Mukesh Ambani and Nita Ambani: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर जगातील महागड्या घरांपैकी एक आहे. मुंबईत २७ मजली एंटीलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. भव्य-दिव्य असलेल्या या घरात पहिले सहा मजले फक्त कार पार्किंग आहे. १६८ कार या घरात लावता येतात. तसेच जगभरातील लग्झरी सुविधा यामध्ये दिल्या आहेत. जिम, स्पा, थियेटर, टेरेस गार्डन, स्वीमिंग पूल, मंदिर या घरात आहे.
एंटीलियाची किंमत आज जवळपास १५०० कोटी रुपये आहे. मुंबईत १.१२० एकर जमिनीवर एंटलियाची निर्मिती करण्यात आली आहे. हे घर बांधण्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च आला होता. २००६ मध्ये घराचे काम सुरु झाले ते २०१० मध्ये पूर्ण झाले. जमिनीपासून हे उंच असून भूंकपच्या धक्क्यात त्याला काहीच होणार नाही. एंटीलिया होण्यापूर्वी या ठिकाणी काय होते? ही जमीन कोणाची होती?
एंटीलिया असलेल्या जागा पूर्वी अनाथाश्रम होते. करीमबाई इब्राहिम यांनी १८९५ मध्ये ज्या मुलांचे आई-वडील नाहीत, त्यांच्यासाठी हे बनवले होते. खोजासमुदासाठी बनवलेले हे अनाथाश्रम चालवण्याचे काम वक्फ बोर्ड करत होते. २००२ मध्ये ट्रस्टने या जमिनीची विक्री करण्याची परवानगी मागितली. सरकारकडून त्याला परवानगी देण्यात आली.
द न्यू इंडियन एक्सप्रेसमधील रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांनी ही जमीन घेतली. मुकेश अंबानी यांच्या एंटीलिया कमर्शियल प्राइव्हेट लिमिटेडने त्यासाठी २.५ मिलियन डॉलर दिले. त्यानंतर २००३ मध्ये मुंबई मनपाने या ठिकाणी इमारत बांधण्यास मंजुरी दिली. २००६ मध्ये त्या इमारतीचे बांधकाम सुरु झाले.
एंटीलिया हे नाव स्पेनमधील एका बेटावरुन घेतले आहे. या घराचे डिझाइन अमेरिकन आर्किटेक्चर कंपनी पर्किन्स अँड विलने तयार केले आहे. या घरात ६०० कर्मचारी काम करतात. एंटिलियामध्ये तीन हेलिपॅड बांधण्यात आले आहेत. २०१० मध्ये इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर अंबानी परिवार २०११ मध्ये या ठिकाणी राहण्यास आले. त्यात वास्तूदोष असल्याचा संशय अंबानी परिवारास होता. त्यामुळे जून २०११ मध्ये ५० पडितांनी एंटीलिया पूजा विधी करत त्या दोषाचे निवारण केले. त्यानंतर २०११ मध्ये अंबानी कुटुंब त्या ठिकाणी राहण्यास आले.