Adani-Ambani : श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर, गौतम अदानी यांना झटका तर टॉप-10 मध्ये मुकेश अंबानी यांचा नंबर कितवा

Adani-Ambani : श्रीमंतांच्या यादीत मोठा फेरबदल झाला, गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांना मोठा झटका बसला आहे.

Adani-Ambani : श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर, गौतम अदानी यांना झटका तर टॉप-10 मध्ये मुकेश अंबानी यांचा नंबर कितवा
मोठा उलटफेर
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 10:02 PM

नवी दिल्ली : अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांना मोठा झटका बसला. गौतम अदानी आता जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती नाहीत. त्यांची जागा अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस (Jeff Bezos) यांनी घेतली आहे. बेजोस हे आता जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहे. ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्समध्ये (Bloomberg Billionaires Index) गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. अदानी यांच्या संपत्तीत 683 दशलक्ष डॉलर्सची घट झाली. तर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) टॉप-10 च्या यादीतून बाहेर फेकल्या गेल्या आहेत. टॉप 15 मध्ये त्यांचा क्रमांक 12 वा आला आहे. अंबानी यांच्या संपत्तीत इतकी घसरण झाली आहे.

भारतीय अब्जाधीश आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांना झटका बसला. अदानी आणि बेजोस यांच्या संपत्तीत फार मोठी तफावत नसली तरी क्रमवारीत बदल झाला आहे. बेजोस यांची एकूण संपत्ती 121 अब्ज डॉलर आहे. अदानी यांच्या संपत्तीत घट झाल्याने बेजोस यांनी क्रमवारीत आघाडी घेतली.

अंबानी यांचा टॉप-10 च्या यादीतून पत्ता कटला आहे. त्यांच्या संपत्ती एकूण 120 अब्ज डॉलरची घसरण झाली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) आहेत. त्यांची एकूण संपत्ती 188 अब्ज डॉलर आहे. तर एलॉन मस्क 145 अब्ज डॉलरसह या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत.

हे सुद्धा वाचा

नवीन वर्ष 2023, गौतम अदानी यांना संपत्तीच्या दृष्टीने लकी ठरले नाहीत. जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी हे एकमेव आहेत, ज्यांच्या संपत्तीत मोठी घसरण दिसून आली. नवीन वर्षात अदानी यांच्या संपत्तीत आतापर्यंत 683 दशलक्ष डॉलरची घसरण झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सनुसार, जगातील टॉप-15 श्रीमंतांच्या यादीत केवळ गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांची संपत्ती या वर्षीत कमी झाली आहे. यादीतील चौथ्या स्थानावर असलेले गौतम अदानी यांच्या संपत्तीत 683 दशलक्ष डॉलरची घसरण झाली आहे.

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत या वर्षी आतापर्यंत 2.38 अब्ज डॉलरची घसरण झाली. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक अंबानी हे टॉप-10 मधून बाहेर झाले. आता ते यादीत 12 व्या स्थानी आहेत. बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत 26 अब्ज डॉलर, मस्क यांच्या संपत्तीत 8.21 अब्ज डॉलर, बेजोस यांच्या संपत्तीत 13.8 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.