‘त्या’ महिलेनं अवघ्या एका वर्षात फेडलं 18 लाखांचं कर्ज, 16 लाख रुपयांची बचतही केली, जाणून घ्या नक्की काय घडलं?
Saving Tips | कॉर्नी कार्ड यांनी 18-19 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी कडक बचत योजना बनवली. त्यांच्या घरातील प्रत्येक लहान -मोठा खर्च कमी केला. मिररच्या रिपोर्टनुसार, त्याने बाहेर जाण्याचा आणि बाहेर खाण्याचा खर्च कमी केला. हॉटेलमधून खाणे मागवणे बंद केले. टीव्हीचे सबस्क्रिप्शन रद्द केले.
लंडन: महिन्याला कितीही पगार किंवा उत्पन्न असले तरी ते पुरत नाही, अशी अनेकांची रड असते. मात्र, काही लोकांना पैसे वाचवायचे कसे, कुठे बचत करायची, याची चांगली जाण असते. असे लोक अल्पावधीत खूप पैसा साठवून झपाट्याने प्रगतीची शिखरे चढतात. इंग्लंडमधील एका महिलेने असाच चमत्कार करुन दाखवला आहे.
या महिलेचे नाव कॉर्नी कॉर्ड (Corinne Card) असून ती 40 वर्षांची आहे. काही दिवसांपूर्वी ही महिला आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी गेली होती. याशिवाय, घरासाठी त्यांनी अनेक वस्तू खरेदी केल्या होत्या. ही खरेदी करताना कॉर्नी यांना भान राहिले नाही. परिणामी त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. यामधून बाहेर पडण्यासाठी कॉर्नी कॉर्ड यांनी अशी काही बचत करुन पैसे साठवले की, अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
कसा तयार केला बचतीचा प्लॅन?
कॉर्नी कार्ड यांनी 18-19 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी कठोर बचत योजना तयार केली. त्यांच्या घरातील प्रत्येक लहान -मोठा खर्च कमी केला. मिररच्या रिपोर्टनुसार, त्याने बाहेर जाण्याचा आणि बाहेर खाण्याचा खर्च कमी केला. हॉटेलमधून खाणे मागवणे बंद केले. टीव्हीचे सबस्क्रिप्शन रद्द केले.
कॉर्नी एका मीडिया कन्सल्टन्सी एजन्सीमध्ये कामाला आहेत. डोक्यावर कर्ज असल्यामुळे कॉर्नी यांनी तिच्या कामाचे तास वाढवले. अशाप्रकारे त्यांनी एका महिन्याच्या आत 5 लाखांचे कर्ज फेडले. पती जॉन सोबत मिळून तिने महिन्याचा खर्च कमी करण्यासाठी शहाणपणाने खरेदी सुरू केली आणि लवकरच तिचे 13 लाखांचे कर्ज संपले.
घरात लहान मुलं असूनही खर्चावर नियंत्रण कसे ठेवले?
कॉर्नी आणि जॉन या दाम्पत्याला तीन मुलं आहेत. कर्जाच्या विळख्यात सापडल्यानंतर कॉर्नी यांनी पैसे कसे वाचवता येतील, याचा आराखडा आखला. त्या सुरुवातीला क्रेडिट कार्ड वापरायच्या तेव्हा त्याचे बिल लगेच चुकते करायच्या. मात्र, नंतर त्यांनी ही पद्धत बदलली आणि थोड्याच दिवसांत त्याचे चांगले परिणाम दिसून आले. त्यांनी केवळ 18 लाखांचे कर्ज फेडलेच नाही तर 16 लाखांची बचतही केली.
अवघ्या 17 महिन्यात 3 कोटींचं कर्ज फेडलं
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील दाम्पत्याची अशीच कहाणी समोर आली होती. अमेरिकेचे शैनन आणि तिचे पती दोघेही त्यांचे कर्ज फेडण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी त्यांनी आपल्या खर्चात मोठी कपात केली. कर्जाची परतफेड करण्यासाठी, जोडप्याने फर्निचरपासून आपल्या जेवणापर्यंत काटकसर करण्यास सुरवात केली. त्यामुळे 17 महिन्यांत त्यांच्या डोक्यावरील तीन कोटींचे कर्ज फिटले होते.
इतर बातम्या:
अवघ्या 17 महिन्यात 3 कोटींचं कर्ज फेडलं, महिलेनं सांगितली पैसे बचतीची ‘आयडियाची कल्पना’!
SBI नंतर आता HDFC बँकेची बंपर ऑफर, व्याजदर आणि प्रोसेसिंग फीवर सूट
वैयक्तिक कर्ज घ्यायचेय, मग जाणून घ्या कुठल्या बँकेचा किती व्याजदर आहे ते