to keep in mind before Applying for personal loan)

संबंधित बातम्या :

PPF आणि NPS कशात सर्वाधिक फायदा? जाणून घ्या निवृत्तीनंतरची सर्वोत्तम योजना

‘या” शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आठवड्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा, दर 25 रुपयांपेक्षाही कमी

SBI ग्राहकांसाठी नवी सूचना! अशाप्रकारे करा मोबाईल नंबर अपडेट आणि घरबसल्या अर्ज करून मिळावा ATM कार्ड!

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.