मुकेश अंबानी यांच्याकडून आणखी एक नवीन कंपनी, काय आहे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा प्लॅन

Mukesh Ambani new Company: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही स्टॉक मार्केट लिस्टेड कंपनी आहे. मुकेश अंबानी यांच्या नवीन कंपनीच्या निर्णयानंतर शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये 2.40% वाढ झाली होती. सध्या एका शेअरची किंमत 327.90 रुपये आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीने भागधारकांना 19.67 टक्के नफा दिला आहे.

मुकेश अंबानी यांच्याकडून आणखी एक नवीन कंपनी, काय आहे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा प्लॅन
Mukesh Ambani
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 9:25 AM

Mukesh Ambani new Company: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना उद्योग विश्वात प्रचंड यश मिळवले आहे. जगभरात त्यांच्या उद्योगाचे साम्राज्य पसरले आहे. मुकेश अंबानी यांनी आता आणखी एक नवीन कंपनी सुरु केली आहे. जिओ फायनॉन्स प्लॅटफॉर्म अँड सर्व्हिस लिमिटेड (Jio Finance Platform and Service Limited) या नवीन कंपनीला मुकेश अंबानी यांनी सुरुवात केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने एनबीएफसी डिव्हीजनच्या माध्यमातून या कंपनीची घोषणा केली. या कंपनीच्या माध्यमातून रिलायन्स समूह स्टॉक ब्रोकिंग आमि वेल्थ मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणार आहे.

जिओ फायनॉन्स प्लॅटफॉर्म अँड सर्व्हिस लिमिटेड कंपनीने नवीन सहायक कंपनीची निर्मिती जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या अंतर्गत केली आहे. यामुळे आर्थिक सेवांचा अधिक विस्तार होणार आहे. या कंपनीला कॉर्पोरेट मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे.

कंपनीचा प्लॅन काय?

रिलायन्स कंपनी आर्थिक उत्पादन वितरणाच्या क्षेत्रात आपले पाऊल अधिक मजबूत करण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे स्टॉक ब्रोकिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट उद्योगात पाय रोवण्यासाठी जिओ फायनान्शिअलची सुरुवात केली आहे. या नवीन कंपनीचे मुख्यालय मुंबईत असेल. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने 10,000 इक्विटी शेअर्सची सदस्यता घेण्यासाठी 1 लाख रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक केली आहे, ज्याची प्रत्येकी किंमत 10 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर वाढणार

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही स्टॉक मार्केट लिस्टेड कंपनी आहे. मुकेश अंबानी यांच्या नवीन कंपनीच्या निर्णयानंतर शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये 2.40% वाढ झाली होती. सध्या एका शेअरची किंमत 327.90 रुपये आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीने भागधारकांना 19.67 टक्के नफा दिला आहे. त्याच वेळी, एका वर्षात हा नफा सुमारे 32 टक्के आहे. कंपनीचे मार्केट कॅप 2.08 लाख कोटी रुपये आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर काही महिन्यांपूर्वीच शेअर बाजारात आले होते. वर्षभरातील या शेअरचा उच्चांक 394.70 रुपये आहे. 202.80 रुपये हा नीचांक आहे.

तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर.
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण.
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.