Google Search Ambani : अंबानी कुटुंबातील या व्यक्तीची इंटरनेटवर जादू; सर्वाधिक वेळा लोकांनी केले सर्च, ना नीता ना मुकेश अंबानी, तो सदस्य तरी कोण?
Most Search Ambani Family members on Google Search : गुगल सर्चवर वर्षभरात भारतीयांनी अनेक माहिती धडाधड शोधली. आता तर कळ सुद्धा दाबायची गरज नाही, माईक ऑन केला आणि गुगलला विचारलं की माहिती पुढ्यात असते. गुगलवर अंबानी कुटुंबातील या व्यक्तीचा सर्वाधिक शोध घेण्यात आला.
गुगल सर्च हे जगभरातील माहिती मिळवण्याचे गेल्या काही दशकातील हक्काचा मंच झाला आहे. या व्यासपीठावर तुम्ही काही टाईप करण्याची गरज की माहितीचे असंख्य स्त्रोत तुमच्या पुढ्यात येतात. तर यंदाही गुगल सर्चवर वर्षभरात भारतीयांनी अनेक माहिती धडाधड शोधली. पाकिस्तानात मुकेश अंबानी यांचे नाव सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आले. पण भारतात टॉप-10 मध्ये अंबानी कुटुंबातील एका सदस्याचे नाव सर्वाधिक वेळ सर्च करण्यात आले. अर्थात हे नाव मुकेश अंबानी, वा नीता अंबानी यांचे नव्हते. मग कुणाच्या नावाचा घेण्यात आला सर्वाधिक वेळा शोध?
टॉप-10 मध्ये राधिका मर्चंट
अंबानी कुटुंबात मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता, मुलगी निशा, मुलगा आकाश आणि अनंत अंबानी यांचा समावेश आहे. त्यात दोन सुना आहेत. तर राधिका मर्चंट ही अनंत अंबानी याची पत्नी आहे. या वर्षी त्यांच्या शाही साखरपुड्याची आणि लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. या लग्नात काय काय झाले, कोण कोण आले, कुठे हे लग्न झाले, त्यांनी किती पाहुण्यांना निमंत्रण पाठवले. तर या लग्नात अदाकारी दाखवण्यासाठी कुणाला किती मानधन देण्यात आले, याच्या चर्चा रंगल्या होत्या.
यावर्षी 12 जुलै रोजी हा शाही विवाह सोहळा थाटामाटात पार पडला होता. त्याचे मथळे अनेक वृत्तपत्र, सोशल साईट, वेबसाईटवर झळकले होते. या लग्नाची धामधूम अनेक चॅनल्सने प्राईम टाईममध्ये दाखवली होती. यामुळे गुगल सर्चच्या यादीत राधिका मर्चंटचे नाव सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आल्याचे समोर आले.
कोण आहे राधिका मर्चंट?
राधिकाचा जन्म मुंबईत झाला. 18 डिसेंबर 1994 रोजी राधिकाचा जन्म झाला. तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबईतच झाले. कॅथड्रल आणि जॉन कॅनन स्कूल, इकोले मोंडियल वर्ल्ड स्कूलमध्ये तिने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरचे शिक्षण तिने परदेशात पूर्ण केले. तिने गुरु भावना ठाकर यांच्याकडून भरतनाट्यमचे शिक्षण घेतले. त्यांचे कुटुंब गुजरातमधील कच्छ भागातील आहे.
राधिका एनकोर हेल्थकेअरचे सीईओ विरेन मर्चेंट यांची मुलगी आहे. राधिका या एनकोर हेल्थकेअरच्या संचालिका आहेत. त्यांना पुस्तक वाचण्याची आवड आहे. पोहणे, नृत्य ही तिची आवड आहे. राधिका ही स्टाईलिश आहे. सध्या ती कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत आहे. जीवनसाथी अनंत हा तिचा लहानपणीचा मित्र आहे.