मुकेश अंबानी यांचे ग्राहकांना हॅपी न्यू इयर… आता 2025 च्या रिचार्जमध्ये 200 दिवसांचा टॉकटाइम

नवीन वर्षात जर तुम्ही तुमचे रिचार्ज करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यापेक्षा चांगला प्लॅन मिळू शकत नाही. नवीन वर्षाच्या 2025 च्या प्लॅनमध्ये रिलायन्स जिओ ने आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम प्लान आणला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग सह इतर अनेक फायदे मिळतात. जाणून घेऊया या प्लॅन बद्दल.

मुकेश अंबानी यांचे ग्राहकांना हॅपी न्यू इयर... आता 2025 च्या रिचार्जमध्ये 200 दिवसांचा टॉकटाइम
Jio, RechargeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 2:54 PM

जिओ कंपनी आपल्या ग्राहकांना प्रत्येक वेळेला एकापेक्षा एक प्लॅन देत असते. हे प्लॅन वेगवेगळ्या वैद्यतेस सह असतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जिओच्या बहुतेक प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ सिनेमाचे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळते. जिओच्या नवीन वर्षाच्या प्लॅनमध्ये तुम्ही 2025 रुपयांचा रिचार्ज प्लॅन निवडू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 दिवसांची वैधता मिळत आहे. दररोज हाय स्पीड डेटा वापरण्याची संधी मिळत आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला इतर कोणते फायदे मिळणार आहे. जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती.

2025 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळेल सर्व काही

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला उत्कृष्ट फायदे मिळतात. ज्याचा लाभ तुम्ही 200 दिवसांपर्यंत घेऊ शकतात. हा प्लॅन 200 दिवसांच्या वैधतेसह येतो. केवळ 2025 रुपये खर्च करून तुम्हाला 200 दिवसांसाठी एकूण 500 जीबी मोफत डेटा मिळेल. तुम्ही दररोज 2.5 GB हायस्पीड डेटा वापरू शकता.

1. यासोबतच तुम्हाला या प्लॅनमध्ये ऑफलाईन एसएमएस सुविधाही मिळत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस मिळत आहेत.

2. कंपनीने ग्राहकांच्या मनोरंजनाची पुरेपूर काळजी घेतली आहे. यामध्ये तुम्हाला Jio Cinema कडून Jio TV आणि Jio Cloud चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे.

3. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग फायद्यासह तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय तासन्तास तुमच्या मित्रांशी किंवा प्रियजनांशी बोलू शकता.

4.Jio Cinema हे तुमच्यासाठी संपूर्ण मनोरंजन पॅकेज आहे. यावर तुम्ही 350 पेक्षा जास्त चित्रपट आणि 500 पेक्षा जास्त अधिक टीव्ही शो पाहू शकता.

जिओचे 19 आणि 29 रुपयाचे प्लॅन

तुमच्या सध्याच्या रिचार्जची रोजची वैधता संपल्यानंतर तुम्ही या ऍड ऑन प्लानची मदत घेऊ शकता. हे फक्त तुमच्या असलेल्या प्लॅनमध्ये तुम्हाला हाय स्पीड डेटा देतात. ऍड ऑन प्लॅनला बूस्टर प्लॅन असेही म्हणतात.

आणखी एक प्लान

जिओने आणखी एक प्लान दिला आहे. तुम्ही 2025 रुपयांचा प्लॅन खरेदी केला तर रिलायन्स जिओकडून EasemyTrip चे व्हाउचर मिळणार आहे. याचा वापर तुम्हाला फ्लाइट तिकीट बुकिंगवर करता येईल. या व्हाउचरच्या माध्यमातून तुम्ही फ्लाइट बुकिंगवर 1500 रुपयांपर्यंतची सवलत मिळवू शकता.

या शिवाय तुम्ही जिओकडून कपडे खरेदी केल्यास किमान 2999 रुपयांच्या खरेदीवर 500 रुपयांची सूट मिळेल. तसेच स्विगीवर 150 रुपयांचे व्हाउचर दिले जात आहे. त्यामुळे स्विगीवर रिडीम करू शकता आणि 150 रुपयांच्या डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.