मुकेश अंबानी यांच्या चालकाचे वेतन किती? पगार वाचल्यावर बसेल धक्का
Salary of Mukesh Ambani driver: मुकेश अंबानी यांचे घर सर्वात महागडे आहे. त्यांचे एंटीलिया हे आलीशान घर 4 लाख स्कायर फूट आहे. त्याची किंमत 16,000 कोटी रुपये आहे. त्यात अनेक सुविधा आहेत. सन 2008-2009 पासून मुकेश अंबानी यांचा पगार वर्षाला 15 कोटी रुपये आहे.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी. ते रिलायन्स समुहाचे चेअरमन आहेत. त्यांनी त्यांचा सर्वात लहान मुलगा अनंत अंबानी यांचा शाही विवाह धुमधडाक्यात केला. या विवाह सोहळ्याला जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यात जगभरातील प्रसिद्ध उद्योगपती, राजकीय व्यक्ती, बॉलीवूड अन् हॉलीवूड कलाकारांचा समावेश होता. माध्यमांमधील बातम्यानुसार, मुकेश अंबानी यांनी या लग्नात पाच हजार कोटी रुपये खर्च केले. त्याचा कमाईचा हा फक्त 0.5 टक्के वाटा आहे. यामुळे मुकेश अंबानी त्यांचा परिवार आणि त्यांचे कर्मचारी यासंदर्भात चर्चा होत असते.
कंपनी वाढवत नेली…
रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना मुकेश अंबानी यांचे दिवंगत वडील धीरूभाई अंबानी यांनी 1966 मध्ये केली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये टेक्सटाइलपासून पेट्रोकैमिकलपर्यंत, रीटेलपासून टेलीकम्यूनिकेशन्सपर्यंत सर्वच क्षेत्रात आपली घौडदौड सुरु ठेवली. वडिलांच्या निधनानंतर मुकेश अंबानी आणि त्यांचे भाऊ अनिल अंबानी यांनी हा व्यवसाय पुढे नेला. कालांतराने दोन्ही भावांमध्ये वाटणी झाली. त्यानंतर मुकेश अंबानी यांची जोरदार प्रगती झाली. त्यांची संपत्ती आता 122 बिलियन डॉलर असल्याचे म्हटले जाते.
मुकेश अंबानी यांचा पगार किती?
मुकेश अंबानी यांचे घर सर्वात महागडे आहे. त्यांचे एंटीलिया हे आलीशान घर 4 लाख स्कायर फूट आहे. त्याची किंमत 16,000 कोटी रुपये आहे. त्यात अनेक सुविधा आहेत. सन 2008-2009 पासून मुकेश अंबानी यांचा पगार वर्षाला 15 कोटी रुपये आहे. ऑगस्ट 2022 मध्ये कोविड-19 महामारीमुळे झालेल्या आर्थिक मंदीच्या काळात, मुकेश अंबानी यांनी रिलायन्स समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या नात्याने त्यांचे संपूर्ण पगार आणि संबंधित लाभ सोडण्याचा निर्णय घेतला.
किती आहे चालकाचा पगार
मुकेश अंबानी आपल्या कर्मचाऱ्यांची चांगली काळजी घेतात. त्यांचा चालकाला आश्चर्यकारक पगार मिळतो. त्याला महिन्याला 2 लाख रुपये म्हणजे वर्षाला 24 लाख रुपये मिळतात. परंतु त्यांच्याकडे चालक होणे म्हणजे अनेक कठीण परीक्षा द्याव्या लागतात. हे चालक खाजगी कंत्राटी कंपन्यांद्वारे नोकरी करतात. हे चालक व्यावसायिक आणि लक्झरी दोन्ही वाहने हाताळण्यात निपुण आहेत. मुकेश अंबानी यांचे वाहने बुलेटप्रूफ आहे. त्यात सुरक्षेची सर्वोच्च मानके आहेत.
हे ही वाचा मुकेश अंबानी यांनी रोज तीन कोटी खर्च केले तर त्यांची संपत्ती केव्हा संपणार, वाचून बसेल धक्का